Breaking News
Home / मनोरंजन / आजोबा दहावी नापास का झाले, ऐका त्यांच्याच तोंडून.. परीक्षेचे अतरंगी वर्णन ऐकून हसू आवरणार नाही

आजोबा दहावी नापास का झाले, ऐका त्यांच्याच तोंडून.. परीक्षेचे अतरंगी वर्णन ऐकून हसू आवरणार नाही

असं म्हणतात की म्हातारी माणसं ही समजदार असतात. वयानुसार त्यांना एक शहाणपण येतं, असं समजतात. मात्र अनेकदा या शहाणपणाविषयी शंका येते, असंच म्हातारी माणसं वागतात. अल्लड, खोडकर आणि पोरकट मुलांना समज देण्याचं तसेच चांगल्या आणि वाईट गोष्टी समजाऊन सांगण्याचे काम ही म्हातारी माणसे मोठ्या खुबीने करतात. हे पाहून या म्हाताऱ्या लोकांबद्दल आपल्या मनात त्यांच्याविषयी कमालीचा आदरभाव निर्माण होतो. मात्र, ते स्वतःच कधी कधी इतके खोडकर वागतात की, पुन्हा त्यांच्या शहाणपणावर शंका येते. या म्हाताऱ्यांच्या खूप गमतीजमती असतात. या गमती त्यांच्या स्वभावानुसार आणि ते ज्या भागात राहतात, त्यानुसार बदलतात. आता शहरातील म्हातारी अवखळ असली तरी त्याला सीमा असते. आमच्यासारखी गावाकडची म्हातारी इतकी अतरंगी असतात की, त्याला काही सीमाच नसते. गावाकडची अतरंगी म्हातारी मंडळी तुम्हाला अनुभवायची असतील तर गावातच जावं लागेल.

खरंतर अतरंगी आणि मोक्कार खोडकर असणारी म्हाताऱ्या माणसांची ही कदाचित शेवटची पिढी असावी. आज आमच्याकडे अशाच एका अतरंगी आजोबांचा व्हिडीओ आलेला आहे. या व्हायरल व्हिडीओत आजोबा कसे थेट गोठ्यात गेले आणि त्यांची प्रेयसी कशी प्राध्यापिका झाली, याचा प्रवास चक्क कवितेच्या माध्यमातून मांडला आहे. त्यांचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच खळखळून हसवणार, हे मात्र नक्कीच.

खरं पाहिलं तर गावाकडची म्हातारी कायम मंदिरातच दिसतात, ते कायम भगवंताच्या नाम संकीर्तनात दंग असतात, असा एक गैरसमज शहरवासीयांमध्ये विनाकारण पसरलेला आहे. ज्याला काहीही लॉजिक नाही. उलट गावाकडचे लोक लै बेरकी असतेत, हे मी ठामपणे सांगतो कारण मीही गावाकडचा आहे. गावाकडची बिलिंदर म्हातारी कधी कुणाला कसं येड्यात काढतील, ते समजायचं पण नाही. या गावाकडच्या लोकांचा नादच खुळा असतो भाऊ…

आजच्या व्हायरल व्हिडीओत दिसणारे आजोबा आता वय झालं म्हणून शांत दिसत असले तरी आपल्या तरुणपणी आणि विशेषतः शाळेत फारच अफलातून व्यक्तिमत्त्व होते. फक्त अभ्यास करताना नाही तर परीक्षेत सुद्धा या आजोबांना असा काही कंड आला की, त्यामुळे त्यांची रवानगी थेट गोठ्यात झाली. म्हणजे विचार करा, आपण परीक्षेची फुल तयारी करून परीक्षेला बसलो. त्यानंतर आपल्याला लक्षात आले की, आपल्यापुढे एक मुलगी बसणार आहे आणि ती आपली क्रश आहे… तर आपल्याला पेपर कसा जाईल, या विषयावर ही कविता आहे. म्हातारपणी सुद्धा एखाद्या गोष्टीचा किती आनंद घ्यावा हे या आजोबांकडे पाहून कळतं.

या कवितेत अजून एक भारी गोष्ट आहे ती म्हणजे हे आजोबा शाळेतील परीक्षेत तर नापास झालेच पण जिच्यामुळे नापास झाले त्या पोरीच्या प्रेमाच्या परीक्षेत पण आजोबा फेल झाले आणि मग पुढे जाऊन त्याची गमतीदार कविता बनली. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *