Breaking News
Home / मराठी तडका / आदित्यची आई आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री, बघा खऱ्या आयुष्यात क सा आहे आदित्य

आदित्यची आई आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री, बघा खऱ्या आयुष्यात क सा आहे आदित्य

सध्या झी मराठीवर एक मालिका तुफान चालू आहे. तिचं नाव आहे, ‘माझा होशील ना’. त्यातल्या आदित्य, सई आणि नयना यांच्या व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय होत आहेत. यापैकी नयना हि व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मुग्धा पुराणिक हिच्यावरील एक लेख मराठी गप्पावर काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. त्या व्यक्तिरेखेप्रमाणेच या लेखालाही तुम्ही जी प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आज आपण या मालिकेतील, मुख्य व्यक्तिरेखा – आदित्य – साकारणाऱ्या अभिनेत्याविषयी, म्हणजेच विराजस कुलकर्णी याच्या कलाप्रवासाविषयी बाबतीत थोडं जाणून घेणार आहोत. आदित्य याचं बालपण आणि संपूर्ण शिक्षण पुण्यात झालं आहे. आपण जाणता त्याप्रमाणे त्याला कलाक्षेत्राची पार्श्वभूमी हि घरातलीच लाभली आहे.

त्याच्या आई म्हणजे अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, त्याचे आजोबा म्हणजे लोकप्रिय अभिनेते कै. जयराम कुलकर्णी आणि पणजोबा म्हणजे साहित्यिक कै. गो.नी. दांडेकर. त्याचप्रमाणे विराजसचे वडील म्हणजे रुचिर कुलकर्णी यांनीही महाविद्यालयीन जीवनात अभिनय केलेला आहेच. या सगळ्यांकडून विराजसला वाङ्मय आणि कालाक्षेत्राचा वारसा लाभला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मृणालजी आणि रुचिरजी यांची एक चहाच्या ब्रँडची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. अनेकांना कदाचित कल्पना नसेल पण विराजसने त्या जाहिरातीचं शुटींग आणि इतर कामात सहाय्य केलेलं होतं. खरं पाहता आपल्यापैकी अनेकांसाठी हे नवीन असलं, तरीही विराजससाठी हे नवीन नाहीये. त्याने याधीही अभिनयासोबतच इतर जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. अगदी उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती and ती’ या सिनेमाचं घेता येईल. यात त्याने स्क्रीन रायटर म्हणून योगदान दिलं होतं. तसेच ‘रमा माधव’ या सिनेमाची संकल्पना त्याने मृणालजींना सुचवली होती.

मृणालजींसोबत जसं त्याने काम केलं आहे तसेच त्याने इतर अनेक कलाकृतींचे लेखन, दिग्दर्शनहि केले आहे. त्याची आणि त्याच्या मित्रांनी ‘Theatron Entertainment’ या संस्थेमार्फत अनेक नाटकांची, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्सची निर्मिती केली आहे. त्यात सगळ्यात जास्त उल्लेखनीय म्हणता येतील अशा कलाकृती म्हणजे भंवर, मिकी, एनॉथिमा, डावीकडून चौथी बिल्डींग हि नाटके, फरीस्ता हि शॉर्ट फिल्म, इडियट बॉक्स हि वेबसिरीज आणि बऱ्याच कलाकृती. यांतील ‘भंवर’ला थेस्पो पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच मिकी हे नाटकही खूप लोकप्रिय झालंय. नुकताच या नाटकाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रीमियर संपन्न झाला आहे. नाटकांसोबत इडियट बॉक्स हि वेबसिरीजहि या संस्थेने केलेली आहे. हिचं वैशिष्ठ्य असं कि, लेखक-दिग्दर्शक म्हणून विराजसची हि पहिली वेबसिरीज आहे.

या वेबसिरीज मध्ये मराठीतील आघाडीच्या अभिनेते आणि अभिनेत्रींनी काम केलं आहे. स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, सुनील बर्वे, मृणाल कुलकर्णी, प्रवीण तरडे हि त्यातील आघाडीची काही नावं. त्याने स्वनिर्मित कलाकृतींबरोबरच इतर कलाकृतींमध्येही कामे केली आहेत. ‘माधुरी’ आणि ‘हॉस्टेल Days’ सारख्या सिनेमांमध्ये त्याने २०१८ मध्ये काम केलं होतं. हॉर्न ओके प्लीज हीसुद्धा अशीच एक वेबसिरीज. यात त्याने लोकप्रिय अभिनेत्री इशा केसकर बरोबर काम केलेलं आहे. मालिका, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स, सिनेमा सोबत त्याने जाहिरातींसाठीही काम केलं आहे. स्टोरीटेल साठीच्या अनेक जाहिराती त्याने केल्या आहेत. एकूणच काय तर ‘माझा होशील ना’ मार्फत अनेकांना कदाचित विराजसची ओळख अगदी पहिल्यांदा झाली असेल. पण हा कलंदर कलाकार गेली आठ ते दहा वर्षे कलाक्षेत्रात स्वतःचं योगदान देतो आहे.

या सगळ्या धावपळीत तो आपल्या वाचनाचीही आवड जपत आलेला आहे. हॅरी पॉटरवर आधारित कथा त्याला सर्वात जास्त प्रिय आहेत. एका मुलाखतीत तो म्हणतो कि न चुकता दरवर्षी तो जमेल तसं या कथांचं पुन्हा पुन्हा वाचन करत असतो. वाचनासोबत त्याला काही काळ जादूचे प्रयोग करण्याची आवड होती. शाळा संपून महाविद्यालयीन जीवन सुरु होण्याच्या काळात त्याने जादूचे काही प्रयोग केले होते. ते एवढे यशस्वी झाले कि त्यातून त्याने छोटीशी कमाईसुद्धा केली होती. त्यावेळेस ती कदाचित एक आवड असेल. पण त्याने नुकताच, एका संस्थेसोबत काम करताना पुन्हा एकदा जादूचा एक ऑनलाईन प्रयोग केला. पण त्यामागे पैसे मिळवणं हे उद्दिष्ट नव्हतं. तर कॅन्स रग्रस्त मुलांना या प्रयोगाद्वारे जादूचे खेळ दाखवले गेले. त्यांच्या आयुष्यात त्या निमित्ताने थोडं हास्य पसरावं आणि आनंद यावा हि भावना होती. हा असा हरहुन्नरी विराजस सध्या ‘माझा होशील ना’ मालिकेत व्यस्त आहे. पण त्याचा एकंदर हरहुन्नरी स्वभाव बघता, येत्या काळात तो अनेक कलाकृतींमधून लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही आपल्या भेटीस येईल हे नक्की. सई आणि आदित्य हि जोडी तर प्रेक्षकांना तुफान आवडते आहे. त्याच्या यापुढील सर्व व्यक्तिरेखा आणि कलाकृतीसुद्धा प्रेक्षकांच्या अशाच पसंतीस पडोत या मराठी गप्पाकडून त्याला शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.