Breaking News
Home / मनोरंजन / ‘आत्याने तुझ्यासाठी लग्नाचं स्थळ आणलं आहे, लग्न करशील ना’ ह्यावर मुलाचे उ’त्तर ऐकून हसू आवरणार नाही

‘आत्याने तुझ्यासाठी लग्नाचं स्थळ आणलं आहे, लग्न करशील ना’ ह्यावर मुलाचे उ’त्तर ऐकून हसू आवरणार नाही

वायरल म्हणत अनेक व्हिडियोज आपल्या भेटीस येत असतात. काही अनाहूतपणे झालेले तर काही ठरवून केलेले असतात. यांतील काही निवडक व्हिडियोबद्दल आमची टीम सातत्याने लिहीत असते. वाचक म्हणून आपलाही पाठिंबा मिळत असतोच. आज असाच एक व्हिडियो आमच्या टीमला सापडला आहे. त्यात एक लहान मुलगा आणि त्याचे वडील यांच्यातील संवाद या व्हिडियोत पाहायला मिळतात. यातील विचार, संवाद हे पूर्णतः व्हिडियो करणाऱ्यांचे असून आमच्या टीमने जे दिसले आणि त्या क्षणी जे वाटले ते लिहिले या धर्तीवर हा लेख लिहिला आहे. या लेखातून कोणाच्याही भावना दुखावण्याची आमच्या टीमची इच्छा नाही.

या व्हिडियोत एक लहान मुलगा आपल्या समोर बसलेला दिसतो. त्याच्या पाठीमागे एक ताई बसलेल्या असतात. काही तर खात खात या दोघांचं समोर लक्ष असतं. तेवढ्यात कॅमेऱ्याच्या पाठून त्याचे वडील सांगतात की त्याच्या आत्याने या मुलासाठी एका मुलीचं स्थळ पाठवलं आहे. निदान फोटो तरी बघून घे. हे वडील या मुलाची मस्करी करत असणार, हे आपण गृहीत धरणं चालू करतो. वडिलांच्या या म्हणण्यावर मग हा मुलगा लग्नास मात्र नकार देतो. त्यावर वडील म्हणतात अरे आत्ता कर असं नाही म्हणत पण भविष्याचा विचार करून तर बघ. त्यावर या मुलाचं जे उत्तर येतं त्यावर आपण काय प्रतिक्रिया द्यावी ते कळत नाही. पण त्याची मोठ्या माणसासारखं बोलण्याची पद्धत मात्र आपल्या चेहऱ्यावर हसू आणते. त्याच्या मते लग्न केल्यामुळे खर्च खूप जास्त होतो आणि तो टाळण्यासाठी लग्न न केलेलं परवडलं. पण त्यावर त्याचे वडील म्हणतात की त्याच्या म्हातारपणी त्याला कोणी तरी सांभाळायला हवंच ना. त्यासाठी ते स्वतःचं उदाहरण देतात. त्यावर मात्र हा मुलगा उत्तरतो, ‘ज्या देवानं मला जन्माला घातलं आहे, तो माझी काळजी करेल की’ आणि काही सेकंदात हा व्हिडियो संपतो.

आपण क्षणभर स्तिमित होऊन जातो. आपल्यातील वयाने मोठं असणाऱ्या लोकांकडून अशा प्रकारचं उत्तर अपेक्षित असतं. अर्थात नंतर जाणवतं ते की या व्हिडियोत पहिल्या पासून ते अगदी शेवटपर्यंत वडील आणि मुलामधील हा संवाद आपल्याला त्या एक मिनिटभर खिळवून ठेवतो हे नक्की आणि हे या दोघांचं यश. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपल्याला यासारखे काही वायरल व्हिडियोवरील लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करावा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख वाचावयास मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक होण्यासाठी धन्यवाद ! त्याचसोबत अश्याच मजेदार व्हिडीओजसाठी आपल्या मराठी गप्पाच्या यु’ट्यु’ब चॅ’नेलला स’ब’स्क्रा’इ’ब करायला विसरू नका.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *