Breaking News
Home / मनोरंजन / उत्साही नवरदेवाने लग्न झाल्या झाल्या केला अतरंगी डान्स, पाहून हसू आवरणार नाही

उत्साही नवरदेवाने लग्न झाल्या झाल्या केला अतरंगी डान्स, पाहून हसू आवरणार नाही

लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून असं म्हणतात. खरच आहे ते. कारण या दोन्ही गोष्टी साध्य करताना जे काही नाकी नऊ येतात की काय विचारता सोय नाही. कारण आपल्या आयुष्यातील या दोन मोठ्या घटना असतात. यांच्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही आमूलाग्र बदल होतात त्यांना तोड नसतो. त्यामुळेच यांचं आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे आणि यापुढेही राहील.

बरं त्यातल्या त्यात लग्न म्हणजे आनंद सोहळाच असतो. ते वातावरणच वेगळं असतं. आता तर याची आपल्या सगळ्यांना प्रचिती यायला सुरुवात झाली असेल. कारण यंदाही मागील वर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात लग्न होत आहेत. मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे म्हणजे आपल्या सारख्यांची तारेवरची कसरत होय. कारण हल्ली करोनाच्या भीतीने निवडक लोकांनाच बोलावलं जात. त्यात आपल्याला निमंत्रण असून गेलं नाही तर बरं दिसत नाही. पण एक खरं, की काही जण यातही नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत असतात. त्यामुळे अनेक मित्रमंडळी ही अगदी व्हिडियो कॉलच्या माध्यमातून उपस्थित राहतात.

तसेच नंतर मागाहून या सोहळ्यात चित्रीत झालेले अनेक व्हिडियोज ही बघायला मिळतातच. त्यातलेच काही व्हिडियो हे नंतर एवढे वायरल होतात की परिचित अपरिचित अशा सगळ्यांना या क्षणांची मजा लुटता येते. त्यात एखादा व्हिडियो अगदी छोटा असेल पण त्यातील धमाल जबरदस्त असेल तर तो वायरल होतोच. सहसा लग्नातील डान्सचे व्हिडियोज हे यांमुळे प्रसिध्द होताना आपण पाहतो. आपल्या टीमने आजच एक व्हिडियो पाहिला. किती वेळेचा असेल तर अर्ध्या मिनिटांहून कमी वेळेचा. पण या वेळेतही जी धमाल येते ती कदाचित मोठ्या वेळेच्या व्हिडियोज मध्ये ही येणार नाही. यात आपल्याला सगळी वर्हाडी मंडळी आणि नवरा नवरी उभे असलेले दिसत असतात. त्यात नवरी असलेली ताई मात्र लाजत उभी असते. तिला डान्स करायचा नसतो. पण नवरदेव मात्र अगदी फॉर्मात असतात. ते स्वतः डान्स करता करता तिलाही नाचायला लावतात. खरं तर विवाहप्रसंगी अनेक वेळेस नवरा नवरी हे तणावाखाली असतात. इतके की काही जणांना तर त्याक्षणी घेरी येते. पण काही मात्र अगदी धमाल असतात. या व्हिडियोतील नवरदेवाप्रमाणे. ते स्वतः ही उत्साही असतात आणि बाकीच्यांनाही उत्साही करतात. लग्न झाल्याचा आनंद प्रत्येकाला होत असतो.

पण प्रत्येकालाच तो व्यक्त करता येतोच अस नाही. पण हे दादा मात्र त्याला अपवाद ठरतात आणि अगदी थोड्या वेळेतही धमाल करतात. किंबहुना हा छोटा व्हिडियो आहे. पण तत्क्षणी त्यांनी मात्र त्यांनी जबरदस्त डान्स करून मस्त मजा केली असणार यात शंका नाही. या सगळ्या मजामस्तीचा छोटा अंश असला तरी हा व्हिडियो जबरदस्त आहे. पण त्याविषयी सगळ्याच बाबी शब्दांत मांडणं कठीण आहे. कारण हे क्षण आपण स्वतः पाहत त्यांचा आनंद घेऊ शकतो. त्याविषयी वाचून मात्र तेवढा आनंद घेता येईलच असा नाही. त्यामुळे हा लेख वाचून झाला की हा व्हिडियो नक्की बघा. वर उल्लेख केल्याप्रमाणे व्हिडियो लहान आहे. पण त्यातील गंमतीमुळे तुम्ही तो वारंवार पाहाल आणि त्याचा आनंद घ्याल हे नक्की. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.