Breaking News
Home / मनोरंजन / इच्छा तेथे मार्ग, ह्या कामगाराने कामावर मोकळ्या वेळेत केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

इच्छा तेथे मार्ग, ह्या कामगाराने कामावर मोकळ्या वेळेत केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

आपली टीम आपल्या लेखनासाठी नेहमीच विविध व्हिडियोज बघत असते. त्यातून खरंच काही वेळेस उत्तम माहिती मिळते. काही वेळेस नवनवीन गोष्टी कळतात. त्यामुळे लेख लिहिणं हे आम्हाला जसं आनंद देणारं काम आहे तसंच ते आम्हाला प्रगल्भ करणारं काम ही आहे. काही वेळेस तर हे व्हिडियोज बघताना काही जुने संदर्भ ही आठवतात. आज आमच्या टीमच्या बाबतीत असंच काहीसं झालं.

नेहमीप्रमाणे आपली टीम काहीतरी उत्तम विषय मिळावा आणि त्यावर लिहावं म्हणून सर्च करत होती. ते करता करता एक व्हिडियो सहज म्हणून पाहिला. बघताच क्षणी तो इतका आवडून गेला की त्याचक्षणी ठरलं, आता यावर लिहायचं. कारण हा व्हिडियो आहे एका इमारती बांधणाऱ्या कामगाराचा. हा कामगार पोटापाण्यासाठी या व्यवसायात असल्याचं कळतं. पण पोटापाण्याचा व्यवसाय आणि छंद हे वेगळे असू शकतात. तसंच या माणसाच्या बाबतीत असतं. याला डान्सची प्रचंड आवड असते. पण कामावर असताना वेळ कुठे मिळणार. अर्थात इच्छा असली की मार्ग सापडतोच. हा माणूस त्यातुन मार्ग काढतो. त्याला मिळणाऱ्या जेवणाच्या सुट्टीवेळी हा पठ्ठा इंटरनेटवर डान्स व्हिडियोज बघून बघून डान्स शिकतो.

इतकंच नव्हे तर त्याच्या इतर सहकाऱ्यांसमोर त्याची ही कला सादर ही करत राहतोच. सध्याचा जमाना इंटरनेट आणि पर्यायाने वायरल व्हिडियोजचा आहे. त्यामुळे बघता बघता या मेहनती तरुणाचे डान्स व्हिडियोज प्रसिद्ध व्हायला लागतात. इतके की प्रथितयश वृत्तसंस्था त्याच्याविषयी वार्तांकन करतात. यावरून या माणसाच्या कलेची कल्पना यावी. आणि खरं सांगतो मंडळी, मोठ मोठया डान्सर्सची आठवण यावी अशा याच्या डान्स मुव्ह्ज असतात. आम्ही जो व्हिडियो बघितला त्यात तर याची प्रचिती येते. कारण एखाद्या कोरिओग्राफर ने सादरीकरण करावं तसं त्याचं सादरीकरण वाटून जातं.

बरं हे सगळं त्या कामाच्या ठिकाणीच होताना दिसतं. त्यामुळे आपसूकच त्याची, त्याच्या कलेप्रति असलेली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित होते. बरं हे सगळं त्याने स्वतः हुन शिकून मग केल्याचं कळतं. त्यामुळे त्याच्याविषयी कौतुक हे वाटतंच. कारण शिकवायला कोणीही नसताना, केवळ स्वतःची आवड म्हणून शिकणं आणि त्यातून एवढ्या मस्त कलाकृती उभ्या राहणं म्हणजे अप्रूपच आहे. असो. या व्हिडियोज विषयी खूप बोलता येईल. पण एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर हे व्हिडियोज बघून एक सिनेकलाकृती आठवते.

Ratatouille ही ती गाजलेली सिनेकलाकृती होय. या कलाकृतीत एक वाक्य आहे. ‘Not everyone can become a great artist, but a great artist can come from anywhere’ हे ते वाक्य होय. हे वाक्य तद्वत या कलाकाराला आणि त्याच्या मेहनतीला लागू पडतं असं प्रामाणिकपणे वाटून जातं. असो. आपल्या टीमने तर या कलाकाराच्या व्हिडियोजचा आस्वाद घेतला आहेच. आपणही हे व्हिडियोज बघा. जमलं तर आपली टीमही एखादा व्हिडियो आपल्यासाठी शेअर करेल. त्याचा आनंद घ्या.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.