Breaking News
Home / बॉलीवुड / आपल्या वडिलांच्या लग्नात या स्टार्सनी खूप धम्माल केली, नंबर ३ वाली अभिनेत्री तर दोन वेळा बनलाय व्हराडी

आपल्या वडिलांच्या लग्नात या स्टार्सनी खूप धम्माल केली, नंबर ३ वाली अभिनेत्री तर दोन वेळा बनलाय व्हराडी

“तू तुझ्या बापाच्या लग्नात आला आहेस का?” असा डायलॉग आपण रोजच्या जीवनात खूप वेळा ऐकलं असेल. परंतु आपल्या जीवनात जरी असे घडले नसले तरी असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांच्या आयुष्यात असे क्षण आले आहेत. खरंच असे कलाकार आहेत ज्यांनी आपल्या वडिलांच्या लग्नात धम्माल केलेली आहे. बॉलिवूड मधे असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी एका पेक्षा जास्त वेळा विवाह केला आहे आणि आपले जीवन आनंदाने जगत आहेत. यात असेही काही आहेत ज्यांनी मुले झाल्यांनंतर सुद्धा दोन किंवा तीन वेळा लग्न केले आणि आयुष्याला नवीन वळण दिले. आम्ही तुम्हाला अशा मुलां विषयी सांगणार आहोत ज्या मुलांनी आपल्या पालकांच्या लग्नात खुप मजा मस्ती केली. चला तर पाहूया कोण कोण आहेत या यादीत. चित्रपट कलाकारांची गोष्ट वेगळीच असते, त्यांचे असे म्हणणे आहे. ज्याच्याशी आपलं मन जुळतं त्यालाच आपला जीवनसाथी बनवले पाहिजे. प्रेम निर्मळ आहे आणि ते योग्य वेळ आल्यानंतर योग्य जीवनसाथी सोबत होते. चला तर पाहूया कोण कोण अशी मुले आहेत जी आपल्याच पालकांच्या लग्नात नाचली.

सारा अली खान

बॉलिवूडची जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री आपल्या चित्रपटासाठी नेहमी चर्चेत असते. साराचे वडील सैफ अली खान आणि अमृता सिंगने विवाह केला होता. सैफची पहिली बायको अभिनेत्री अमृता सिंग जी साराची आई आहे. पण २००५ मधे तिच्याशी घटस्फोट घेऊन सैफने साल २०१२ मधे करीना कपूर बरोबर दुसरे लग्न केले. सैफ आणि करिनाच्या विवाहात सैफची दोन्ही मुले सारा आणि इब्राहिम उपस्थित होते. सैफ ला पहिल्या बायको पासून २ मुले आहेत. तर करीना पासून तैमूर नावाचा मुलगा आहे. तैमूरची लोकप्रियता सध्या खूपच वाढत चालली आहे.

अर्जुन कपूर

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर ह्यांनी श्रीदेवी सोबत दुसरा विवाह केला होता. त्यावेळी त्यांची पहिली पत्नी आणि दोन मुले, अर्जुन कपूर आणि अंशूला तेथे उपस्थित होते. अर्जुन कपूर तेव्हा पासून श्रीदेवीचा द्वेष करायचा परंतु श्रीदेवीच्या देहांता नंतर तिच्या दोन्ही मुलींना त्याने भावाचे प्रेम दिले. बोनी कपूर ह्यांना पहिल्या पत्नी मोना शौरी ह्यांच्या पासून अर्जुन आणि अंशुला हि दोन मुले आहेत. तर दुसरी पत्नी अभिनेत्री श्रीदेवी पासून जान्हवी आणि खुशी ह्या दोन मुली आहेत.

सलमान खान

बॉलिवूडचे दबंग सलमान खान आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. त्याचे वडील सलीम खानने सलमानची आई सलमा बरोबर प्रेम विवाह केला होता. या दोघांना चार अपत्ये आहेत. सलमान, अरबाज, अलवीरा, सोहेल. नंतर सलीमने बॉलिवूड अभिनेत्री हेलन सोबत विवाह केला. आणि सलीम खानच्या दोन्ही पत्नी सोबत राहतात. सलीम खान ह्यांना पहिल्या पत्नी पासून ४ मुले झाली. तर अभिनेत्री हेलन हिने अर्पिता नावाच्या मुलीला दत्तक घेतले.

पूजा बेदी

अभिनेत्री पूजा बेदी आपल्या वडिलांच्या विवाहात दोन वेळा उपस्थित होती. पूजा बेदी हि लोकप्रिय अभिनेता कबीर बेदी ह्यांची मुलगी आहे. कबीर बेदी ह्यांनी तीन लग्न केले आणि त्यांची तिसरी पत्नी त्यांच्या वयाच्या अर्ध्या पेक्षा कमी वयाची आहे. पूजा बेदी आपल्या वडिलांच्या लग्नात दोन वेळा उपस्थित राहणारी पहिली कलाकार आहे. कबीर बेदी ह्यांना ऍडम, पूजा आणि सिद्धार्थ हि तीन मुले आहेत. त्यापैकी पूजा आणि सिद्धार्थ हे पहिली बायको प्रोतिमा बेदी हिच्यापासून झाली आहेत. कबीर बेदी ह्यांची मुलगी पूजा बेदी हि तिची तिसरी सावत्र आई परवीन दुसांज हिच्यापासून ५ वर्षांनी मोठी आहे. आता परवीन दुसांज ४४ वर्षाची असून तिची सावत्र मुलगी पूजा बेदी ४९ वर्षांची आहे.

सनी देओल

बॉलिवूडचे सगळ्यात ताकदवान अभिनेता आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतो. पण त्याच्या वडिलांनी जेव्हा त्यांच्या समोर हेमा मालिनी सोबत विवाह केला तेव्हा सगळे आश्चर्य चकीत झाले. धर्मेंद्रने पहिला विवाह प्रकाश कौर सोबत केला होता. त्या दोघांची चार अपत्ये आहेत. पण नंतर हेमा मालिनीवर प्रीत जडली आणि तिच्या सोबत विवाह केला आणि संसार मांडला. धर्मेंद्रला आपली पहिली बायको प्रकाश कौर हिच्यापासून २ मुले झाली सनी आणि बॉबी. तर दुसरी बायको हेमा मालिनी हिच्याकडून इशा आणि अहाना ह्या दोन मुली आहेत.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *