तुम्ही ‘ग्रम्पी’ नावाच्या मांजरीचे नाव तर ऐकलेच असेल. तिच्या चेहऱ्यावरील रागीट आणि दुखी हावभावामुळे ती इतर मांजरांपेक्षा वेगळी दिसत होती. ज्यामुळे तिने सोशिअल मीडियाच्या विश्वात फार लोकप्रियता मिळवली होती. इंटरनेट विश्वातील सर्वात लोकप्रिय मांजरीचे निधन झाले आहे. ग्रम्पी नावाची मांजर एवढी प्रसिध्द होती की, फेसबुकवर तिचे 85 लाख, इन्स्टाग्रामवर 25 लाख आणि ट्विटर वर तब्बल 15 लाख पेक्षाही जास्त फॉलोअर्स होते. ग्रम्पी मंजिरीचे 14 मे रोजी वयाच्या सातव्या वर्षी निधन झाले. ऍरिझोनाची रहिवाशी असलेल्या ‘ग्रम्पी कॅट’ च्या मालकीनीने सोशिअल मीडियाद्वारे तिच्या मृत्यूची बातमी जगाला दिली. तिच्या मालकिणीने ट्विटर वर लिहिले, “आम्हाला आपल्या सर्वांच्या लाडक्या ग्रम्पी कॅटच्या मृत्यूची बातमी देताना खूप दुःख होत आहे.”
या मंजिरीच्या फोटोचा वापर बऱ्याचदा ‘मीम’ तसेच कमेंटमध्ये प्रतिसाद देण्यासाठीही केला जात आहे. स्टैन ली आणि जेनिफर लोपेज समवेत इतर कित्येक लोकप्रिय सेलिब्रिटी सोबत या मंजिरीचे फोटोजही आहेत. ग्रम्पी कैटने 2010 मध्ये त्या वेळेस लोकांचे मन जिंकायला सुरुवात केली, जेव्हा तिचे फोटोज इंटरनेटवर येऊ लागले. ग्रम्पी कैट च्या फोटोजचा वापर करून इंटरनेटवर बरेच मीमही बनवले गेले, पुस्तक लिहिले गेले, तसेच चित्रपटही बनवण्यात आला. 2012 साली एक youtube व्हिडीओमुळे ग्रम्पी कैटला लोकांची पसंती मिळाली होती. 2012 साली ग्रम्पी च्या व्हिडीओला सुमारे दीड करोड पेक्षा जास्त लोकांनी पाहिले होते. मांजरीमुळे तिची मालकीण ‘तबथा बुंडसेन’ ही करोडो रुपयांची मालकीण झाली होती.
या मांजरीचे खरे नाव टार्डर सॉस असे होते. परंतु ती ग्रम्पी कैटच्या रुपात प्रसिद्ध झाली. मांजरीने आजवर सुमारे 700 करोड रुपये एवढी संपत्ती कमावली आहे. मांजरीची मालकीण तबाथा बुंदसेन हिने सोशिअल मीडियाद्वारे तिच्या मृत्यूची बातमी जगाला देत दुःख व्यक्त केले. वयाच्या सातव्या वर्षी आजारामुळे ऍरिझोना मधील घरात मांजरीचा मृत्यू झालेचे तिने सांगितले. ही बातमी सोशिअल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून चाहत्यांनीही याबद्दल दुःख व्यक्त केले. सोबतच कित्येक लोकांनी मांजरीचा फोटो अपलोड करून भावुक संदेश लिहिले. चाहत्यांनी मांजरीला सुपर क्युट म्हटले. मांजरीवर चांगल्या डॉक्टरकडून उपचार चालु होते, परंतु इन्फेक्शनमुळे तिचा 14 मे रोजी मृत्यू झाला.