Breaking News
Home / मनोरंजन / इटलीच्या वधूने लग्न झाल्या झाल्या सर्वांसमोर चक्क भारतीय गाण्यावर केला डान्स, पाहून नावरदेवालाही नाचण्याचा मोह आवरला नाही

इटलीच्या वधूने लग्न झाल्या झाल्या सर्वांसमोर चक्क भारतीय गाण्यावर केला डान्स, पाहून नावरदेवालाही नाचण्याचा मोह आवरला नाही

परदेशात आपल्या देशाची संस्कृती, आपलं राहणीमान यांच्याविषयी नेहमीच एक आकर्षण राहिलेलं आहे. त्यातही आपल्याकडे असणाऱ्या संगीत आणि नृत्यकलेविषयी तर प्रचंड आकर्षण असलेलं दिसून येतं. त्यातूनच मग अनेक परदेशी नागरिक एकत्र येऊन स्वतःचे असे डान्स ग्रुप्स स्थापन करतात. त्या डान्स ग्रुप्सचं वैशिष्ट्य असं की ही मंडळी फक्त आणि फक्त भारतीय गाण्यांवर परफॉर्मन्स देतात. या सगळ्यांत रशियन नागरिकांचा सहभाग लक्षणीय असतो. पण म्हणून बाकीच्यांची संख्या कमी असते का? तर नाही. अन्य देशातील लोकांमध्ये ही आपल्या गाण्यांविषयी, आपल्या डान्सविषयी आवड असलेली दिसून येते.

या आवडीतूनच मग अनेक लग्नात आपल्याकडील गाण्यांवर डान्स परफॉर्मन्स ही दिला जातो. बरं या लग्नात काही वेळेस एखादी भारतीय व्यक्तीही सहभागी नसते. तरीही हे डान्स केले जातात, गाणी वाजवली जातात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो होय. हा व्हिडियो सहा ते सात वर्षांपूर्वीचा आहे. पण या काळात जवळपास ३९ लाखांहून अधिकांनी हा व्हिडियो बघितला आहे. यावरून तुम्हाला या व्हिडियोच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. हा व्हिडियो म्हणजे एका इटालियन मुलीच्या लग्नातील व्हिडियो आहे.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा ही इटालियन मुलगी विवाहस्थळी दाखल होते. तिला सोबत म्हणून एक व्यक्ती असतेच. पण जसं तिला समोर तिचा होणारा नवरा दिसतो तशी ती नाचायला लागते. एव्हाना आपल्या कानावर ते गाणं पडायला लागलेलं असतं. ‘चुनरी चुनरी’ हे सुश्मिता सेन आणि सलमान खान यांचं प्रसिद्ध गाणं आपल्या कानावर पडत असतं. बरं यातील बिट्स आणि या मुलीच्या स्टेप्स ही मेळ खाताना दिसतात. तिची एन्ट्रीच एवढी जबरदस्त होते की पुढचा परफॉर्मन्स आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त खुलतो. याचं कारण ती एकटीच नाचत नाही बसत. तिच्या सोबत सुरुवातीला दोन मुलं असतात. मग बाकीची वर्हाडी मंडळी ही एकत्र येऊन नाचू लागतात. एक वेळ तर अशी येते की एका बाजूला सगळी तरुण मंडळी आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या तरुणी असतात. आणि गाण्यातल्या एका कडव्याची सुरुवात झाली की नाचायला लागतात. एखाद्या सिनेमात शोभावा असाच प्रसंग म्हणता येईल. बरं एवढ्यावरच सगळं थांबत नाही. या पूढेही हा डान्स सुरू राहतो. उलट त्यात जास्त रंगत भरते. कारण एव्हाना नवरा मुलगा ही येऊन या डान्स मध्ये सामील झालेला असतो. खरं तर स्वतः डान्स करण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या नवरीला डान्स करताना बघून तो जास्त खुश असतो अस दिसून येतं. बरं या गाण्यावर डान्स करत करत बाकीचेही कधी स्वतः गुंग होऊन जातात ते त्यांनाही कळत नाही. व्हिडियोच्या सुरुवातीस अगदी रिकामी वाटणारी जागा आता सगळ्या तरुण तरुणींनी भरून गेलेली असते.

तरुणाईचा सळसळता उत्साह म्हणजे काय असतो हे इथे आपल्याला अनुभवायला मिळत असतं. त्यामुळे हा व्हिडियो आपण ही पाहिला असेल तर खरं तर साडे पाच मिनिटांचा आहे. पण त्यातील उत्साह, उर्जा यांमुळे ती पाच मिनिटं आपण एक मस्त परफॉर्मन्स बघितल्याचा आनंद आपल्या मनात असतो. एवढंच काय तर आपण हा परफॉर्मन्स पुन्हा पुन्हा पाहतो. बरं हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे बरं का. म्हणजे लेख लिहायचा होता म्हणून आम्ही हा व्हिडियो पाहिलाच. पण आवडला म्हणून अजून बराच वेळ पाहिला. आपणही हाच अनुभव घेतला असेल. पण आपण जर हा व्हिडियो अजूनही बघितला नसेल तर हरकत नाही. आपली टीम आपल्यासाठी हा व्हिडियो शेअर करेल. याचा आनंद घ्या आणि तो इतरांना ही घेऊ द्या.

चला तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *