Breaking News
Home / खेळ / आपल्या महिनाभराच्या पगारापेक्षा सुद्धा जास्त कमावतात एका दिवसात अंपायर, पीच बनवणारे

आपल्या महिनाभराच्या पगारापेक्षा सुद्धा जास्त कमावतात एका दिवसात अंपायर, पीच बनवणारे

फक्त खेळाडूंनाच नाही मिळत मोठी रक्कम

क्रिकेटच्या दुनियेत बीसीसीआय म्हणजे ‘भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड’ हे सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. बीसीसीआय आपल्या खेळाडू पासून क्रिकेट कोच पर्यंत ह्यासर्वांवर खूप पैसा खर्च करते. BCCI बांधील खेळाडूंना ४ ग्रेड मधे विभागणी करते. A+, A, B ,C याप्रमाणे A+ ग्रेड वाल्या खेळाडूंना वर्षाला ७ करोड रुपये, A ग्रेड वाल्या खेळाडूंना ५ करोड रुपये, B ग्रेड खेळाडूंना ३ करोड रुपये आणि C ग्रेड वाल्या खेळाडूंना 1 करोड रुपये दिले जातात. परंतु आपल्याला माहिती आहे का? खेळाडूं व्यतिरिक्त तेथील इतर लोकांना किती मानधन असते ते, म्हणजेच कोच, स्कोरर आणि इतर लोकांना किती मानधन मिळते.

२०१८ पासून दुप्पट केली फी

तुमच्या माहिती साठी सांगतो की, बीसीसीआयच्या प्रशासक समितीने कोणत्याही मॅच मधे महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सर्व सपोर्टींग स्टाफचा पगार एप्रिल २०१८ पासून दुप्पट केला. या सपोर्टींग स्टाफचा पगार २०१२ पासून वाढवला नव्हता. परंतू आता असे नाही.

अंपायरला किती पगार मिळतो

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड जवळ अंपायरची संख्या १०५ एवढी आहे. यापैकी २० अम्पायरची एक कॅटेगरी आहे. या अम्पायर्सला मॅचच्या वेळी ४०,००० रुपये मिळतात, तसेच T-20 मॅचच्या वेळी प्रत्येक मॅचला २०,००० रुपये मिळतात. टॉप 20 च्या व्यतिरिक्त इतर ८५ अम्पायर्सना T-20 मॅच साठी १५,००० रुपये प्रत्येक मॅचला मिळतात आणि वनडे, टेस्टसाठी प्रत्येक दिवशी ३०,००० रुपये मिळतात. त्याशिवाय अम्पायर्सना १५०० रुपये दैनिक भत्ता मिळतो.

जोनल क्युरेटर

कोणतीही मॅच सुरु होण्याच्या अगोदर आपण एक व्यक्तीला टीव्हीवर पाहतो, जो पीच विषयी माहिती देत असतो. त्याला पीच क्युरेटर किंवा जोनल क्युरेटर म्हणतात. त्याचे काम असते पीच विषयी माहिती देणे. पीच बॅटमनसाठी योग्य आहे कि, बॉलरसाठी योग्य आहे. या व्यक्तीवर पीच तयार करण्याची जबाबदारी असते. जोनल क्युरेटर्सला वार्षिक १२ लाख इतका पगार दिला जातो. त्याच्या साहाय्यक क्युरेटरला ८.४ लाख एवढा पगार असतो.

मॅच रेफरी

बीसीसीआय जवळ ५८ रेफरी आहेत. जे फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेले पूर्वीचे खेळाडू. यांना एकदिवसीय आणि टेस्ट मॅचसाठी मिळणारी एकदिवसाची फी ३०,००० रुपये आणि तर T-20 च्या प्रत्येक मॅचची फी १५,००० रुपये दिली जाते. बाहेरून येणाऱ्या रेफरीना अम्पायर्स प्रमाणे १५०० रुपये दैनिक भत्ता आणि लोकल रेफरीना १००० डेली अलाऊन्स मिळतो.

मॅच स्कोरर

स्कोररचे काम मॅचचे स्कोर सांगणे, बीसीसीआयच्या जवळ १५३ रजिस्टर स्कोरर आहेत. स्कोररची जबाबदारी असते की, मॅचच्या आकड्यांचा हिशेब ठेवण्याची. कोणत्या खेळाडूने किती धावा केल्या, किती विकेट घेतल्या, किती मॅच खेळल्यात, कोण कोणते रेकॉर्ड आहेत इत्यादी. यांना वनडे आणि टेस्ट मॅचसाठी १०,००० रुपये दिले जातात. तसेच T-20 मॅच साठी ५,००० रुपये मिळतात. आणि जर लोकल असतील तर १००० रुपयाचा भत्ता दिला जातो.

व्हिडिओ एनालिस्ट

व्हिडीओ एनालिस्टचे काम दोन्ही टीमच्या मॅचचे विडिओ एनालिसिस करावे लागते. म्हणजे माहिती काढणे कि, बॉलर आणि बॅटस्मनची ताकद आणि त्यांचे विक पॉइंट्स माहिती करून घेणे. विडियो एनालिस्टचे काम यासाठी महत्वपूर्ण आहे. कारण, याच्या आधारावर मॅचची रणनिती आखता येते.

बीसीसीआयच्या जवळ १८५ विडियो एनालिस्ट आहेत. वनडे आणि टेस्ट मॅचसाठी यांची फी प्रत्येक दिवशी १५,००० रुपये असते. साहाय्यक एनालिस्टला १०,००० रुपये प्रत्येक दिवशी दिले जातात. T-20 च्या प्रत्येक मॅचसाठी विडियो एनालिस्टला ७,५०० रुपये आणि सहाय्यक एनालिस्टला ५,००० रुपये मानधन मिळतो. यांना देखील दैनिक भत्ता मिळतो. बाहेरच्या एनालिस्ट साठी १,५०० रुपये आणि स्थानिक एनालिस्ट १००० रुपये भत्ते मिळतात.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *