Breaking News
Home / मनोरंजन / आयुष्य जगावं तर असं… गावाकडच्या आजोबांच्या कुस्तीचा व्हिडीओ होतोय वायरल

आयुष्य जगावं तर असं… गावाकडच्या आजोबांच्या कुस्तीचा व्हिडीओ होतोय वायरल

मैत्री अशी असावी की ज्यामुळे समारोच्याच्या डोळ्यात हसून हसून इतकं पाणी येईल. की त्याला आपल्याकडं असा मित्र का नाही याचं एकून हेवा वाटलं. आता ह्यो तात्या आणि मामाच्या मैत्रीचा एक व्हीडिओ तर बघा. तुम्हाला सुद्धा म्हातारपणात तरुण झालेल्या तात्या आणि मामांच्या या किश्शामुळं फार बरं वाटेल, एकदम मातीत लोळावं तसं अगदी एकमेकांना लहान पोरं लोळवतायंत तसं पार लोळवून लोळवून पार काथ्या कुट करुन टाकलायं मित्रांनी. दोस्तो कमाल हाय या पठ्ठ्यांची, गडी कुणाला बी आयकनात. काय करावं लगा. असं कुणी कुणाच्या पोटावर बसतंयं व्हयं. काही लोकं उगीच लहान पणात मोठी होऊन बसतात. उगाच मोठं झाल्याचं सोंग आणून बसतात. पण काका तात्यांनी आपल्यातलं बालपण असं जपून ठेवलंयं की बघणाऱ्यांनाही लहान झाल्यासारखं वाटू लागतंयं. लहानपण देगा देवा, मुंगीसाखरेचा रवा, असं संत तुकारामांनी शेकडो वर्षांपूर्वी का लिहून ठेवलंयं. ते का ते हा व्हीडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल.

त्यांच्या या बालपणात रमलेल्या या तात्या मामा आणि तरीही इतकं बेंबीच्या देठापासून कुस्ती लढवतायतं म्हटल्यावर बघायला सगळा गाव तर जमणार ना. त्यांच्या या सगळ्या गोष्टीत बाकीचं राहिलं बाजूला पण गावातल्या पोरांनी तात्या आणि मामाला इंटरनेटवर एवढं व्हायरल केलं एवढं व्हायरल केलं की लोकं आता त्यांना पुन्हा पुन्हा कुस्तीसाठी सुपारी देण्यासाठी बोलावू लागलेत. त्यांच्या याच मस्तीत कुस्तीनं सगळ्या गावाला आरारारा पार याड लावून ठेवलंयं. एकमेकांना मातीत लोळवण्याचा त्यांचा हा प्रयोग हसून हसून पार येडं होण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रातील मातीतच कुस्तीचा एक बाज रोवलेला आहे. तो अशा तात्या मामाच्या खेळातून असाच बाहेर येत असतो फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना क्लबमध्ये खेळणाऱ्यांना हा मामा तात्यांचा खेळ कधी समजणारा नाही. त्यांच्या दृष्टीकोनातून हा सगळा कसला तरी पोरखेळ वाटेल. काका तात्या मामांच्या या सगळ्या खेळात त्यांना एक गोष्ट लक्षात आली असेल की तात्यांनी मामाला पार चितपट करुन सोडलंयं. त्यामुळं का होईना आत्ता पुन्हा काय तात्या मामांची बेट लागणं शक्य होईना. व्हिडीओ पाहिल्यावर तुमचंदेखील मनोरंजन होईल.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.