लहान मुलं आणि त्यांचं वागणं हे आपल्याला सदैव आनंद देत असतं. मग ते त्यांचे बोबडे बोल असु देत, त्यांचं वागणं असू देत किंवा त्यांचं भावविश्व. पण कधी कधी मात्र त्यांचं वागणं आपल्याला चकित करून जातं. या आश्चर्यांच्या वेळी हसायला ही येतं आणि काही गोष्टी बदलल्या पाहिजेत असंही वाटतं.
आज हे मांडायचं कारण आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. या वायरल व्हिडियोत आपल्याला एक छोटा शाळकरी मुलगा भेटतो. छोटा म्हणजे अगदी बालवर्गात किंवा पहिलीत वगैरे असावा. पण हे बाळराजे रुसलेले असतात. व्हिडियो सुरू झाल्यापासून. बरं या व्हिडियोत कोणीही बोलत नाही त्यामुळे त्याच्या रागाचं कारण काही कळत नाही. पण या तीस सेकंदांच्या व्हिडियोत पहिली पंधरा सेकंद हा बाबू रागवलेला असतो. त्यातही त्याच हमसून हमसून रागावणं बघून त्याची कीव येते आणि आपलीही आठवण होते. लहानपणी आपणही असेच रागवायचो हे आठवतं. आता मात्र त्या आठवणींनी हसायला येतं. पण या व्हिडियोतील मुलाकडे बघून मात्र उत्सुकता पूर्ण ताणली जाते की असं काय झालं काय एवढं रागावायला.
तर १५ सेकंदांनंतर हा मुलगा रडत रडतच आपला उजवा हात उचलतो आणि कॅमेऱ्यामागील व्यक्तीला तुमचं नाव सांगणार मी असे हावभाव करून दाखवतो. कॅमेऱ्यामागे कोण असतं माहीत नाही पण त्यांनी या मुलाची कळ काढली असणार किंवा त्याला ओरडले असणार असं वाटतं. त्याचं हाताने नाव सांगीन हे करून दाखवणं चालू असतं आणि तेवढ्यात तो आपल्या एका बोटाने नाकावर घासल्यासारखं करतो. क्षणभर आपण काय पाहिलं हे कळत नाही. पण कदाचित नाकाला खाज आली असेल असं वाटून जातं. पण कदाचित रागाच्या भरात ही कृती दाखवली गेली असेल असं वाटत राहतं. असो. पण अचानक झालेल्या या कृतीने आपण जसे आश्चर्यचकित होतो तसेच कॅमेऱ्यामागून हसण्याचे आवाजही ऐकायला येतात आणि व्हिडियो संपतो. आज पर्यंत एवढे व्हिडियो आपल्या टीमने पाहिले पण त्यातला हा सगळ्यांत वेगळा व्हिडियो होता.
तसेच यात केवळ या छोट्या मुलावर लक्ष केंद्रित केले असल्याने बाकीची काहीही हालचाल होत नाही. तसेच या छोट्या बाबूला एवढं रागावायला काय झालं हे कळत नाही. त्यामुळे ठोस असे भाष्य करता येत नाही त्यामुळे या व्हिडियोचा अर्थ कसा लावायचा ते आम्ही आपल्या सुज्ञ वाचकांवर सोडतो. तरीसुद्धा व्हिडीओ पाहिल्यावर असं लक्षात येत आहे कि हा छोटा बाबू आपल्या शिक्षकांवर रागावल्याचे वाटत आहे. तसेच त्यांना क्युट अशी ‘वॉर्निंग’ देण्याचा प्रयत्नसुद्धा करत असल्याचे दिसत आहे. तसेच व्हिडीओवरील भाषेमुळे हा दक्षिणेकडील असल्याचे वाटत आहे.
आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, व्हिडीओ वर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपल्याला हा लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. तसेच खास आपल्यासाठी मराठी गप्पाची टीम सातत्याने लेखन करत असते आणि विविध विषय आपल्या भेटीस आणीत असते. आपलंही प्रोत्साहन आम्हाला आपल्या कमेंट्स आणि लेख शेअर करण्यातून कळत असतं. यापुढेही आपलं प्रोत्साहन असंच कायम राहील हे नक्की. आपला लोभ कायम असावा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :