Breaking News
Home / मनोरंजन / आपले राष्ट्रगीत एका सुंदर आवाजात, ह्या मुलीचा आवाज ऐकून तुम्हीदेखील दाद द्याल

आपले राष्ट्रगीत एका सुंदर आवाजात, ह्या मुलीचा आवाज ऐकून तुम्हीदेखील दाद द्याल

आपली टीम विविध विषयांवर लेख लिहीत असते हे आपण जाणताच. हे लेख लिहिण्यासाठी मग त्याबद्दल उपलब्ध माहिती ही घ्यावी लागते. त्यातून जसजशा नवीन गोष्टी कळत जातात, त्याचप्रमाणे आमची टीमही प्रगल्भ होत जाते. यात अनेक वेळा विविध कलाकृतींविषयी आपण लिहीत असतो. त्यातून अनेक उमद्या कलाकारांविषयी जाणून घेतल्यावर तर अजून प्रोत्साहन मिळतं. आपणही आपलं काम उत्तमरीत्या करत राहावं यासाठी ऊर्जा मिळते.

तसेच हे कलाकार जर उदयोन्मुख असतील तर त्यांच्याकडून ही अनेक नवनवीन गोष्टी शिकता येतात. कारण त्यांची कारकीर्द बहरत असते. त्यातून मग सद्य परिस्थितीत ते कशाप्रकारे आपली कला सादर करताहेत, त्यात काळानुरूप काही बदल करताहेत का हे शिकता येतं. अगदीच बाकी काही नाही तरी त्यांची कला अनुभवणं हा ही एक सुंदर अनुभव असतो. त्यात हे कलाकार आपल्यापेक्षा ही वयाने लहान असतील तर कौतुक अजून वाढतं. अशीच एक कलाकार आहे जिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपणच काय तर खुद्द स्वर्गीय भारतरत्न गानसम्राज्ञी लता दीदी यांनीही तिचं कौतुक केलं आहे. आता ही कलाकार म्हणजे एक गायिका असणार याचा अंदाज आपल्याला आला असेलच जो बरोबर आहे.

होय, ती एक उदयोन्मुख गायिका आहे. बरं वय म्हणाल तर अजून महाविद्यालयीन काळातलं वय आहे. पण तिच्या सोशल मीडियाचा आधार घेतला तर ती दशकभराहून अधिक काळ गायन करत असावी असं लक्षात येतं. तिचा एक जुना व्हिडियो आहे ज्यात ती २०११ साली अगदी इटूकली पिटुकली असताना गाताना दिसते. या काळात तिने जी प्रगती केली आहे ती अतिशय अप्रतिम म्हणावी अशीच आहे. अशा या कलात्मक गायिकेचं नाव आहे पी. जयलक्ष्मी. काही काळापूर्वी तिचा एक व्हिडियो वायरल झाला होता. या व्हिडियोत आपल्याला जयलक्ष्मी आपल्या देशाचं राष्ट्रगीत गाताना दिसून येते. यात तिने एक प्रयोग केलेला दिसून येतो. तिने हे गीत आपल्या पद्धतीने पण गाण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात तिचं शांत सुरात हे गीत गाणं कानाला नक्कीच सुखावून जातं. अनेकांनी त्यावेळी ही जयलक्ष्मी हिचं सोशल मीडियावर कौतुक केलेलं आहे. बरं या व्यतिरिक्त ही जयश्री ही विविध गाणी गात असते. त्यात दाक्षिणात्य भाषेतील गाणी आहेतच. सोबतच हिंदी भाषेतील गाणी ही तिने गायली आहेत. तिने एका हिंदी अलबम मध्ये ही गाणं म्हंटलं आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर आपल्याला अनेकविध गाणी ऐकायला मिळतात. नुकतंच तिने एका मराठी गाण्याला ही गायलं होतं.

‘नीलकंठ मास्तर’ या चित्रपटातलं हे गाणं श्रेया घोषाल यांनी गायलं आहे आणि पूजा सावंत या आपल्या आवडीच्या नायिकेवर ते चित्रित झालं आहे. असं हे ‘अधीर मन झाले’ हे गाणं, जयलक्ष्मी हिच्या नाजूक आवाजात ऐकणं म्हणजे पर्वणीच आहे. अर्थात ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. तिच्या सोशल मीडियावर आपल्याला अशी अनेक गाणी मस्तपैकी ऐकायला मिळतात. तसेच गेल्या वर्षांत तिने केलेली उल्लेखनीय प्रगती ही अनुभवता येते. त्यामुळे येत्या काळात ही ती शिकत राहील, उत्तमोत्तम गायन करत राहील याविषयी आपसूक खात्री वाटते. अशा या गुणी गायिकेचा वर उल्लेख केलेला व्हिडियो शेअर करत आहोत. आपणही तिच्या गोड गळ्याचा आनंद घ्या. या लेखाच्या निमित्ताने जयलक्ष्मी हिला तिच्या पूढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! येत्या काळातही उत्तमोत्तम काम करत राहा ही सदिच्छा !!

चला तर मंडळी आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे. हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *