९० च्या दशकातील असो किंवा २००० च्या दशकातील असो, ज्या अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे, त्यापैकी काही तर निनावी आयुष्य जगत आहेत, तर काही लग्न करून करून संसार सांभाळत आहेत. त्याच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ग्रेसी सिंग. जिने आमिर खान सोबत ‘लगान’ चित्रपटाने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. ग्रेसी चा जन्म २० जुलै १९८० मध्ये नवी दिल्लीत झाला. गेल्याच महिन्यात तिचा जन्मदिवस साजरा झाला. काही काळापासून ग्रेसी बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. आता बातमी आहे कि आमिर खान सोबत पहिल्याच चित्रपटात रोमान्स करणारी अभिनेत्री आता संन्यासी बनवून आपले आयुष्य घालवत आहे. साल १९९७ मध्ये झी टीव्हीवर येणाऱ्या ‘अमानत’ ह्या लोकप्रिय सीरिअल मध्ये ग्रेसी सिंगने ‘डिंकी’ ची भूमिका निभावली होती.
ह्यानंतर काही सीरिअल केल्यानंतरच तिला ‘लगान’ चित्रपटाची ऑफर मिळाली होती. निर्देशक आशुतोष गोवारीकर ‘लगान’ चित्रपटासाठी क्लासिकल डान्स करणाऱ्या अभिनेत्रीच्या शोधात होता आणि त्याचा हा शोध अमानत सिरियलची डिंकी वर येऊन थांबला. ऑडिशनसाठी जेव्हा ग्रेसी पोहोचली तेव्हा शेकडो मुलींमध्ये तिला निवडले गेले आणि ह्या चित्रपटानंतर तर असे वाटले कि तिचे करिअर बनले, आता ती सीरिअलमध्ये दिसणार नाही. कारण ‘लगान’ चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता आणि ग्रेसीच्या अभिनयाचे सुद्धा कौतुक झाले होते. एका मुलाखतीत ग्रेसी सिंगने सांगितले होते कि, तिला क्लासिकल डान्सर बनायचे होते, परंतु ती अभिनेत्री बनली. तिचे स्वप्न होते कि बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफच्या रूपात तिचे नाव व्हावे. ह्यामुळे तिने लगान चित्रपटाचे ऑडिशन कोरिओग्राफर म्हणून दिले.
परंतु तिला ह्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून निवडले होते. ग्रेसी सिंगने सांगितले कि, प्रकाश झा च्या ‘गंगाजल’ चित्रपटात तिने अजय देवगण सोबत काम केले होते. परंत्तू ह्या चित्रपटात तिला खूप कमी रोल मिळाला होता, त्यामुळे खूप नुकसान झाले होते. साल २००४ मध्ये ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ मध्ये सुद्धा संजय सोबत ग्रेसी सिंग दिसली आणि ह्या रोलचा सुद्धा तिला काही फायदा झाला नाही. चित्रपट न मिळाल्याने ग्रेसी सिंग ने बी ग्रेड चित्रपटात काम करणे चालू केले आणि २००८ साली तिचा कमाल खान सोबत ‘देशद्रोही’ चित्रपट आला. चित्रपटात पुढे काम न मिळाल्यामुळे ग्रेसी सिंगने पुन्हा टीव्हीचा मार्ग धरला. आणि तिला अनेक वर्षानंतर संतोषी माँ सीरियलमध्ये मुख्य भूमिका मिळाली. आपल्या ह्या भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली.
साल २००९ मध्ये ग्रेसी सिंगने एक डान्स अकॅडमी सुरु केली होती. जिथे मुलांना क्लासिकल डान्स शिकवले जाते. सध्या ह्या दिवसांत ग्रेसी सिंग अध्यात्मिक प्रवचनात वेळ घालवत आहे. काही महिन्या अगोदरच तिने ब्रम्हकुमारी अत्ध्यात्मिक संघटनाची सदस्यता मिळवली असून ती तिचा जास्त वेळ अध्यात्म ट्रेनिंग घेण्यात आणि देण्यात घालवत आहेत. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार ब्रह्मकुमारी संस्थेची सदस्य बनण्याच्या कारणामुळे ग्रेसी सिंग लग्न करत नाही आहे. ग्रेसीने स्वतः सांगितले कि तिचे स्वतःसाठी कोणता प्लॅन नाही आहे. घरातले लग्नासाठी विचारात असतात, परंतु आता पर्यंत मी ह्या गोष्टीबद्दल विचार केला नाही आहे.