Breaking News
Home / ठळक बातम्या / आयपीएस अधिकाऱ्याला ट्रक क्लिनर समजून लाच मागू लागले पोलिस कर्मचारी, बघा त्यानंतर काय घडलं

आयपीएस अधिकाऱ्याला ट्रक क्लिनर समजून लाच मागू लागले पोलिस कर्मचारी, बघा त्यानंतर काय घडलं

मध्य प्रदेश मध्ये आयपीएस अधिकाऱ्याने अवैधप्रकारे वसुली करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पकडण्यासाठी एका ट्रक क्लिनरचे रूप धारण केले आणि त्यांना रंगेहाथ पकडले. ग्वालियर येथील आयपीएस असलेल्या अधिकाऱ्याजवळ काही काळापासून टोल प्लाझा येथे अवैध प्रकारे वसुली करण्याबद्दल खूप तक्रारी येत होत्या. त्यानंतर ह्या अधिकाऱ्याने लाच घेणाऱ्या पोलिसांना पकडण्यासाठी एक प्लॅन बनवला आणि ह्या प्लॅननुसार आयपीएस अधिकारी ट्रक क्लिनर बनून चेक नाक्यावर वर पोहोचले. ह्या आयपीएस अधिकाऱ्याला ट्रक क्लिनरच्या रूपात पाहून कुणालाही त्यांच्यावर शंका आली नाही आणि ह्या अधिकाऱ्याचा समोरच ड्युटीवर असेलेले पोलीस कर्मचारी लाच मागू लागले.

ग्वालियर येथील एसपी अमित संघी ह्यांच्याजवळ शहरात वाढत असलेल्या अवैध वसुलीबद्धल खूप वेळापासून बातम्या येत होत्या. परंतु त्यांच्याजवळ अवैध वसुलीबाबत कोणतेच पुरावे नव्हते. पोलिसांनी सुद्धा अनेकवेळा कारवाई केल्या, परंतु वसुलीच्या तक्रारी कमी झाल्या नाहीत. वाढत्या तक्रारी पाहून एसपी ह्यांनी ह्या घटनेचा तपस करण्याची जबाबदारी ग्वालियरच्या पाणियार ठाण्यातील प्रशिक्षणार्थी आयपीएस मोती-उर-रहमान ह्यांना दिली. त्यानंतर आयपीएस मोती-उर-रहमान हे स्वतः ट्रक क्लिनर बनून वेळेवर पोहोचले. आयपीएस मोती उर रहमान ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते एका ट्रक मध्ये बसून ग्वालियर येथील विक्की फॅक्टरीच्या चौकात पोहोचले. जेथे चेकनाका होता. ह्या चेकनाक्यावर काही पोलिसकर्मचारी तैनात होते. येथे उपस्थित असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांचा ट्रक अडवला आणि ट्रकच्या आत हात टाकत पैसे मागितले. जसे त्या पोलीसकर्मचाऱ्याने पैसे मागितले तसे आयपीएस मोती हे ट्रक मधून खाली उतरले आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला धडा शिकवला.

आयपीएस अधिकाऱ्याला समोर पाहून वसुली करणाऱ्या पोलिसकर्मचाऱ्यांचे हाथच थंड पडले आणि ते सगळे त्यांची क्षमा मागू लागले. आयपीएस ह्यांनी तिथून लगोलग एसपीला फोन केला आणि संपूर्ण घटनेची माहिती दिली. ज्यानंतर चार पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड केले गेले. आयपीएस मोती ह्यांनी ह्या घटनेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, “कि रात्री साडेबाराच्या जवळपास ते विक्की फॅक्टरीच्या चौकात पोहोचले होते. जिथे सत्यवान सिंह, रवींद्र कुशवाह, थान सिंह यादव आणि मुकेश शर्मा नावाचे पोलिसकर्मचारी तैनात होते. हे चारही पोलीस कर्मचारी इथून जाणाऱ्या वाहनांकडून अवैध प्रकारे वसूल करत होते. जेव्हा त्यांनी माझी पण वसुली करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पकडलं. ज्यानंतर चौघांची माहिती रात्रीच ग्वालियर येथील एसपी अमित सांघी ह्यांनी दिली आणि त्यांच्या सांगण्यानुसार ह्या कर्मचाऱ्यांना सस्पेंड केले गेले.”

(फोटोत : आयपीएस अधिकारी मोती-उर-रहमान)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *