Breaking News
Home / जरा हटके / इमारतीच्या छतावर वर मुलगा ल’टकलेला असताना ह्या तरुणाने वेळप्रसंगी जे केले ते पाहून तुम्ही सुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ

इमारतीच्या छतावर वर मुलगा ल’टकलेला असताना ह्या तरुणाने वेळप्रसंगी जे केले ते पाहून तुम्ही सुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ

गेली दहा एक वर्ष आपण सातत्याने सुपर हिरोंवर बेतलेल्या चित्रपटांना प्रदर्शित होताना आणि खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी पाहिलं आहे. या आधीच्या काळातही हे चित्रपट येत होतेच. पण गेल्या दशकभरात सिनेमांना मिळालेली तंत्रज्ञानाची जोड यामुळे या सिनेमांचे सादरीकरण अजून आकर्षक झाले. चाहत्यांची संख्याही वाढली. पण सिनेमातील हे सगळे सुपर हिरोज नाही म्हंटले तरी काल्पनिक. पण खऱ्या आयुष्यात सुपर हिरोज असतात का असा विचार केला तर? सध्याच्या परिस्थितीत होय असं उत्तर येईल. कारण गेल्या वर्षभरापासून आपले फ्रंटलाईन को’विड वॉ’रियर्स हेच आपले सुपर हिरोज झाले आहेत. सोबतच आपल्या अडल्या नडल्याला आणि अगदी काहीही ओळख नसताना मदत करणारी माणसं ही सुपर हिरोच म्हणावी अशी असतात. अशाच एका खऱ्या आयुष्यातील सुपर हिरोचा व्हिडियो आपल्या टीम समोर आला आणि आपल्याला त्याविषयी कळावं म्हणून हा लेख प्रपंच.

हा सुपर हिरो अनामिक आहे. त्यात त्याच्या जवळ स्पेशल सूट वगैरे तर काहीच नाही. अहो पायात चप्पल ही नाही. पण हा तरुण स्वभावाने धाडसी आणि मनाने सहृदयी आहे हे नक्की. तर होतं काय तर, हा तरुण उभ्या असलेल्या ठिकाणी एक घटना घडते आणि त्यावर तरुणाकडून प्रसंगावधान राखत तात्काळ प्रतिक्रिया उमटते. ही प्रतिक्रिया त्यावेळेस इतकी महत्त्वाची असते की ती एका लहान मुलाचा जीव वाचवण्यात मदत करते. होतं असं की काही रस्त्यावर लहान मुलं खेळत असतात. जवळच शाळेसारखी एक इमारत आपल्याला व्हिडियोत दिसत असते. या मुलांच्या मधला एक मुलगा कसा काय तो या इमारतीच्या छतावर जाऊन पोहोचतो. काही क्षणांनी लक्षात येतं तर हा मुलगा छताला लटकत असतो. त्यात त्याचा जीव तो केवढा, त्यामुळे तो अशा परिस्थितीत किती वेळ लटकून राहील हे सांगणं कठीण असतं. आजूबाजूच्यांना याची कुणकुण लागते आणि बघे जमा होतात. हा मुलगा ज्या बाजूने लटकत असतो तिथे खाली बऱ्याच अंतरावर कोणतेही बांधकाम नसते.

त्यामुळे जोर करून ना धड वर जाऊ शकत ना खाली उडी मारू शकत अशी अवस्था. पण आता जमलेल्या बघ्यांमधून वर उल्लेख केलेला तरुण तातडीने पूढे येतो. त्या इमारतीच्या दरवाजावर जातो तर दरवाजा बंद. मग क्षणाचाही वेळ न दवडता थेट दुसऱ्या बाजूस जातो. तिथून त्या भिंतीवर चढाई करण्यास सुरुवात करतो. इमारतीचा जमेल तो कोना, खिडक्या अशा ज्या ज्या गोष्टींचा आधार घेता येईल त्या त्या गोष्टींचा आधार घेत हा तरुण चढाई करत असतो. इमारत दुमजली असल्याने चटचट चढत तो दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो. आता आव्हान असतं ते या इमारतीच्या छतावर जायचं. तो जिथे असतो तिथे खिडकी उघडी असते. त्यामुळे काही सेकंद तो स्वतःची पकड घट्ट जमवतो. पक्की खात्री झाल्यावर मग स्वतःला त्या गच्चीवर चढवण्यात त्याला यश येतं. तिथूनही मग त्वरेने या लोंबकळत असलेल्या मुलाकडे तो धाव घेतो. त्याचे दोन्ही हात धरतो आणि त्याला उचलून घेऊन गच्चीवर सुरक्षित ठेवतो. हे सगळं होतं अवघ्या काही सेकंदात आणि एका मिनिटाच्या आत.

या संपूर्ण वेळेत आपण आपला श्वास रोखून जे चाललं आहे ते पाहत असतो. जसा तो तरुण त्या मुलाला वर उचलून घेतो तसा आपण सगळे निश्वास सोडतो. मनोमन देवाचे आभार मानतो. हा तरुण तिथे नसता, त्याने चट्कन हालचाल केली नसती तर त्या कोवळ्या जीवाचं काय झालं असतं याची कल्पना करवत नाही. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. मागील आठवड्यात आपण मयूर शेळके यांच्या रूपाने याचा अनुभव घेतला. आज या व्हिडियोतील तरुणाच्या रूपाने पुन्हा याची प्रचिती आली. हा व्हिडियो तसा जुना आहे. पण तरीही आजही तेवढाच चित्तथरारक वाटतो. तसंच या तरुणाच्या प्रसंगावधानाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मराठी गप्पाच्या टिमकडून या तरुणाला, या अनामिक सुपर हिरोला मानाचा मुजरा.

आपल्याला हा लेख आवडला असेलच. पण कुठेही जाऊ नका. खास तुमच्यासाठी आपली टीम दररोज नवनवीन लेख लिहीत असते. त्यांचा आस्वाद जरूर घ्या आणि नेहमीप्रमाणे आपले लेख शेअर ही करा. आपला आमच्या टीमवरचा लोभ असाच कायम असुद्यात. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *