Breaking News
Home / मनोरंजन / ऍम्ब्युलन्सच्या मागे ८ किलोमीटर धावत राहिली घोडी, कारण वाचल्यावर तुमच्यादेखील डोळ्यांतून अश्रू येतील

ऍम्ब्युलन्सच्या मागे ८ किलोमीटर धावत राहिली घोडी, कारण वाचल्यावर तुमच्यादेखील डोळ्यांतून अश्रू येतील

जगातील सगळ्यांत ताकदवान भावना कोणती असेल तर ती आहे – प्रेम ! केवळ अडीच अक्षरांनी जीचं नाव पूर्ण होतं, पण तिचं वर्णन करायला गेलं तर कितीही शब्द वापरले तरी अपुरे पडतात अशी ही भावना ! आपल्या प्रत्येकातच ही भावना जागृत असते आणि प्रबळ सुदधा असते. ही भावना स्वतः विषयी सुद्धा असू शकते, एखाद्या व्यक्ती वा इतर सजीवांविषयी असू शकते इतकंच काय पण निर्जीव वस्तूंशी ही आपलं भावनिक नातं असतंच. त्यामुळे बघायला गेलं तर या भावनेने आपलं आयुष्य भारून टाकलंय असं म्हणायला हरकत नाही.

तर अशा या भावनेचा प्रत्यय आपल्याला वारंवार येत असतो. अगदी एखाद्या छोट्यातल्या छोट्या घटनेपासून ते मोठ्या घटनेपर्यंत सगळ्या वेळी याची अनुभूती होत असते. पण या भावनेचा खरा कस लागतो तो प्रतिकूल काळात ! कारण गोष्टी, घटना या आपल्याला अनुकूल असतील तेव्हा आपल्याशी सगळेच प्रेमाने वागतात. किंवा तसं आपल्याला वाटतं. पण जेव्हा खरंच वेळ येते, तेव्हा मात्र आपल्यावर खरं प्रेम कोणाचं हे कळून येतं. कारण परिस्थिती कितीही बिकट असू दे, खरं प्रेम आपली साथ कधीही सोडत नाही. किंबहुना या प्रतिकुल काळात ते अगदी ठामपणे आपल्या पाठीशी उभं असतं. अर्थात प्रेम ही भावना जशी माणसाला लागू होते तशीच ती अन्य सजीवांत ही असते. त्यामुळे या भावनेच प्रकटीकरण अन्य सजीव ही करत असतातच.

मध्यंतरी एक परदेशी व्हिडियो वायरल झाला होता, ज्यात एक गाय आणि तिच्या मायेत वाढलेला एक कुत्रा यांची ती कथा होती. काही कारणाने त्या गायीला दुसऱ्या एका गोठ्यात नेलं जात होतं. त्यामुळे व्यथित झालेला कुत्रा अगदी रडताना आपण स्पष्टपणे पाहू शकत होतो. शेवटी या दोघांना एकमेकांचा लागलेला लळा पाहून या कुत्र्याला तिच्या नवीन गोठ्यात ही जाऊ दिलं जाऊ लागलं. अशाच एका प्राण्यांच्या जोडीतील प्रेम काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. ही घटना, आपल्या जयपूरची ! या शहराच्या एका भागात दोन घोड्या होत्या. त्यातील एकीची तब्येत बरीच ढासळली होती. बहुधा ही बाब कोणा पशुप्रेमी व्यक्तीच्या लक्षात आली असावी. त्यांनी या भागातील ऍनिमल एड या संस्थेस ही माहिती दिली. या संस्थेने ही मग त्वरेने या आजारी घोडीला आपल्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यास सुरुवात केली. पण आपल्या बहिणीला कुठे घेऊन जात आहेत म्हणून या घोडीची बहीण मात्र अस्वस्थ झाली होती. तिला राहवेना ! परिणामतः जेव्हा या आजारी घोडिसकट ही ऍम्ब्युलन्स निघाली तेव्हा तिची बहिणही या गाडी पाठोपाठ धावत सुटली.

प्रथितयश वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार तब्बल आठ किलोमीटर हे अंतर या घोडीने पार केलं. एखाद्या प्राण्यासाठी आणि ते ही एका घोडीसाठी हे अंतर नक्कीच जास्त नाही. पण केवळ आपल्या भगिनी प्रेमापोटी तिने केलेली ही घोडदौड सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनली होती. इतकंच काय तर अनेकांनी हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले होते. ते बऱ्याच अंशी वायरल झाले होते. आपल्या टीमने ही हे अंश पाहिले आहेत आणि या लेखाच्या शेवटी ते आपल्यासोबत शेअर करतो आहोत. असो.

तर मूळ मुद्दा हा की प्रेम ही सगळ्यांत ताकदवान भावना आहे आणि राहील. तसेच याच भावनेतून सजीवमात्र अनपेक्षित गोष्टी ही करून जातात. वर उल्लेख केलेली दोन उदाहरणं ही याची द्योतक आहेत हे नक्की. असो. बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.