Breaking News
Home / जरा हटके / आठ लग्ने करणाऱ्या ह्या ६८ वर्षीय व्यक्तीला त्याच्या तरुण गर्लफ्रेंडने शिकवला चांगलाच धडा

आठ लग्ने करणाऱ्या ह्या ६८ वर्षीय व्यक्तीला त्याच्या तरुण गर्लफ्रेंडने शिकवला चांगलाच धडा

असं म्हणतात प्रेमाला वय नसतं, हीच गोष्ट समोर ठेवून ब्रिटनच्या रॉन शेफर्ड ने एका पाठोपाठ एक अशे ८ लग्ने केली. नववे लग्न करण्याच्या तो तयारीत होता. पण अचानक असे झाले कि त्याची होणारी बायकोच गायब झाली. ६८ वर्षाचा हा व्यक्ती २८ वर्षीय तरुणीसोबत नववे लग्न करायच्या तयारीत होता. पण ती तरुणीच कुणा दुसऱ्यासोबत पळून गेली. ६८ वर्षीय रॉन च्या नावावर एक रेकॉर्ड आहे. त्यांनी ब्रिटन मध्ये सर्वात जास्त लग्न करण्याचा विक्रम बनवला आहे. त्यांनी आतापर्यंत आठ लग्न केली आहेत आणि सर्वांसोबत घटस्फोट घेऊन त्यानंतर ते आपल्या वयाच्या अर्ध्याहूनही कमी वय असलेल्या मुलीसोबत डेट करत होते. ते लवकरच लग्न करणार होते. परंतु लग्नाच्या काही दिवसाअगोदरच त्यांची २८ वर्षीय गर्लफ्रेंड क्रिस्टल ललेक त्यांना सोडून दुसया कुणासोबत पळून गेली. ह्यामुळे रॉनचे हृदय तुटले आहे. त्यांना असे वाटत होते कि क्रिस्टल च्या रूपात त्यांना आयुष्यभरासाठी जीवनसाठी मिळाली आहे. त्यांनी क्रिस्टलवर मनापासून प्रेम केले होते. पण तिच्या पळून जाण्याने रॉन खूप एकटे पडले आहेत.

रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात दोघेही खूप खुश होते. हि गर्लफ्रेंड सोडून गेल्यानंतर रॉनने खुलासा केला होता कि मी माझे आठवे लग्न झालेले असताना क्रिस्टलला डेट करत होतो. ती ख्रिस्तन धर्माची असल्यामुळे तिला लग्नाअगोदर कोणतेच शारीरिक संबंध ठेवायचे नव्हते. मी तिच्या ह्या विचारांचा आदरही करतो. परंतु त्यानंतर आमचे संबंध बिघडत गेले. आणि मला तिने फेसबुकवर ब्लॉकसुद्धा केले. एका मित्राने सुद्दा मला सांगितले कि ख्रिस्तनचे एका तरुणासोबत प्रेम जुळलेले आहे. त्यामुळे मला खूप वाईट वाटले.

 

नववी बायको बनवायची होती इच्छा :
रॉन क्रिस्टल ला आपली नववी बायको बनवायची इच्छा होती. दोघेही २०१५ पासून डेट करत होते. रॉन ने क्रिस्टल ला तेव्हा प्रपोज केले होते जेव्हा ते तिच्या सोबत ख्रिसमसचे vacations सेलिब्रेट्स करत होते. ह्या अगोदर रॉन ने आठ लग्न केली आहेत, ज्यापासून त्यांना ८ मुलं सुद्दा आहेत. क्रिस्टल त्यांच्या सर्वात मोठ्या मुलापेक्षा सुद्धा छोटी होती.

रॉन च्या मनातील खंत :
आपल्या गर्लफ्रेंडचे पळून जाण्याने आता रॉन ला असं वाटतंय कि क्रिस्टलचे कोण्या दुसऱ्यासोबत अफेअर होते. म्हणून ती त्याच्यासोबत पळून गेली. त्यांनी क्रिस्टल साठी सर्व काही केले परंतु त्या मुलीने रॉन ला शरीराला स्पर्शही करू दिला नाही. होय, रॉनला ह्या गोष्टीचे वाईट वाटतंय कि त्याला मुलीने मूर्ख बनवले. ते क्रिस्टल चे प्रेम मिळवण्यासाठी महागडे गिफ्ट्स तिला देत असे, तरीसुद्दा क्रिस्टल कुण्या दुसऱ्या सोबत पळून गेली.

आणि ह्या ८ वेळा लग्न करण्याऱ्या व्यक्तीला शिकवला चांगलाच धडा

आपल्या पेक्षा कमी वयाच्या मुली सोबत रॉन डेट करत होते. त्यांनी वयाच्या केवळ १९ व्या वर्षीच पहिले लग्न केले होते. पहिली पत्नी मार्गारेट सोबत १९९६ मध्ये त्यांनी पहिले लग्न केले होते. तेव्हा ते फक्त १९ वर्षाचे होते. १९७६ मध्ये त्यांनी लेस्ली सोबत तिसरे लग्न केले होते. १९८२ मध्ये कैथी सोबत चौथे लग्न केले होते. आपल्या पाचव्या बायकोसोबत राहतानाच रॉन ची ओळख क्रिस्टल सोबत झाली होती. १० वर्ष रॉन आपल्या आठव्या पत्नी सोबत राहिला. २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *