गणेशोत्सव असो की दहीहंडी, राजकीय नेत्यांच्या मिरवणुका असो किंवा अगदी जाहीर सभा, गर्दी जमा करायचे म्हणजे काय खायचं काम नाही; आणि त्यात गर्दी जमली आणि काही हे लफडं केला ना नाही असं होणार नाही. त्यामुळे गर्दी जर एखादा नवखा भेटला आणि त्याने जरा काही गडबड केली त्याला कांद्या सारखा ठेचून नक्कीच फोडणी देतील एवढं नक्की. आता हे सगळे प्रकार जुने झाले म्हणा, पूर्वी अशा गमतीजमती व्हायच्या पण आत्ता कुठे सोशल मीडियाच्या जमान्यात पुन्हा एकदा असे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. व्हिडिओ मधल्या आजोबांचा ही असाच काहीसा गोंधळ झाला. त्यांना नाचायचं होतं पण कोणी नाचू देईना. त्यांना या सगळ्यातून बाजूला कसा ढकलला जाईल याचा प्रयत्न जमलेल्या गर्दीने केला. आजोबांना भिरकवायला जी सुरुवात झाली दुपार शेवटपर्यंत काही थांबलीच नाही. म्हाताऱ्याला भोवळ येई पर्यंत सगळीकड फिरवला. शेवटी धावत धावत त्याची बायको आली तेव्हा कुठे लोकांनी खाली उतरवला आत्ता म्हातार परत कुठं नाचायला म्हणून पुढे पुढे जाणार नाही.
अगदी मुंग्या पडलेलं अन्न बिळात घेऊन जातात तसंच गर्दीने म्हाताऱ्याला कडेला नेऊन टाकला. इतका फिरवलं कि आता गर्दी दिसली तरी म्हातारा पाठीला पाय लावून पळतय. परत कधी असल्या लोकांचा नादी लागायचं नाही म्हणून म्हातारीनच त्याला शपथ दिली, नसता जीव धोक्यात कोणी घालायचा म्हणून आता लग्नाची निमंत्रणही हे म्हातारा स्वीकारत नाही. बाजारात जायचं म्हटलं तरी उलट्या बाजूने बाजारात चालू लागतो. बसमध्ये गर्दी दिसली थेट खाली उतरतं, इतका धसका या प्रसंगाचा म्हातार्यांना घेतलेला आहे. पण या जमावानं म्हाताऱ्याला असं बाजूला उचलून का फेकला बर असेल? नेमकं आजोबांचं काय चुकलं, एकाएकी जमावानं त्यांच्यासोबत असं का केलं? त्यांनी असं काय केलं त्यांनाही शिक्षा देण्यात आले त्याचं झालं असं की, आजोबांना गर्दीत डान्स करायची खूप हौस. त्यातच नाचू लागल्यावर कधी कोणाच्या पायावर पाय देतील आणि त्याच्या अंगठ्याची बुरजी करून टाकतील त्याचा भरवसा नाही. याच सगळ्या धामधुमीत आजोबांना जोश चढला आणि ते नाचायला लागले. नेमका एका पैलवानाच्या अंगठ्यावर वर आजोबाचा खेटराची टाच पडली. पैलवानाच्या डोक्यात अशी कळ गेली की त्यांना आजोबाच्या सात पिढ्या खाली बोलावल्या.
पैलवानं म्हातार्याला असं उचलून घेतलं आणि गर गर गरकन फिरवायला लागला दिलं गर्दीत फेकून. गर्दीतली पोरं काही कमी नाहीत, त्यामुळे त्यांच्या हातात एक खेळणा मिळाल्यासारखं आजोबाला भिर भिर भिरकावलं, वरच्यावर आजोबाला नाचवलं. सगळ्यात एक गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही की जरा इकडे तिकडे झाल आणि आजोबा लचं हार्टबीट वाढलं तर तिथल्या तिथे खेळ खल्लास व्हायचा, पण आजी धावत आली आणि पुढचा अनर्थ टळला. असल्या गर्दीत त्याला जायचं म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जाईना! असं काही आजोबांचं झालं. नाचायचा किडा काही केल्या कमी होईल त्यामुळे आजोबा आत्ता कुठं लाईनीवर आले असते, तोच हा सगळा प्रकार घडला. पैलवानांना भिरकावल्या पासून आजोबा पुन्हा अशा गर्दीची वेळ काढायला कधीबी जायचे नाही. त्यामुळे एक चांगलं झालं की आजीला आता गावात वरात असो मिरवणूक असो निवडणूक असो तुमच्या मागे पळायला लागत नाही. गर्दी दिसली रे दिसली की आजोबा गप्प मान खाली बसून राहत्यात मिरवणूक पुढे गेली ती त्याच्यामागून येत्यात.
बघा व्हिडीओ :