Breaking News
Home / मनोरंजन / आपल्या वजनापेक्षा जास्त वजन उचललं कि मग असं होतं, व्हिडीओ पाहून हसू थांबणार नाही

आपल्या वजनापेक्षा जास्त वजन उचललं कि मग असं होतं, व्हिडीओ पाहून हसू थांबणार नाही

आमचा एक मित्र आहे. ऊन असो वा पावसाळा असो वा थंडी असो. हा साहेब, सकाळी उठणार आणि मस्तपैकी धावून येणार. त्यासाठी वेळ पडली तर ,अगदी सकाळी सकाळी उठणार. त्याची ही जिद्द आणि चिकाटी पाहून आम्हाला नेहमीच त्याचं कौतुक वाटतं. आणि स्वतःवर हसायला येतं. कारण तो सोडला तर बाकीचे एक तर ढेरपोटे आहेत किंवा सुकडे बोंबील आहेत. अर्थात आम्हीही व्यायाम करायचा प्रयत्न केला. पण कसलं काय. सातत्य नसेल तर कुठे काय होणार आहे.

अर्थात त्यामुळे आपण नेहमी आदर्श घ्यावा तो आमच्या मित्रा सारख्यांचा. आमच्या सारख्यांचा नाही. आणि आम्ही बघितलेल्या व्हिडियोतील एका व्यक्तीचा तर नाहीच नाही. म्हणजे बाकी बाबतीत आपण त्यांचा आदर्श घेऊ शकता. पण त्यांनी एका व्हिडियोत ज्या पद्ध्तीने व्यायाम केलाय, तो पाहता, ‘नको रे बाबा’ हीच भूमिका बरोबर वाटते. आता तुम्ही म्हणाल, एवढं काय त्यात? व्यायाम करताना जास्तीत जास्त काय केलं असेल त्याने? जास्तीचा व्यायाम केला असेल. जास्त जोरात केला असेल. पण इथेच तर खरी मेख आहे ना महाराजा. कारण, कोणतीही गोष्ट करा, पण ती मर्यादेत करा हे महत्त्वाचं असतं नाही का. त्यातच हे दादा मार खातात. अर्थात इतर कोणी तो द्यायला यायची गरज नसते.

कारण व्हिडियो सुरू होतो तेव्हा हे दादा एका ठिकाणी उभे असतात. बहुधा त्यांच्या राहण्याची जागा असावी. कारण जवळच सगळी संसार साधनं पडलेली आणि विखुरलेली असतात. या सगळ्या गोंधळात हे दादा, समोर वजन ठेऊन उभे असतात. बारबेलवर वजन व्यवस्थित लागलंय ना हे बघत असतात. स्वतः बारीक अंगयष्टी असलेले असतात. त्यामुळे वजन वाढवावं आणि पिळदार शरीरयष्टी असावी यासाठी हा व्यायाम असणार हे स्पष्ट असतं. त्यासाठी अगदी जोशात ते समोरच वजन उचलतात. आता सहसा हा व्यायाम करताना आपण हे वजन चेहऱ्याच्या जवळ आणत आणि पुन्हा खाली नेतो. पण नाही ना. हे दादा, ‘आज कुछ तुफानी करते हैं’ मूड मध्ये असतात. त्या नादात अख्खं वजन डोक्याला समांतर धरतात. पण ते पेलण्याची ताकद आणि तो समतोल साधता तर यायला हवा. तिथेच सगळा मामला फिस्कटतो. वजन मागच्या बाजूला जास्त होतं. आता पुढे काय घडलं असेल हे आपल्याला कळलं असेलच. पण नुसत्या मनाच्या कल्पना कशाला.

आमच्या टीमने हा व्हिडियो खाली शेअर केला आहे. हा लेख संपल्यावर आपण हा व्हिडियो बघू शकता. अर्थात यातून एक गोष्ट तर नक्की कळते. ती म्हणजे व्यायाम करताना झेपेल, जमेल तेवढाच करावा. व्यायाम म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे. कधी अंगाशी आला तर बराच खेळखंडोबा करून जाऊ शकतो. तेव्हा व्यायाम मग तो कोणताही असो, तो करताना काळजी घ्यावी हीच विनंती. त्यासाठी म्हणून या लेखाचा घाट घातला.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला उपयुक्त वाटला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.