Breaking News
Home / मनोरंजन / आयुष्य सुंदर आहे फक्त अंगात ह्या मुलासारखे कि’डे असले पाहिजेत, बघा हा अतरंगी व्हिडीओ

आयुष्य सुंदर आहे फक्त अंगात ह्या मुलासारखे कि’डे असले पाहिजेत, बघा हा अतरंगी व्हिडीओ

काही गोष्टी अशा असतात कि ज्यांना कधीही अनुभवलं तरीही आनंद मिळतो. तर याउलट काही गोष्टी अशा असतात की ज्यांना कधीही अनुभवा त्या डोक्यातच जातात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गाडीला असलेली सेफ्टी दर्शवणारे आवाज. त्या गाडीच्या मालकाव्यतिरिक्त कोणीही तिला हात लावू नयेत म्हणून केलेली उपाययोजना. सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उत्तम. पण तो कर्कश्श आवाज डोक्यातच जातो. नकोसा वाटतो. पण आम्हाला एक वायरल व्हिडियो असाही सापडला ज्यातून या आवाजाचा आनंद कसा घेता येईल हे कळलं. हा व्हिडियो आहे एका मुलाचा. व्हिडियो सुरू होतो तेव्हा हा मुलगा एका मस्त बाईक शेजारी उभा असतो. एवढी मस्त बाईक आणि त्याला सेफ्टी फीचर्स असणारच ना. पण या सेफ्टी फीचर्स मुळे निघणाऱ्या आवाजांचा वापर मनोरंजनासाठी कसा करून घ्यायचा हे या मुलाने ताडलेलं असतं.

त्यामुळे व्हिडियोत काही सेकंद म्युझिक वाजत असताना हा मुलगा त्या बाईकच्या टायरला लाथ मा’रतो. मग काय आवाज यायला सुरुवात होतात. पण या मुलाने ही या आवाजांवर कसं ‘डुलायचं’ हे आत्मसात केलेलं असतं. त्यामुळे पहिला आवाज आला रे आला की दोन्ही हात हवेत नाचवत एखाद्या डी जे सारखा हा मुलगा डुलतो. मग आवाज बदलतो आणि सायरनचा आवाज यायला लागतो. मग याची डुलण्याची पद्धत बदलते. दोन्ही हात गोल गोल फिरवत हा मुलगा डुलायला लागतो. आणि जस जशी या सायरनची गती बदलते त्यानुसार याची देहबोली सुद्धा बदलते. त्यात अजून गंमत भरते जेव्हा आवाज पुन्हा बदलतो आणि हा मुलगा शरीराचा खेकडयासारखा आकार करून नाचायला लागतो. तेवढ्यात पुन्हा एकदा आवाजात बदल होतात, या मुलाच्या नाचण्यात बदल होतात आणि व्हिडियो ही समाप्त होतो.

व्हिडियो संपतो तेव्हा आपले हात नकळत आपल्या डोळ्यांकडे गेलेले असतात, आपण थोडे मागे झुकलेले असतो आणि हसत असतो. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आनंद देऊन जाते तेव्हा बरेच वेळेस हे होतं. तशीच प्रतिक्रिया आपलीही होते. या मुलाच्या खोडकरपणाचं आणि कलात्मक विचारांचं कौतुक वाटत राहतं. कसं सुचलं असेल याला असं वाटतं आणि मग आठवतं ते आपलं बालपण. हे असले किडे किंवा खोडकरपणा आपल्याला त्या वयात आपसूक सुचतो. मग जबाबदारी अंगावर आली आणि समजूतदारपणाची झुल अंगावर पांघरली की हे सगळं निघून जातं. निरागसपणा तर उरतच नाही. पण असे व्हिडियोज बघितले की मात्र मन काहीसं शांत होतं. गंमत ही वाटते. जुन्या आठवणीत रमल्याने मन ही मोकळं होतं. असो. या व्हिडियोने जेवढा आनंद आपल्या टीमला दिला तेवढाच आनंद आपल्याला या लेखाने दिला असेल अशी खात्री आहे. आपल्यासाठी खास असे लेख आपली टीम प्रकाशित करत असते. ते ही दररोज बरं का. तेव्हा आपल्या टीमने केलेल्या मेहनतीला प्रोत्साहन म्हणून हे लेख वाचा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवरलाही सांगा. आपला स्नेह आमच्याशी असाच दृढ राहु देत.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.