पावसाची सुरवात म्हणजे मुलांसाठी सगळंच नवीन. नवीन वर्ग, पुस्तक, नवीन ड्रेस. आणि गम्मत म्हणजे पाऊस खूप पडला म्हणून शाळेला मिळणारी सुट्टी. रेनकोट घालून, पाठीवर दप्तर घेऊन त्या पावसाच्या पाण्यात उड्या मारत जाणारी, साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणारी छोटी छोटी मुले पहिली की आपल्याला सुद्धा लहान व्हावेसं वाटतं. एक बाजूला असतात ती नव्या वर्गात जायला मिळणार म्हणून खुश झालेली मुले ते दुसऱ्या बाजूला असतात ती अजिबात शाळा न आवडणारी मुलं… आता सुट्टी संपली पुन्हा शाळेत जावं लागणार… ही भीतीच आले त्यांना… त्यातच मध्ये 2 वर्षे कोरोनाच्या काळात गेली. त्यामुळे शाळा पोरांपासून अधिकच दुरावली. आता पुन्हा एकदा ही मुलं शाळेत जायला नको नको करत आहेत. आणि अशाच एका शाळेत न जाण्यासाठी खोटे बोलणाऱ्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओत खोटं बोलून या मुलाने कशी शाळेत दांडी मारली आणि मग पुढे घरी माहीत झाल्यावर काय काय झालं? हा सगळा प्रकार या व्हिडीओत कैद झाला आहे. शाळा सुरू होऊन जवळपास 2 महिने झाले आहे. तरी काही मुलं शाळेच्या या वातावरणात अजिबात मिसळलेली नाहीत. शाळा म्हटलं की आजही ही मुलं रडणं सुरू करतात. मुलांच हे असं वागणं पालकांसाठी अतिशय त्रासदायक असतं. नेमकं शाळेतं जाणं का टाळलं जात आहे हे समजणं कठीण होतं. त्यातही आपल्याला पण शाळेत जायचा कंटाळा असायचा, हे पालक साफ विसरून जातात.
पालकही मुलांच्या अशा वागण्याला बळी पडतात आणि मुलांना घरीच ठेवून घेतात. अनेक वेळा, पालक मुलाला आळशी किंवा खोडकर समजतात आणि त्याला जबरदस्तीने शाळेत पाठवतात, परंतु यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते. मूल हट्टी आणि चिडखोर बनते आणि शाळेत जाण्यास आणखी संकोच करते. मात्र कधी कधी मुले खोटं बोलून सुट्टी घेतात आणि एकदा त्याला हे लक्षात आलं की, खोटं बोलल्यावर काम होतं मग ते नियमितपणे खोटं बोलू लागतात.
आजच्या या व्हायरल व्हिडीओत दिसणारा मुलगा लन खूप खोट बोलतो. शाळेत न जाण्यासाठी याआधी पन तो बऱ्याचदा खोटं बोललेला असतो. तेव्हाच त्याने खोटं बोलतो, शाळेत जात नाही, अशा कारणामुळे मामाचा मार खाल्लेला असतो. आणि पुन्हा एकदा जेव्हा त्याची चोरी पकडली जाते… मग मामा त्याला कसा कुटतो? हा पोरगा कसे नाटकी रडतो? कशी खोटी कारणे सांगतो? अशा पध्दतीने सगळं काही या व्हिडीओत बघायला मिळत. सगळ्यात भारी म्हणजे हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपलं बालपण आठवलं असेल.
मामाच्या हातचा मार खाण्यापासून वाचण्यासाठी तो एक भन्नाट युक्ती पण करतो आणि त्यावर मामासोबत युक्तिवाद पण करत राहतो. त्याच्या आणि त्याच्या मामाच्या बोलण्याची, संवादाची भारी मजा येते… शेवटी मात्र तो मार खातो की नाही, हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्हाला बघावाच लागेल… हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :