Breaking News
Home / मनोरंजन / इतका प्रामाणिक एसटी कंडक्टर शोधून सापडणार नाही, हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

इतका प्रामाणिक एसटी कंडक्टर शोधून सापडणार नाही, हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

‘‘सरका! सरका! पुढं सरका! मला यायला जायला जागा द्या… उतरणार्यांना उतरू द्या. चढणार्यांना येऊ द्या! तात्या! अण्णा, बापूजी पुढं सरका!’’ मामी, मावशी जरा एसटीची पाटी बघा आणि तुम्हाला मुक्कामाच्या ठिकाणीच एसटी घेऊज जाणारे का ते चेक करा. चला आले का सगळे… तिकीट घ्या. असे संवाद आपल्याला एकाच ठिकाणी ऐकायला भेटतील ते म्हणजे एसटीत. जर गाडी स्टँडवरून निघाली असेल तर कंडक्टर पायरीवर उभे राहून बसचा दरवाजा बंद करतो. दोन-तीन वेळा शिट्टी फुंकतो. थोडा गोंधळ कमी होतो आणि मग कंडक्टर तिकीट फाडायला सुरवात करतो… आता ज्यांनी रेग्युलर एसटीने प्रवास केला आहे, त्यांना कंडक्टर ही जमात कसली अतरंगी असते, याचा नक्कीच अनुभव असेल. कंडक्टर मंडळी अगदी कोकणी माणसासारखी असतात… म्हणजे कशी तर नारळासारखी… बाहेरून कडक, टणक तर आतून एकदम मऊ. तर अशी ही कंडक्टर मंडळी कायमच एखाद्या पुस्तकातल्या दिलखुलास, मनमौजी पात्रासारखे वावरत असतात, फिरत असतात.

माणसांचे सगळ्यात चांगले आणि सगळ्यात वाईट अनुभव त्यांच्याइतके कुणालाच नसावेत कारण त्यांनी अख्ख्य जग बघितलेलं असतं. अर्थात एसटीच्या सीमित प्रवासामुळे त्यांचं जगही लिमिटेड झालेलं असतं. मात्र तरीही कंडक्टरसारखा जबराट माणूस तुम्हाला पृथ्वीतलावर शोधून सापडणार नाही हो… कंडक्टर लोकांचं अजून एक वैशिष्ट्य असतं. एखाद्याला मदत करायची असल्यावर ते अंगातल काढून देतील मात्र एखाद्याचा राग आल्यावर अंगातले कपडे फाटूस्तोवर भांडण करतील. मग पुढचा माणूस कोण आहे? काय आहे? याची अजिबात तमा ते बाळगत नाहीत. मदत करतानाही ते समोरच माणूस कोण आहेत, याचा विचार करत नाहीत. मनाने दिलदार पण अंगावर आल्यावर शिंगावर घेणारी ही कंडक्टर जमात. आता तुम्ही म्हणाल, एवढं का कंडक्टर मंडळीविषयी खुलून सांगताय? तर आज आमच्याकडे एक व्हिडिओ आला जो प्रचंड व्हायरल झालेला आहे. आता हा व्हिडीओ खरंतर कंडक्टरच्या मजेशीर कारनाम्यामुळे व्हायरल झाला आहे.

मोठ्या शहरात एका जास्त प्रमाणात होत असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यावर एक वेडा/पिलेला माणूस रस्त्याच्या मध्यभागी चालतो आहे. अशावेळी एखादा माणूस काय करील… तर कुठं ह्या येड्याच्या नादी लागता म्हणून पुढे निघून जाईल. अनेक गाड्या आल्या आणि गेल्या पण रस्त्याच्या मध्यभागी चालणाऱ्या या पेताड माणसाला कुणीही बाजूला व्हायला सांगितले नाही. मग अचानक एक एसटी आली आणि हा पेताड माणूस रस्त्याच्या मध्यभागी चालत असल्याने ड्रायव्हरने गाडी थांबवली. मग कंडक्टर खाली उतरला आणि या रस्त्याच्या मध्यभागी चालणाऱ्या माणसाला बाजूला काढले. आपल्यालाही व्हिडीओ बघून वाटलं… कोण कुठला अनोळखी कंडक्टर पण त्याला माया फुटली… पण खरी गम्मत तर पुढे घडली. त्या कंडक्टरने पुन्हा असे काम केले की, जे पाहून अनेकांना हसू फुटले. आणि कंडक्टर हे कसले जबराट असतात, याचाही अनुभव हा व्हिडीओ पाहून आला.

आता तुम्हीही हा व्हिडीओ बघा आणि मजा घ्या. को’रोना काळात कंडक्टर आणि ड्रायव्हर लोकांनी मोठे काम केले तरी ते दुर्लक्षित राहिले. त्या कामासाठी त्यांना आमच्या टीमचा सलाम आणि या व्हिडीओत असलेल्या अतरंगी कंडक्टर मंडळींना 32 तोफांची सलामी भो…

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *