Breaking News
Home / मनोरंजन / आपल्या देशात टॅलेंटची कमी नाही, ह्या मुलाने केलेला डान्स पाहून तुम्हीही कौतुक कराल

आपल्या देशात टॅलेंटची कमी नाही, ह्या मुलाने केलेला डान्स पाहून तुम्हीही कौतुक कराल

आपल्या देशात टॅलेंट एकदम ठासून भरलेली लोकं मोठ्या प्रमाणात आहेत हे आपण जाणतोच. या टॅलेंटेड लोकांना आता सोशल मीडियाच्या रूपाने हक्काचं व्यासपीठ मिळू लागलं आहे. बरं यात विविध प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असल्याने, एका नाही तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर करत जगाच्या कानाकोपऱ्यात यामुळे पोहोचता येतं. याचा अनेकांनी फायदा उठवत अनेक रियालिटी शोज, कार्यक्रम इत्यादींमध्येही भाग घेतला आहे हे आपण जाणतोच. पण प्रत्येकाच्या बाबतीत तसं होतच असे नाही. पण तरीही चिंता नाही. आपली टीम ही नेहमीच टॅलेंटची कदर करत आलेली आहे आणि उदयोन्मुख कलाकारांविषयी लिहीत आलेली आहे. आजही आपल्या टीमने एक व्हिडियो बघितला जो यातील कलाकाराच्या उत्तम कलेची साक्ष देतो. आम्हाला तेव्हाच वाटलं की याविषयी आपल्या वाचकांना कळायला हवं.

हा व्हिडियो आहे अशा एका ठिकाणचा जेथे काही तरी समारंभ होता. येथे काही कारणानिमित्त आलेल्या एका कलाकाराने अप्रतिम डान्स केला होता त्याचा हा व्हिडियो आहे. या कलाकाराचा डान्स बघून आपली टीम तर प्रभावित झाली. त्यांच्या विषयी माहिती मिळते का ते पाहिलं, पण उपयोग झाला नाही. हरकत नाही. निदान त्यांच्या डान्सविषयी तर लिहू शकतो म्हणून हा लेख आकारास येतो आहे.

तर हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा हे डान्सर दादा आपल्याला समोर उभे असलेले दिसून येतात. त्यांच्या समोर काही जण उभे असावेत असा अंदाज बांधतो आणि व्हिडियोत नंतर तो खरा असल्याचं कळतं. असो. तर व्हिडियो सुरू होतो तेव्हाच एक लोकप्रिय गाणं सुरू झालेलं असतं. प्रभुदेवा आणि ए आर रहमान या जोडीचं गाजलेलं, ‘मुकाबला’ हे ते गाणं. रहमान यांचं अप्रतिम संगीत आणि त्यास साजेल असा अप्रतिम डान्स करणारे प्रभुदेवा हे समीकरण कोण विसरेल बरं. त्यातही या गाण्याच्या मूळ व्हिडियोत दाखवले गेलेले स्पेशल इफेक्स्ट तर स्मरणातून जात नाहीत. या सगळ्यांची पुन्हा एकदा आठवण आजच्या व्हिडियोमुळे होते. तर या व्हिडियोत गाणं सुरू झाल्याबरोबर दादा डान्स करू लागतात. सुरुवातीच्या काही क्षणांतच कळून येतं की हे दादा डान्सच्या अगदी प्रेमात पडले आहेत. कारण त्यांचं लक्ष त्या गाण्यातील शब्द आणि त्यांचा डान्स यावर केंद्रित झालेले असतात. याची अनुभूती येते जेव्हा त्यांचं पदललित्य बघायला मिळत. त्यांचे पाय अगदी आखीवरेखीव पद्धतीने हलतात. जणू काही एखादा प्रोफेशनल कोरिओग्राफरच आहे. जबरदस्त वाटतं त्यावेळी. हीच प्रतिक्रिया तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची असते. त्यातूनच मग एक गृहस्थ आपल्याकडील काही पैसे या दादांवर ओवाळून टाकतात. समोरच्या कलाकाराचं कौतुक करण्याची तशी रीत उत्तर भारतातील अनेक व्हिडियोजमध्ये दिसून येते. आपल्याकडेही अनेक वेळेस अस केलं जातं.

पण एखादा कलाकार त्याच्या कलेत एकदा का गुंग झाला की त्याला पैसे वगैरेचं काही पडलेलं नसतं. तो आणि त्याची कला एवढंच त्याच्या लक्षात असतं. इथेही तेच घडून येताना दिसतं. कारण नाचता नाचता, हे दादा एक स्टेप अशी करतात जिथे ते खाली झुकत जातात. त्यामुळे खिशात नीट न ठेवलेले बक्षिसी खाली पडते. त्यांच्या आजूबाजूला असणारे दुसरे दादा हे पैसे त्यांच्या खिशात हे पैसे पुन्हा टाकण्याचा प्रयत्न करतात. पण कसचं काय. या दादांचा अजिबात लक्ष नसतं. ते आपले डान्स मध्ये व्यस्त असतात. शेवटी हे दुसरे दादा ते पैसे स्वतः कडे ठेवत बाजूला होतात. ते त्यांनी या डान्सर दादांना नक्की दिले असणार. इथे या दादांचा डान्स रंगात आलेला असतो. ४५ व्या सेकंदानंतर त्यांचं ते अफलातून पदललित्य पुन्हा एकदा बघायला मिळत. एखाद्या सामान्य व्यक्तीने हे चट्कन आत्मसात करणं तेवढं सोप्पं नाही. याचा अर्थ या दादांना डान्सची नक्कीच सवय असणार. आपल्या मनात हे विचार येत असतात आणि त्यांचा डान्स अजून पहावा असं वाटत असतं.

पण प्रत्येक गोष्टीला वेळेची मर्यादा असतेच. इथेही तेच होतं. हा व्हिडियो ५६ सेकंदात संपतो. अजून थोडा वेळ डान्स चालला असता तरी चाललं असतं अस वाटतं. पण हरकत नाही. आपण या दादांचा जो काही डान्स पाहतो तो आपल्याला मनापासून आवडून जातो हे नक्की. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्यालाही आवडला असणार हे नक्की.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम सातत्याने विविध विषयांवर लेखन करत आपलं मनोरंजन करत आली आहे आणि यापुढेही करत राहील. आपण ही आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत आलेले आहात आणि यापुढेही देत राहाल हे नक्की. त्यासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद. लेख वाचत राहा, शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.