आयुष्मान खुराना ने ‘विक्की डोनर’ ह्या चित्रपटाने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ह्या चित्रपटामुळे त्याला एक ओळख मिळाली होती. ह्याशिवाय २०१८ हे साल त्याच्यासाठी नशीबवान ठरले. गेल्यावर्षी त्याचे ‘अंधाधून’ आणि ‘बधाई हो’ हे दोन चित्रपट रिलीज झाले आणि दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. आयुष्मान एक चांगला अभिनेता तर आहेच याशिवाय एक चांगला वडीलही आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या जीवनातील काही रहस्य सांगणार आहोत. ते कदाचित तुम्ही याआधी कधीही ऐकलेले नसतील. आयुष्यमान आपल्या कुटुंबियांना या सगळ्या गोष्टींपासून पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने काही दिवसांपूर्वीच खुलासा केला कि त्याच्या मुलांना त्याचे चित्रपट पाहण्याची परवानगी नाही आहे.
पण एका मुलाखतीत त्यांनी आपल्या नटखट मुलांविषयी काही गोष्टी सांगितल्या, मुलांपासून लपवलेल्या रहस्या विषयी सांगितले. आयुष्यमान पुढे म्हणाला, मी माझ्या मुलांना माझा आजपर्यंत एकही चित्रपट दाखवला नाही, कारण त्यात चुंबनदृश्ये असतात. माझ्या मुलांनी हे सगळं पाहण्याची ही वेळ नाही. त्यांनी त्यांच्या आईशिवाय दुसऱ्या कोणत्याही बाई सोबत रोमांस करताना बघणे मला पटत नाही. ते या सर्वांसाठी अजून खूप लहान आहेत. त्यांना ह्या गोष्टी समजू शकत नाही. त्याची मुले विराजवीर खुराना आणि वरुष्का खुराना विषयी बोलताना आयुष्यमान यांनी सांगितले, “मी त्यांना हिरो म्हणून आवडत नाही. तर त्या दोघांना वरुण धवन आणि टायगर श्रॉफ हिरो म्हणून आवडतात.
वरूण आणि टायगर दोघांच्याही भन्नाट अभिनय आणि नृत्याचे ते दिवाने आहेत. ते दोघे वरुण आणि टायगर श्रॉफला आपला रोल मॉडल मानतात. आयुष्यमान पुढे म्हणाला की, तो यशाच्या शिखरावर असून आपल्या मुलांचे बालपण मिस करतात. कारण विराजवीर आणि वरुष्का जेव्हा छोटे होते तेव्हा त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होणारे होते. त्यामुळे त्याला मुलांबरोबर वेळ घालविणे जमले नाही. या गोष्टीसाठी त्याला खूप वाईट वाटते. ह्याशिवाय आयुष्यमानने अजून कारण सांगितले ज्यामुळे त्याच्या मुलांना चित्रपट पाहण्याची मनाई केली आहे. त्याने सांगितले कि ते आता मला स्टार असल्यासारखे वागवत नाही. ज्याप्रकारे फोटोग्राफर माझ्या मागे येतात, हे पाहून माझ्या मुलांना मी स्टार आहे हे माहिती आहे. अगोदर हे सर्व त्यांच्यासाठी विचित्र होते परंतु आता ह्या सर्वांची त्यांना सवय झाली आहे.