इंटरनेटवर फेमस व्हायला लोक वाट्टेल त्या थराला जायला तयार असतात. नागाच्या डोक्याचे मुके काय घेतात. तलवारीनं सपासप केक काय कापतात. कुणी ढुंगणं हलवून फेमस होतात. कुणी हेवी मेकअप करुन तर कुणी आपलं टॅलेंट दाखवून मोठी होतात. पण काहींना तर हातात मोबाईल मिळाला पण त्यांच्याकडं अक्कल नावाची गोष्ट द्यायला मोबाईल घेऊन देणारे विसरलेत की काय, अशी चित्र काही व्हीडिओ पाहायला गेलो की नक्की दिसू लागतील. या व्हीडिओतील गोष्टच पहा ना मुर्ख पणाचा किती कळस असू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्हाला याची देही याची डोळा दाखवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत.
काही लोकांमध्ये अँक्टिंगचा कीडा असतो काहींमध्ये तो गाण्याचा असतो काहींम्ध्ये नाचण्याचा असतो पण काहींना खतरो के खिलाडी मधले स्टंटमध्ये वापरले जाणारे कीडे चावतात. त्यांच्या डोक्यातही अशीच कीडे मुंग्या भरलेले असतात यामुळं काय होतं. डोकं वापरायला शिल्लकच ठेवलेलं नसतंत काही बाही करायचं आणि फेमस व्हायचं अशा नादात त्यांच्या या सगळ्या गोष्टीत एखाद्याचा स्वतःसोबत जीवही जाऊ शकतो याची जराशी पुसट कल्पनाही त्यांच्या डोक्यात येत नाही.
आता या व्हीडिओतही असंच काहीसं झालेलं तुम्हाला दिसून येईल. व्हीडिओ काढण्याच्या नादात काही माणसं आपल्या आणि आपल्या मित्रांच्या जीवाशी कसा खेळतात हे या व्हीडिओतून तुम्हाला लक्षातही आलं असेल.
आता व्हीडिओमध्ये नेमकं काय झालंयं त्याबद्दल एकदा बोलूयात. या बिनडोक पोट्ट्याला इन्स्टाग्रामवर रिल्स बनवायचे आहेत. त्याला प्रसिद्धीसाठी हव्यास असणारे कीडे अंगात वळवळतायंत त्यांना शांत करण्यासाठी म्हणून त्यानं मित्राला बोलावलं आपण कसे मोठे सुप्पर स्टार होणार याचं स्वप्न त्यानं मित्राला दाखवलं. पण आगीशी खेळ करायला हिम्मत लागते कुण्या येड्या गबाळ्याचं काम नसतंयं हे त्याला कळून चुकलेलं नव्हतं. त्याच्या या सगळ्या पार्श्वभागातील कीड्यांमुळे पुढचा भाग जळायला लागल्यावर त्याला अक्कल आलेली दिसतें. हातानं बीडी जाळायची कला तर तो शिकून घेतला. पाण्यावर तरंगणारा ज्वलनशील पदार्थ त्याला सापडला होता. त्याचे प्रयोग करण्यासाठी त्यानं मित्राला बोलावून घेतलं होतं. त्यानं प्रयोग सुरू केला. हातानं या ज्वलनशील पदार्थाला पेटवलं आणि बीडीही पेटवली.
यावेळेस त्याला चांगलाच चटका बसला पण त्यांच्या सगळ्या कीड्याला मारण्यासाठी तो पुरेसा नव्हता. म्हणूनच की काय त्यानं बीडी आणि ज्वलनशील पदार्थ् पिऊन दाखवण्याचा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर करुन घ्यायचं ठरवलं होतं. मात्र, ते काही जमेना. ग्लास तोंडाला लावता लावता त्याच्या अंगावर हा ज्वलनशील पदार्थ सांडला आणि अँक्टिंगचा कीडा चांगलाच बाहेर निघाला. आत्ता परत कधी टीकटॉक आणि रिल्सवर व्हीडिओ बनवायचं नाव घेणार नाही इतकी चांगली अद्दल त्याला घडली. या ज्वलनशील पदार्थ पडून अंगावर आलेल्या या सगळ्या आगीनं त्याची पळता भुई थोडी झाली. आपोआप आग विझली पण तोपर्यंत अर्धे कपडे जळून गेले होते. आगीशी खेळ भल्या भल्यांना जमला नाही. तर या चिरकूटांना काय जमणार आहे. त्यामुळे कधीही आगीशी खेळायला जाऊ नका. मोठी माणसं सांगतात त्यावर विश्वास ठेवायलाच हवा नाहीतर आग अशी अंगाशी येते आणि आगीचा खेळ होतो. या प्रकारानंतर पोट्ट्याला चांगलीच अद्दल घडलीयं आता किचनमध्ये सोडा देवघरातील बत्ती बघितली तरीही त्याला घाम फूटतो. आगीच्या सदम्यात गेलेल्या माणसाला आम्ही पाहिलाय, त्यामुळे आता बीडी आणि काडी दोन्ही लांब ठेवून काम चाललंयं.
बघा व्हिडीओ :