Breaking News
Home / मनोरंजन / आता ह्यापुढं हा तरुण चुकून पण बायकांमध्ये नाचायला जाणार नाही, बघा काय घडलं ह्याच्यासोबत

आता ह्यापुढं हा तरुण चुकून पण बायकांमध्ये नाचायला जाणार नाही, बघा काय घडलं ह्याच्यासोबत

म्हणता म्हणता मे महिना सुद्धा संपला आणि लग्न सुदधा आटोपती झाली. अनेकांनी या काळात लग्नगाठ बांधली आणि आता त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला आहे. या सगळ्या लग्न समारंभात अनेक मजेशीर किस्से ही घडले आहेतच. कारण लग्न असो वा इतर कोणते समारंभ, किस्से हे घडतातच. किंबहुना, ते तसे घडले नाहीत तरच नवल म्हणायला हवं. त्यात , आपल्याकडची मंडळी जशी डोकेबाज तशीच गमत्या स्वभावाची असतात.

त्यामुळे कधी काय करून जातील, ते सांगता येत नाही. आता आमच्या टीमने पाहिलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो तसा चार वर्षे जुना आहे. पण तरीही त्यात घडलेली घटना आजही आपण उदाहरण म्हणून वापरू शकतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला कॅमेरा जमिनीवर ठेऊन चित्रीकरण चालू असलेलं जाणवतं. समोर बरीच मंडळी बसलेली असतात. बहुधा एखादं लग्नच असावं असं वाटतं. पण धड काही कळत नाही, परिणामतः जास्त काही भाष्य करता येत नाही. असो. तर या सगळ्या मंडळींनी गोलाकार बसणं पसंत केलेलं असतं. याच कारण, मध्यभागी, एक डान्स परफॉर्मन्स होत असतो.

दोन राजस्थानी नृत्यांगना आणि एक राजस्थानी पेहराव केलेला माणूस आपल्याला दोसून येतो. सोबत एक माणूस ही असतो. तो पाहुण्यांमधील असल्याचं त्याच्या देहबोलीवरून कळून येतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा या माणसाला आपण मध्यभागी उभा असलेला पाहतो. पण काहीच क्षण. कारण पुढच्या काही क्षणांत आपल्याला एक नृत्या पुढे आलेली दिसते. ती या माणसाच्या कंबरेत हात घालते आणि…. त्याला एखाद्या लहान पोरासारखं उचलते. बरं, उचलून ठेवते तर तसं ही नाही. बाई, जी गरागरा गरागरा फिरते ना की काही विचारू नका. आता ती स्वतः फिरते आणि या बापड्याला ही फिरवते. बरं असा तसा नाही अगदी जोरदार फिरवते. त्याच्या जागी कोणीही असो, पोटात मळमळलं नाही तरच नवल. तसेच चक्कर आली नाही तरच आश्चर्य. आपल्याला निदान त्याला चक्कर सदृश्य काही तरी वाटतय हे तरी कळतं… बाकी पोटाचं काही कळत नाही. पण गरज ही नसते. कारण आपण हा सगळा प्रकार पाहून असे काही हसत असतो की विचारू नका.

आमच्या टीमला तर हा व्हिडियो एवढा आवडला की आम्ही तो वारंवार पाहिला. त्याचवेळी म्हंटलं यावर लहान लेख झाला तरी ठीक. पण यावर लिहिलं पाहिजे.. कारण असे किस्से एरवी फक्त ऐकून कळतात. पण ते स्वतः बघण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. बरं ही मजा केवळ आम्ही घेऊ आणि आपल्याला लेख वाचायला देऊ असं कसं होईल. आम्ही सदर व्हिडियो, आपल्या वाचकांसाठी खाली शेअर करतो आहोत. आपणही त्याचा आनंद घ्यावा. सध्या आम्ही थांबतो.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *