Breaking News
Home / मनोरंजन / ‘उगा ताप नको डोस्क्याला…’ ट्युशन मध्ये अभ्यासाला कंटाळा करणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

‘उगा ताप नको डोस्क्याला…’ ट्युशन मध्ये अभ्यासाला कंटाळा करणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

लहानपणी अभ्यास म्हटलं तरी डोकं गार होऊन जायचं. खेळायला जितकी मजा येते अगदी त्याच्या उलट अभ्यास करायला लहान मुलांना कंटाळा येतो. आता हाच व्हिडीओ बघा ना क्लासमध्ये चिमुकली जबरदस्ती अभ्यासाला बसली आहे. कदाचित तिच्या मनात पुढील विचार चालू असतील. आई येईस्तोवर जरा अभ्यास कर म्हणायली तर जमना त्याला. कंटाळा येतोय म्हणायलेयं तरीबी बाईला कळंना. मम्मी म्हणली की दोन पेज कर तर बाईगुडी म्हणतेयं तीन पेज करं आता कसं सांगू या खुळ्यांना मला अभ्यास करायला कंटाळा यायलायं. आता लिहायला बसलेयं आणि मम्मी पण येईना आणि ही बाई काय सोडीना मला घरी. मी आपलं एवढं आपल्या आपल्या एवढं लिहीणार आणि आई आली की निघून जाणार मला घरी. नस्ता ताप झालायं डोक्याला. इथपर्यंत लिहून घ्यायची, दोन दोन तीन तीन पानं यांना लिहून द्या आणि पैशे पण यांनाच द्या.

असलं कसलं हे क्लासेस इथं मेहनत पण आपनच करायची आणि बाईंच्या महिन्याचे फी पण आपनचं द्यायची नुसता डोक्याला ताप झालायं. कसलं ते रोज रोज अभ्यास आणि फकस्त अभ्यासच. आपल्याला नाही झेपायचंयं आता बाई म्हणजे रव्वार बी नाय खेळायला. तो पण बंद करुन टाकला क्लासच्या नावाखाली. आता रव्वारी कुणी अभ्यासाला येतंयं का अभ्यास करायच्या बदल्यात मी बाहेर मस्त खेळलो असतो. आणि असं पण पुन्हा सोमवार येतोयं ना अभ्यासाला. एक दिवस सुटीचा मिळतो त्यो बी या बाईंनी ब्लॉक करुन माझ्या डोक्याचा ताप वाढवून ठेवलायं. पान दोन करुन मी आपली निघते, असं सांगत ही चिमुकली दप्तर भरू लागते. बाकीच्या मोठ्या पोरांचं आवरलं पाच पान लिहून पण हीचंं काही तास संपला तरीबी आवरेना.

त्यांच्या या सगळ्या अभ्यासाच्या मागे आपली ही चिमु ताई अजून अभ्यासाला बसलीयं. आता अभ्यास करायचा म्हटल्यावर ट्यूशनच्या बाईंनी जरा तिला बळंच बसवलं. अभ्यास तर होत राहील हो तिला बसवलं त्याच्यासाठी की आपण हून एक व्हीडिओ तयार करायचा आणि इन्स्टाग्रामवर टाकायचा. म्हणून रील बनवायला घेतलायं. पण आपल्या मनू ताईची सगळी पोरं ट्युशनमध्ये शाळा घेत होते. आता पोरांनी व्हीडिओ चालू केला आणि बाईंनी चिमु ताईची शाळा. आणि झाला ना ताईला डोक्याला ताप. त्यांच्या या सगळ्या तापात तिचा व्हीडिओ रेकॉर्ड सुरू केला.

आता ताईला तीन पानं पूर्ण होईपर्यंत सगळं लिहून पूर्ण करावं लागणार. त्यात मनुची आई पण घरी न्यायला येईना यात सगळं ताईनं ठरवलंयं की आता फकस्त हे एवढं दोन पानं करणार आणि मी निघून जाणार सगळं काचकं बोचकं बांधून. या सगळ्या पसऱ्यात रिकॉर्ड करणारी ताई रेकॉर्डचं बटण बंद करायला विसरली. बाईनं सांगितलं तेव्हा कुठं ते बटन बंद केलं नाही.

आत्ताच्या पोरांना क्लास काय आणि काय काय? किती तो व्याप त्यांच्या मागे.एवढूशी पोरं पण त्यांच्या या सगळ्याच्या व्यापात व्याप. व्याप इतका वाढवून ठेवलायं की सगळं त्यांच्या पाठीवर धोपटं वाढून ठेवलंयं. इतका अभ्यास हा आमच्या काळातही नव्हता. फक्त शाळेतला अभ्यास केला की झालं मोकळं, असं असायचं. पण आता या पोरांच्या मागे क्लासेसचं भूत लागलंयं ना त्याला पोरं पण वैतागलीयंतं. त्यांना पण काही करायचं ते समजायला मार्ग मोकळा नाही. इतकं झालंयं की डोक्याला ताप होऊन बसलायं. जसा चिमू ताईला झालायं.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.