Breaking News
Home / ठळक बातम्या / उंच टेकडीवरून पाळण्यावर जोरात झोका घेत होत्या २ तरुणी, अचानक तोल गेला आणि बघा पुढे काय घडलं ते

उंच टेकडीवरून पाळण्यावर जोरात झोका घेत होत्या २ तरुणी, अचानक तोल गेला आणि बघा पुढे काय घडलं ते

आयुष्यात काहीतरी ‘थ्रिल’ पाहिजे यार, असं आपण नेहमीच म्हणत असतो. 24 नोकरी, 25 ला छोकरी हे करून संसारात रमलेल्या अनेकांना आयुष्यात थ्रिल बोले तो ‘थरार’ अनुभवायचा असतो. पण थरार अनुभवायच्या नादात कधी कधी मोठ्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते. थ्रिल घेण्यासाठी आपण गड,किल्ले चढतो. महिन्यातून एखाद्यावेळी एखाद्या अभयारण्यातही जातो. तर तरुणाई बाईक रायडिंग करत दूरचा पल्ला गाठते. यात नेमकं थ्रिल कशात असतं, हे माहिती नसलं तरी आनंद मिळतो हे नक्की. काही लोक तर थ्रिल अनुभवण्यासाठी काहीही अचाट साहस करतात. काहीजण चालू रेल्वेतून हात-पाय बाहेर काढतात. तर काहीजण उंचच उंच अशा इमारतीवरून उड्या मारतात. परदेशात या अशा गोष्टींचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं जातं आणि मग असे ‘थ्रिल’ देणारे अनुभव घेतले जातात. आपल्याकडे मात्र कुठलंही प्रशिक्षण न घेता थेट “थ्रिल” अनुभवण्यासाठी काहीतरी ‘थिल्लरपणा’ केला जातो.

उंचच उंच टेकड्यांवर आपण अनेकदा गेला असाल. पण टेकड्यावरून खाली दरीत डोकून बघायची हिम्मत कोणाचीच होत नाही. कुणाची दरीकडे नजर गेली तरी चक्कर आल्यासारखं होतं. कल्पना करा… एक झोका आहे. त्यावर तुम्ही बसलेले आहात. आणि झोका खेळता खेळता अचानक झोक्याची साखळी तुटते आणि तुम्ही तब्बल 5300 फूट दरीत फेकले जाता. कल्पना करवत नाही… पण जाणून आश्चर्य वाटेल की, 2 मुलींनी याचा अनुभव ‘याची देही, याची डोळा’ घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. उंच टेकडीवर एक झोका आहे. झोका दिल्यावर तो झोका थेट दरीकडे जातो, झोक्यावर बसलेल्या व्यक्तीला दरीची उंची दिसते आणि “थ्रिल” अनुभवता येते. या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, 2 तरुणी या झोक्यावर बसलेल्या आहेत. आणि त्यांना एक इसम झोका देत आहे. आजूबाजूला लोकांची गर्दी जमलेली आहे. या टेकडीवर असणारी दरी तब्बल 6300 फूट खोल आहे. म्हणजे चुकूनही एखाद्याचा पाय निसटला तरी कार्यक्रम संपला….

रशियामधील सुलक कैन्यन या भागात या 2 तरुणी थ्रिल अनुभवत आहेत. मस्त मस्त हिरवेगार पहाड, हवेहवेसे वाटणारे नैसर्गिक वातावरण आहे. चोहोबाजूला या माहोलचा आनंद घेणारे लोक आपल्याला दिसत आहेत. सगळे काही व्यवस्थित चालू असताना अचानक त्यांच्या झोक्याची साखळी तूटते आणि मोठ्याने आवाज सुरू होतो. गडबड गोंधळ वाढतो. या दोन्ही मुली दरीच्या दिशेने कोसळलेल्या असतात. सगळे जण पुढे धावतात. पण त्यांना वाचवायला दरीत उडी घेणार कोण?, शेवटी आपला जीव आणि आपली सुरक्षा प्रत्येकालाच महत्वाची असते.

मात्र सुदैवानं या मुलींना किरकोळ जखमेव्यतिरिक्त काहीच होत नाही. त्यांचा जीव वाचतो. कारण कडाकाठा ओपन असलेल्या या दरीत कुणी चुकून पडल्यास जीव वाचवा म्हणून दरीच्या बाजूला काही फुटांचा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. त्यामुळे कुणीही पडलं तरीही थेट दरीत कोसळत नाही.
या प्लॅटफॉर्ममुळे 2 तरुण मुली वाचल्या. आणि ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडीओ बघताना अंगाचा थरकाप होतो. त्यामुळे थ्रिल अनुभवयाच्या नादात आपला जीव गमावून बसणारे कितीतरी लोक आहेत. म्हणून अशा ठिकाणी जाताना कायम आपल्या सुरक्षेची आपणच काळजी घ्यावी.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *