Breaking News
Home / मनोरंजन / आजोबा जेव्हा पहिल्यांदा आपल्या नातीला भेटतात.. व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील भावुक व्हाल

आजोबा जेव्हा पहिल्यांदा आपल्या नातीला भेटतात.. व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील भावुक व्हाल

लहानपणी आपल्या बाबतीत काहीही झालं की आपण सहसा आई वडिलांना जाऊन सांगतो. त्यांच्यातही ज्यांच्याकडून अगदी कमी मार पडू शकतो अशा पालकांकडे आपला मोर्चा आपण वळवत असतो. मग आपलं सगळं गाऱ्हाणं आपण त्यांच्यासमोर मांडत असतो. पण कधी कधी हेच आई वडील आपल्याला ओरडायला लागतात. आपल्याला वेळप्रसंगी फटके द्यायला ही मागे पुढे बघत नाहीत. निदान आमच्या टीमपैकी काहींनी तर नक्कीच फटके खाल्ले असणार आहेत. पण अशावेळी मग या आई वडीलांविषयी सांगायचं कुणाला?

तर उत्तर असतं – आपले आजी आजोबा ! आपल्या आई वडिलांना ही चार शब्द ऐकवू शकणारे आणि ते ही आपल्या वतीने असे तेच असतात. गंमतीचा भाग सोडला तरी खरंच या आजी आजोबांचं प्रेम हे काही वेगळंच असतं. पालक आणि मुलं हे नातं खूप संवेदनशील असतंच. सोबतच आजी आजोबा आणि नातवंडांचे नाते ही तितकेच गहिरे असते. म्हणूनच आई बाबा जवळ नसताना आजोबांसोबत बाहेर जावंसं वाटतं. त्यांच्या कडून आणि आजीकडून गोष्टी ऐकाव्याश्या वाटतात. इतकंच काय तर कधी आजोळी गेलं आणि तिथून निघालं की पाय निघता निघत नाही. बरं तिथे गेल्यापासुन ते निघेपर्यंत आपल्याला आजीने खाणं खायला घालून घालून गब्दूल्लं केलेलं असतं.

अर्थात धाक ही असतोच म्हणा !आजीच्या धाकात तर आजोबा पण असतात तेथे नातवंडांची काय बिशाद ! पण अस असलं तरी ही माया इतरत्र कुठेही मिळत नाही. आजी आजोबांच्या वतीने विचार केला तरी हीच बाब लक्षात येते. आपल्या आई वडिलांना मोठं करत असताना ते स्वतः आई वडील या भूमिकेत असतात. आता आजी आजोबा झाल्यावर त्यांना हीच भूमिका पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने जगायला मिळते. तसंच या नवीन पिढीचं ही त्यांना कौतुक असतंच असतं. म्हणूनच अनेकवेळा आजी आजोबा, नवीन तंत्रज्ञान हे आपल्या नातवंडांकडून शिकताना दिसतात. तसेच एवढ्या दशकांच्या त्यांच्या प्रवासात त्यांनी जे जे अनुभव घेतले त्यातूनच ते नवीन पिढीकडे पाहत असतात. त्यामुळे या नवीन पिढीच्या हुषारीकडे, त्यांच्या आत्मविश्वासाचं त्यांना विशेष कौतुक असतं. त्याउप्पर ही एक गोष्ट असते ती म्हणजे निखळ प्रेम ! आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना आता फक्त नातवंडांचे निरागस प्रेम हवं असतं. त्यांना मोठं होताना बघून आपलं जीवन आपण सार्थकी लावल्याची भावना ही मनात असावी. तसेच इतर ही अनेक भावना त्यांच्या मनात दाटून येत असतीलच. कदाचित त्या वयात गेल्यावर त्यांचा अर्थ जास्त चांगल्या पद्धतीने उमगेल. असो.

पण एकूणच काय तर आजी आजोबा आणि नातवंड हे एक जबरदस्त नातं असतं. याचीच थोडीशी झलक देणारा एक व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला. हा व्हिडियो आहे एका आजोबांचा आणि नातीचा ! ही नात खरं तर अगदीच लहान असल्याचं दिसून येतं. त्यामुळे ती अजूनही बोलणं शिकत असावी असा अंदाज करता येतो. पण तिच्या या निरागस असण्याचं तिच्या आजोबांना कोण कौतुक ! हे कौतुक दाखवणारा व्हिडियो म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा हे आजोबा दरवाज्यातून आत येत असतात. ते आत येत असताना त्यांच्या समोरच त्यांची नात आणि तिची आई उभी असलेली दिसते. त्यांना आत आल्या आल्या या नातीचं दर्शन होतं आणि जो आनंद होतो की काही विचारू नका. या आनंदाचं वर्णन आपण आनंदाचा हर्षावायू असं करू शकतो. कारण त्यांना इतका अत्यानंद होतो की ते आत येताच हातातली काठी आणि पिशवी थेट फरशीवर फेकतात. दोन्ही हातांनी या नातीला उचलून घेतात. हा क्षण खरं तर शब्दांत सांगता येणं कठीण आहे.

कारण या भेटीतील निखळ आनंद कसा वर्णन करावा ते कळत नाही. त्या मुलीची आई त्यांना नमस्कार करते. पण तरी त्यांचं लक्ष आपल्या नातीवर असतं. मग थोड्यावेळाने ते या मुलीच्या आईला ही आशीर्वाद देतात. आपल्या टीमने आतापर्यंत अनेक व्हिडियो बघितले आहेत आणि बघत राहू. पण या सारखा मन हळवं करून सोडणारा व्हिडियो क्वचितच पाहिला असेल. असो.

या व्हिडियोतील ही भावनिक घटना आमच्या टीमला आवडून गेली. म्हंटलं याविषयी लिहायला हवं. आपल्या वाचकांना ही याचा आनंद घेऊ दे. त्यातूनच आजच्या या लेखाचा प्रपंच मांडला आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *