लहान मुलांचे वायरल व्हिडियो म्हंटल्यावर त्यात त्यांचं गंमतीशीर बोलणं आणि वागणं आलं. मराठी गप्पावर आपण अशा अनेक व्हिडियोज बद्दल माहिती वाचली असेलंच, तसेच व्हिडियोज ही पाहिले असतील. आज आमच्या टीमने अशाच एका व्हिडिओबद्दलची माहिती आपल्या भेटीस आणली आहे. हा व्हिडिओ पाहताना आमच्या टीमला संपूर्ण व्हिडियो भर हसणं आवरत नव्हतं. हा व्हिडीओ आहे एका मुलाचा ज्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं आहे. त्याला कसलंसं इंजेक्शन देण्याची तयारी झाली आहे. पण अर्थात इंजेक्शन म्हंटल्यावर अनेकांची पाचावर धारण बसते तिथे या मुलाची काय कथा. त्यात लहान मुलं सहसा घाबरतातच. बहुतांश मुलं रडतात आणि त्यात त्यांना जास्त काही बोलता येत नाही. पण हा मुलगा मात्र अथपासून ते इतिपर्यंत सतत बोलत राहतो.
कदाचित त्याचा सतत बोलण्याचा स्वभाव असेल आणि त्यात या भीतीची भर पडली असेल. त्यात त्याच्या बोलण्याची पद्धत एवढी मजेशीर आहे आणि त्याला गावरान बोलण्याचा ठसका आहे त्यामुळे पाहणाऱ्याला आपसूक हसू येतं. तसेच इंजेक्शन नको म्हणून ओरडत असताना येणारा त्याचा आवाज हा या हसण्यात अजून भर टाकतो. त्यात त्याने जास्त हालचाल करू नये म्हणून पकडायला एवढे जण असतात की विचारता सोय नाही. पण त्याचं बोलणं एवढं गंमतीशीर की सगळेच हसायला लागतात आणि ती वेळ येते. इंजेक्शन टोचलं आहे हे समजल्यावर आणि त्यावर कापूस लावणार हे जाणवल्यावर त्याची प्रतिक्रिया एका अशा पातळीला पोहोचते की आपल्याही हसण्याची सीमा राहत नाही. या निमित्त आपल्या लहानपणीचे किस्से कदाचित आपल्या पैकी काहींना आठवतील. त्यात भीती मुळे आपणही कसे वागलो, बोललो याची आपल्याला जाणीव होईल आणि नकळत एक हसू काही काळ आपल्या चेहऱ्यावर राहील. हा व्हिडीओ जेवढा हसवणारा आहे, तेवढाच आपल्याच काही जुन्या आठवणींमध्ये रमावणार आहे.
आम्ही हा व्हिडीओ मनोरंजनपर हेतू खाली देत आहोत, तुम्ही नक्की पहा. आम्ही हे व्हिडीओ केवळ तुम्हा सर्वांचे मनोरंजन व्हावे, ह्या प्रामाणिक हेतून घेऊन येत असतो. तरी तुम्हीही ह्या व्हिडीओजचा निखळ आनंद घ्यावा, हीच अपेक्षा आमची टीम करत असते. अशाच प्रकारचे वायरल व्हिडियोज बद्दल आमच्या टीमने वेळोवेळी लेखन केलेलं आहे. आपल्याला ते लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा आपण वापर करू शकता. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख वाचनासाठी उपलब्ध होतील. आपल्या वेळेसाठी धन्यवाद ! आपले हे मराठी गप्पाचे युट्युब चॅनेल सुद्धा सबस्क्रा’ईब करायला विसरू नका.
बघा हा व्हिडीओ :