Breaking News
Home / मनोरंजन / आरटीओ वाल्यांनी गाडी उचलल्यानंतर ह्या काकांनी रस्तामध्येच सर्वांसमोर काय केले बघा

आरटीओ वाल्यांनी गाडी उचलल्यानंतर ह्या काकांनी रस्तामध्येच सर्वांसमोर काय केले बघा

वायरल वायरल म्हणत अनेक व्हिडियो प्रसिद्ध होतात. या वायरल व्हिडियोज मधील काही व्हिडियोज पाहून आपल्याला हसावं की रडावं तेच कळत नाही असंही होतं. अशा अनेक व्हिडियोज वर आमच्या टीमने लेख लिहिले आहेतच. आज याच पठडीतील एका वायरल व्हिडियो वर हा लेख लिहीत आहोत. हा वायरल व्हिडियो आहे नागपुरातील. नागपूर असो वा कोणतेही शहर आपल्या सगळ्यांना पार्किंगचा प्रश्न सतावत असतो. यात पार्किंग कुठे मिळणार हा एक प्रश्न. तर पार्किंग न मिळाल्यानंतर पण रस्त्यावर गाडी उभी केली आणि ती ‘टो’ केली गेली तर हा दुसरा प्रश्न. काही वेळा या प्रश्नांमुळे गाडी असणं हे डोक्याला ताप होण्याचं एक कारण असतं. अनेक वेळेस तर आपली दुसरी भीती खरी ठरते. आपण कुठे हॉटेल मध्ये असू वा एखाद्या दुकानात. आपली गाडी आर.टी.ओ. वाल्यांकडून उचलली जाते आहे असं दिसतं आणि मग आपली धावपळ होते.

हातातलं काम तसंच टाकून आपण गाडीच्या पाठी पळतो, पण कसचं काय. काही उपयोग होत नाही. असंच काहीसं एका काकांच्या बाबतीत नागपुरात घडलं. त्यांची स्कुटर त्यांनी उभी केली असावी आणि ते जवळच असावेत. आर.टी. ओ. वाले आपली स्कुटर उचलताहेत हे पाहून काकांनी त्या ट्रक समोरच स्वतःला थांबवलं. त्या गाडीसोबत असणारे अधिकारी त्यांची समजूत घालताना यात दिसतात. काका आपलं मागणं अगदी नेटाने मागत असतात. ‘साहेब मला माझी गाडी द्या’ एवढंच त्यांचं म्हणणं असतं. त्या ट्रक समोरून हटलो तर म्हणणं मान्य होणार नाही, असं वाटून असेल कदाचित, त्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्याला काहीसं ऐकत काका किंचित बाजूला होतात. पण ट्रकला अगदी धरूनच राहतात. शेवटी हे अधिकारी या काकांची स्कुटर त्यांना परत द्यावी असं आत असलेल्या मुलांना सांगतात. तोपर्यंत जवळच असलेला एक इसम जोरजोरात बडबड करत कॅमेऱ्यासमोरून जातो. त्याची काही वाक्य कळतात तर काही वाक्य कळत नाहीत. पण तोपर्यंत ट्रक मध्ये असलेल्या स्कुटर पैकी एक स्कुटर खाली काढली जाते.

तेवढ्यात पुढे ट्रकला अगदी घट्ट पकडून असलेले काका मग मात्र आपली स्कुटर घेण्यासाठी येतात आणि व्हिडियो संपतो. काकांच्या वागण्यामुळे वायरल झालेला हा व्हिडीओ काही क्षण मनोरंजक वाटतो. या व्हिडियो वरील हा लेख आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही वाचा. आमच्या वे’बसाई’टवरील स’र्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून स’र्च करा. आपल्याला विविध लेख वाचावयास उपलब्ध होतील. तसेच नाटक किंवा अभिनेता अभिनेत्री किंवा सिनेमा किंवा चित्रपट किंवा मालिका असं लिहून स’र्च केल्यास आपल्याला मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लेखही वाचावयास मिळतील, हे नक्की. मराठी गप्पाचे नियमित वाचक असण्यासाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *