Breaking News
Home / मनोरंजन / आयुष्य सोपं नाही म्हणून काय हार मानायची नसते.. स्वतःच्या नशिबाला दोष देणार्यांनी हा व्हिडीओ एकदा बघाच

आयुष्य सोपं नाही म्हणून काय हार मानायची नसते.. स्वतःच्या नशिबाला दोष देणार्यांनी हा व्हिडीओ एकदा बघाच

सोशल मीडिया हे एक असं व्यासपीठ आहे, जिथं अनेक सुंदर आणि प्रेमळ व्हिडीओ पाहायला मिळतात, तुम्ही सर्वांनी हे पाहिले आणि ऐकले असेल की, जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनाचे वेगवेगळे अर्थ आहेत. पण असे अनेक लोक असतात ज्यांना त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो ज्यांची त्यांना अपेक्षाही नसते. सध्या एका अपंग व्यक्तीचा एक मोठा प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आम्हाला खात्री आहे की, तो व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच एक प्रेरणादायी आत्मविश्वास येईल. हा व्हिडीओ फक्त पाहण्याचा नाही तर या व्हिडीओ असणारी प्रेरणादायी शक्ती आत्मसात करण्याचा आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटत असते की, आपले आयुष्य फारच रटाळ आहे. तसेच आपल्या आयुष्यात फार समस्या आहेत. मात्र काही लोकांचे आयुष्य इतके प्रेरणादायी असते की, त्यांना पाहून आपल्याला असे वाटते की, आपल्या समस्या यांच्यासमोर काहीच नाहीत.

आपल्यापैकी अनेक लोक तरुणपणीच म्हातारे होत असतात. एवढेच नाही तर अनेकांना तिशी ओलांडली की शारीरिक त्रास सुरु होतात. आयुष्यात असणाऱ्या समस्यावर रडत बसण्यापेक्षा लढणे कधीही उत्तम… अशीच ही प्रेरणादायी कथा नक्कीच जाणून घेणे, गरजेचे आहे. आपण साधं पडलो आणि आपल्याला तात्पुरती दुखापत झाली तरी आपण अगदी अंथरूणालाच खिळून बसतो. म्हणजे आपल्याने आता काहीच होणार नाही, असंच आपल्याला वाटतं. विचार करा, ज्यांनी आपला एखादा अवयव कायमचा गमावला असेल, त्यांचं काय? पण इच्छा आणि जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. इच्छा तिथे मार्ग असतोच हे एका दिव्यांगाने दाखवून दिलं आहे. हा व्यक्ती कोण आहे? कुठला आहे? हे महत्वाचे नसून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तो करत असलेला संघर्ष मोठा आहे.

आजच्या या सोशल मीडियावर व्हायरलं झालेल्या एका दिव्यांगाचा व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, ज्याला एक पाय नाही आहे पण एकाच पायावर तो सायकल चालवताना दिसतो आहे. एका पायानेही हा तरुण अगदी वाऱ्याच्या वेगाने सायकल पळवतो आहे. रस्त्यावरून जाणारे इतर प्रवासीही त्याला पाहून थक्क झाले आणि त्यांनी या व्यक्तीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. एका हातात काठी घेऊन ही व्यक्ती सायकल चालवते आहे. विशेष बाब म्हणजे तो व्यक्ती हा प्रवास सम्पूर्ण कुटुंबाला सायकलवर घेऊन करत आहे. असे म्हणतात की कठोर परिश्रमाला पर्याय नाही. मेहनतीची जोड असेल तर ध्येय कितीही कठीण असले तरी ते साध्य करता येते. दिव्यांग असूनही आयुष्याला जिंकण्याची जिद्द असलेल्या या पठ्ठ्याची ही अशीच प्रेरणादायी कहाणी व्हायरल व्हिडीओच्या निमित्ताने समोर आली आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *