घर हे असे ठिकाण आहे जिथे आपण दिवसभराचा थकवा घालवतो. आपल्या कुटुंबासोबत आपले सुख दुःख वाटतो आणि म्हणून प्रत्येकाला आपल्या घराची ओढ लागलेली असते. सामान्य माणसाला आपले घर बांधायला बरीच वर्षे लागतात आणि जर आपण फिल्म स्टार्सबद्दल बोललो तर त्याचे भव्य घर बांधण्यासही वेळ लागतो. आपणास माहित आहे की बॉलिवूड सेलेब्स घरात किती महागड्या राहतात? चला तर ह्या सर्वांच्या घराच्या किमती पाहूया. मायनागरीमध्ये असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या स्वप्नांच्या शहरात राहतात. मुंबईत घर बांधणे प्रत्येकासाठी सोपे नसते, परंतु चित्रपटांत लाखों करोडो कमावणाऱ्या फिल्मस्टार्सवर हि गोष्ट लागू होत नाही. आपणास माहित आहे की बॉलिवूड सेलेब्स घरात किती महागड्या राहतात? आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सच्या घरांच्या किंमतींबद्दल सांगत आहोत.
शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. शाहरुखचे नुसते नावच किंग नाही तर तो ख-या आयुष्यातही किंगसरखा जीवन जगतो. शाहरुख खानने २० वर्षांपूर्वी पत्नी गौरीसाठी १५ कोटींचा बंगला विकत घेतला होता, ज्याची किंमत आता २०० कोटी आहे. शाहरुख खानच्या ह्या बंगल्याचे नाव ‘मन्नत’ आहे आणि ते एका आलिशान बंगल्यापेक्षा कमी नाही. इतक्या कमी लोकांसाठी इतक्या मोठ्या बंगल्यात राहण्यामागे काय कारण आहे असे शाहरुखला विचारले असता तो म्हणाला कि आम्हां दिल्लीवाल्याना मोठ्या घरात राहण्याची सवय आहे. भलेही आम्ही कितीही गरीब का असेना. जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो तेव्हा सुरुवातीच्या काळात छोट्या छोट्या रूम मध्ये दिवस घालवलेत. तेव्हाच ठरवले होते कि मोठे घर असावे. आणि जेव्हा चित्रपटत लोकप्रिय होऊ लागले आणि चांगले उत्त्पन्न मिळू लागले तेव्हा मन्नत बद्दल कळले कि हा बंगला विकायला काढणार आहे. तेव्हा मी त्वरित हा बंगला विकत घेतला. अगोदर हा बंगला सलमान खान विकत घेणार होता, परंतु सलमान खान ह्याचे वडील सलीम खान ह्यांना सलमानला जेव्हा तू इतक्या मोठ्या घरात काय करणार हा प्रश्न विचारला तेव्हा त्याच्याकडे ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यामुळे मग त्याने हा बंगला विकत न घेता कुटुंबासोबतच गॅलॅक्सी अपार्टमेंट मध्येच राहणे पसंत केले.
अमिताभ बच्चन
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे मुंबईत २ बंगले आहेत आणि ते दोन्हीही आलिशान आहेत. या बंगल्यांपैकी एकाचे नाव जलसा आणि दुसर्या बंगल्याचे नाव प्रतीक्षा आहे. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची किंमत १२२ कोटी रुपये आहे. या बंगल्यात अमिताभ बच्चन कुटुंबासमवेत आरामात राहतात. यातली मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांनी आपला बंगला विकत घेतला नव्हता, तर चित्रपट ‘सट्टे पे सट्टा’ या चित्रपटाच्या यशस्वीतेवेळी त्यांना चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी भेट दिली होती.
शिल्पा शेट्टी
बॉलिवूडची फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी सर्वात हिट अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पाने चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले आहे पण २००९ मध्ये तिने राज कुंद्राशी लग्न केले होते. शिल्पा जुहूच्या एका आलिशान बंगल्यात पतीबरोबर राहते. किनारा नावाच्या आलिशान घराची किंमत ९३ कोटी आहे आणि हे घर समुद्राच्या किना-यावर वसलेले आहे.
रेखा
बॉलिवूडची सदाबहार नायिका रेखाचे घर सुद्धा आलिशान महालपेक्षा कमी नाही. बांबूने वेढलेला त्याचा बंगला खूप सुंदर दिसत आहे. रेखाचे घर १०२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते आणि यात ती आपल्या सचिवांसोबत एकटीच राहते.
अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचे घर कोणत्याही पॅलेसपेक्षा कमी नाही. अक्षय कुमारचे घर हे जुहू येथील समुद्र किनाऱ्याजवळ प्राईम बीच नावाच्या इमारती मध्ये आहे. यातली सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे अक्षयने हा बंगला स्ट्रगल करत असताना पाहिला होता आणि अनेकदा तो हा बंगला लांबून पाहत असे. अक्षयकडे आज तोच बंगला आहे आणि त्याची किंमत ८७ कोटी रुपये आहे.