Breaking News
Home / मनोरंजन / आपल्या आजीचे पोलिसांशी वाद चालू असताना आजीला वाचवण्यासाठी ह्या चिमुकल्याने काय धाडस केले बघा

आपल्या आजीचे पोलिसांशी वाद चालू असताना आजीला वाचवण्यासाठी ह्या चिमुकल्याने काय धाडस केले बघा

मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण आपण ऐकली असेलच. काही वेळेस आपण याचा अनुभव ही घेतला असेल. आपल्या आजूबाजूस असणारी लहान किंवा तरुण मुलं जेव्हा काही उत्तम काम करतात तेव्हा नकळतपणे वर उल्लेख केलेली म्हण आठवते. तर काही वेळेस वयाच्या मानाने जबाबदारीचे दर्शन जर कोणी घडवले तरीही ही म्हण आठवते. आज हे सगळं मांडण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो. हा व्हिडियो तसा पाच वर्षे जुना आहे आणि शक्यता ही आहे की आपण हा बघितला ही असेल. पण एवढ्या वर्षांनंतर कदाचित काहीसा विस्मरणात गेला असेल. आपल्या टीमने ही हा व्हिडियो बघितला होता पण त्याची आठवण राहिली नव्हती. आज अचानक हा व्हिडियो पुन्हा दिसला आणि त्यावर लेख लिहायचं ठरलं. हा व्हिडियो आहे एका चायनीज मुलाचा. मुलगा म्हणजे त्यावेळी अगदी लहान वयात असलेल्या मुलाचा हा व्हिडियो आहे. हा व्हिडियो वायरल होण्यामागे असलेलं कारण म्हणजे या चिमुकल्याने दाखवलेली शूरता.

होतं असं या लहानग्याची आजी आणि तिथले स्थानिक पोलीस यांच्यात कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झालेले असतात. आपण या व्हिडियोत पाहू शकतो की या आजी एका सोफ्याजवळ उभ्या असतात. जवळच त्यांचा हा नातू आणि नात उभी असते. कदाचित या सोफ्यावरन आणि इतर साहित्यावरून त्यांच्यात वाद झाले असावेत. पण या दरम्यान एक पोलीस या लहान मुलाला हटकतात. कदाचित ते त्याला या वादविवादापासून दूर नेत असावेत. पण हा पठ्ठ्या तर अगदी झुंजार निघतो. त्याने हातात काही तरी पकडलेलं असतं. हाताचा आणि पायांचा वापर करत तो त्या पोलिसाला पाठीमागे सारतो. एवढासा जीव पण आपल्या आजीसोबत उभा असतो. त्याच्या या अवसानामुळे सगळेच जण हसायला लागतात. पण त्याच्यासाठी मात्र हा गंभीर विषय असतो. त्यामुळे तो त्याच्या भाषेत पोलिसांशी आणि हा व्हिडियो रेकॉर्ड करणाऱ्यांशी हुज्जत घालत असतो. ‘अरे तू आता पुढे तर येऊन दाखव’ असे एकंदर त्याचे हावभाव असतात. देहबोली तर एखाद्या मोठ्या पुरुषाने मारामारी करायला तयार व्हावं अशी असते. पण मग तो जागेवर जाऊन बसतो. जवळच त्याची बहीण भेदरलेल्या अवस्थेत दिसत असते. तर आजी त्यांची बाजू लावून धरताना दिसतात.

तेवढ्यात या व्हिडियोचा दुसरा अंक सुरू होतो. यात तर हा छोटा जेव्हा पुढे येतो तेव्हा त्याच्या हातात स्टीलचा मोठा दांडका असतो. सोबत पाठोपाठ आजीही येतात. या वेळीही त्याचा रुद्रावतार बघायला मिळतो. अगदी त्वेषाने भांडत असतो बिचारा. बिचारा म्हणण्याचं कारण त्या क्षणी सगळे जण त्याच्यावर हसत असतात. काही पोलिस तर त्याचे व्हिडियोज काढण्यात व्यस्त असतात. तेवढ्यात जवळून एक समंजस पोलीस येतो आणि त्या मुलाला त्याच जुन्या सोफ्यावर बसवण्याचा प्रयत्न करतो. पण ऐकेल तो गडी कसला. त्याच्या मनात ठाम झालेलं असतं की ही मंडळी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देणारी लोकं आहेत. त्यामुळे तो पुन्हा त्या पोलिसाला हटकतो आणि हाकलून देतो. या क्षणी व्हिडियो संपतो. पण खरं तर या मुलांचं कौतुक ही वाटतं आणि वाईट ही वाटतं. त्यांचा विषय किती गंभीर असतो याची कल्पना नाही. पण तरीही त्यावेळी त्यांना मदत करायला कोणी येत नाही याचं वैषम्य वाटतं. पण त्याचवेळी या छोट्याच्या लढाऊ वृत्तीचं, धाडसाचे कौतुक वाटत राहतं.

आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही त्याचं कौतुक वाटलं असणारच. नसेल बघितला, तर वेळ मिळेल तसा नक्की बघा. तसेच आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय आणि सकारात्मक सूचना कळवत राहा. त्यासाठी कमेंट्स सेक्शनचा वापर करा. आपण आमच्या टीमच्या लेखांना देत असलेल्या अप्रतिम पाठींब्याबद्दल मनापासून धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *