Breaking News
Home / मनोरंजन / इतका सुंदर आणि लयबद्ध गरबा डान्स तुम्ही ह्याअगोदर कधी पाहिला नसेल, बघा ह्या तरुणींनी केलेला अप्रतिम डान्स

इतका सुंदर आणि लयबद्ध गरबा डान्स तुम्ही ह्याअगोदर कधी पाहिला नसेल, बघा ह्या तरुणींनी केलेला अप्रतिम डान्स

भारत आणि भारतीय संस्कृती खूप महान आहे हे भारतात राहणार्या माझ्या तमाम देश बांधवास सांगायची गरज नाही . किंबहुना हे वाक्य प्रत्येक सुजान नागरिकासाठी नवीन नाहीच. कारण काजव्यासम संबंध संस्कृतीमध्ये चकाकणारी, स्वच्छ, निर्मळ, समृद्ध म्हणून ओळखल्या जाणारी भारतीय संस्कृती संपूर्ण जगात अव्वल आहे. आणि हो आहेच ते पटवून देण्याची जास्त गरज वाटत नाही. भारतीय स्वातंत्र्यानंतर नव्हे तर स्वातंत्र्यापुर्वीही भारतीय संस्कृतीचा डंका जगभर पसरलेला होता आणि तो आजही आहे किंबहुना यापुढेही राहणारच. परंतु काळानुरूप जस जशी विज्ञान विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागून भौतीक सुविधा वाढत चालल्या आहेत. खेडी पाडी, शहरे सोयी सुविधांनी अधिक समृद्ध व आर्थिक दृष्ट्या भक्कम होत चालली आहेत.

अर्थात जसजशी भारत देश इतर देशाच्या मानाने प्रगती करत आहे तस तसा तो भारतीय संस्कृतीची पायमल्ली सुद्धा करताना दिसतो आहे. त्याचाच परिपाक म्हणून की काय या एकविसाव्या शतकात संस्कृती जोपासनारी माणसे बोटावर मोजण्या इतकी शिल्लक राहिली आहेत , बाकी सर्व धांगड धिंगाच. आता तुम्ही गणपतीबाप्पाच्या मिरवणुकीत दारू पिऊन नाचणारे लोक पाहिले असतील. बाप्पा त्याला जी शिक्षा करायची ती करेलच पण संस्कृती चाललीय कुठे? हा प्रश्न आपल्याला पडायलाच हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खिशात घेऊन फिरणारे, त्यांच्या नावाने मत मागणारे स्वतः चे खिसे भरतात. संस्कृती, आदर, श्रध्दा, कुटूंबातील एकता या सगळ्या गोष्टी आपण विसरून गेलो आहोत… आता तुम्ही म्हणाल ही अक्कल तुम्ही आम्हाला का शिकवताय? हे ज्ञान आताच पाजलायचे कारण काय? तर विषय असाय भावांनो… आजचा व्हायरल व्हिडीओ हा आपली संस्कृती दाखवणारा आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, काही महिला एकत्र येऊन डान्स करत आहेत.

आपल्या आई-वडिलांना समोर बसवून त्यांचा मस्तपैकी डान्स सुरू आहे. मात्र पुढच्या काही सेकंदाला आपल्याला कळू लागतं की, हे तर आई- वडिलांना डेडीकेट केलेलं गाणं आहे. ये तो सच है की, भगवान है… या गाण्यावर अनेक तरुणी एकत्र येऊन डान्स करत असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि यातून त्यांनी जे संस्कृती, आई वडिलांचा आदर याविषयीचे दर्शन घडवले आहे, ते अफलातून आणि ग्रेट आहे. कलेच्या माध्यमातून एखादा सुंदर विचार पसरवणे, ही गोष्टच मुळात अफाट आहे.

माणूस या जगात कसा वागतो, कसा बोलतो, कसा विचार करतो याला एकत्रितपणे मानवी वर्तणूक किंवा वागणूक असे म्हणतात. आहार, निद्रा, भय, मैथुन, अपत्यप्रेम, नातेवाइकांबद्दलचे प्रेम, समूहनिष्ठा, आक्रमकता, कुतूहल वगैरे अनेक मानसिक गुणधर्म आपल्याला नैसर्गिकरित्या मिळतात पुढे त्याची संस्कृती होते. म्हणजे चांगल्या गोष्टी व्यवस्थित निवडून त्या स्वीकारल्या जातात. आणि त्याचे पालन केले जाते, मात्र आई वडिलांना जपणे, ही बेसिक गोष्ट आपण कधीच विसरलेले असतो. आता हा व्हिडीओ बघा आणि ही संस्कृती जपण्यासाठी शेअर करा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *