Breaking News
Home / मनोरंजन / आहे का कोणता डीजे जो ह्यांना टक्कर देईल? बघा हा अतरंगी व्हिडीओ

आहे का कोणता डीजे जो ह्यांना टक्कर देईल? बघा हा अतरंगी व्हिडीओ

कला ही एकमेव गोष्ट अशी आहे, जी शरीराला आणि मनाला आनंद देते. जगातील कोणतीही कला ही आनंद देणारी असते. कलेचा आनंद कलाकाराबरोबरच इतरांना देखील मिळत असतो. म्हणजे एखादं गाणं आनंद शिंदे म्हणत असतील तर आपले पाय थिरकत असतातच. किंवा एखाद्या गाण्यावर गोविंदा नाचत असेल तरीही आपली कम्बर हलत असते. अगदी शास्त्रीय गायन करणारे राहुल देशपांडे, महेश काळे हेही जेव्हा गायला लागतात. तेव्हाही आपले हात आणि मान आपोआप डोलू लागते. शास्त्रीय संगीत थेट मनाचा ठाव घेते. तुम्ही आजवर अनेक असे व्हायरल व्हिडीओ बघितले असतील, ज्यात लोक डान्स करत असतात पण त्यांच्या नाचण्याची जास्त मजा आपल्यालाच येत असते. म्हणजे आवण बघत असतो की लोक डिजेवर डान्स करत असतात. कधी कधी काही हौशी लोकं हलगीच्या तालावर पण नाचतात. कधी कधी तर लग्नात काही हौशी मंडळी अगदी ताशाच्या तालावर सुद्धा उड्या मारतात. आता सगळ्यात हौशी मंडळी तर ती असतात जी ढोल, ताशा, बेंजो, ढोलकी, दिमडी, पखवाज, तारपा, बासरी, घुमकं, ढोल-ताशे, घुंगरू, हलगी आणि डीजे नसताना पण नाचू शकतात… ते पण धुंद होऊन… बेधुंदपणे… नशेत … जनरेटरच्या आवाजावर…

आता तुमच्या लक्षात आलं असेल की, जनरेटरच्या आवाजावर नाचणारी मंडळी कोण असतात ते? … ही असतात अस्सल पेताड म्हणजेच दारुडी मंडळी… ते अगदी जनरेटर सोडा… काहीच नसताना पण नाचू शकतात. कारण त्यांचा विषय तसाही खोल असतोय… आता आमच्याकडे एक असा व्हिडीओ आला आहे, ज्यात ना पोरं डीजेच्या तालावर नाचत आहेत ना बेंजोच्या… इथं पोरं चक्क एका टू-व्हीलरच्या म्हणजेच गाडीच्या तालावर नाचत आहेत. आता गाडीच्या तालावर नाचणं हे काय असत? हे समजुन घेण्यासाठी तुम्हाला या भावांचा लै भयंकर आणि अतिप्रचंड व्हायरल होत असणारा व्हिडीओ बघावा लागेल. पण ते बघण्याआधी हे वाचा की…

ढोलकी, दिमडी, पखवाज, तारपा, बासरी, घुमकं, ढोल-ताशे, घुंगरू, हलगी.. महाराष्ट्राच्या मातीतली ही वाद्यं.. इथल्या लोकसंगीतात वापरली जाणारी. या वाद्यांच्या तालावर जगातला कुठलाही माणूस नाचू शकतो. कारण या वाद्यांची एनर्जी, वाजवण्याची पद्धत त्यात असणारा बाज नाचण्यास भाग पाडतो. पण यासगळ्या पलीकडे जाऊन एक अस वाद्य आहे, जे वाजल्यावर कधीच न नाचणारा माणूस पण उभा होऊन नाचायला लागेल.

खरं तर हे वाद्य नाही… वस्तू आहे वस्तू… मधल्या काळात वस्तू वाजवायचा ट्रेंड निघाला… म्हणजे बादल्या,डबडे, ड्रम असलं सगळं प्लास्टिक आणि लोखंड घेऊन पोरं गाणी वाजवायची. पण आजच्या या व्हायरल व्हिडीओत भावाने चक्क गाडीच्या आवाजावर लोकं नाचवली आहेत.

खरं पाहिलं तर संबळ, ढोलकी आणि ढोल वाजायला तर भले भले गंभीर असलेले लोक पण मनातून आणि कधी कधी शरीराने नाचायला सुरू करतात. एक चेतना, उत्साह या वाद्यामुळे मिळतो. आता व्हिडीओत दिसणाऱ्या काही अतरंगी वादकांचा व्हिडीओत जे वाजवताहेत ते पाहून तुम्हीही नाचायला लागाल. इथं लोकं ढोल नाही ताशा नाही तर चक्क गाडीच्या तालावर नाचत आहेत. आजवर तुम्ही दारुडे मंडळी जनरेटरच्या आवाजावर नाचताना बघितली असतील. पण आज तुम्ही अशी काही अतरंगी मंडळी बघणार आहेत, जी चक्क गाडीच्या तालावर नाचत आहेत… ते पण शुद्धीत… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *