Breaking News
Home / ठळक बातम्या / एकटेपणामुळे प्रेयसी विवाहित प्रियकराच्या पत्नीला म्हणाली, माझी पूर्ण प्रॉपर्टी घे, तुझा नवरा मला दे

एकटेपणामुळे प्रेयसी विवाहित प्रियकराच्या पत्नीला म्हणाली, माझी पूर्ण प्रॉपर्टी घे, तुझा नवरा मला दे

लॉकडाऊनच्या काळात जवळजवळ सगळेच जण घरात बसून आहेत. प्रत्येकजण आजारापासून स्वतःला कसं दूर ठेवायचे ह्याचे प्रयत्न करतोय. असं असताना देशभरात विचित्र घटना सुद्धा घडत आहेत. अशीच एक घटना भोपाळमध्ये घडली आहे जी वाचून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. लॉकडाऊनच्या काळात आपल्या विवाहित प्रियकराशी भेटता न आल्याने, एकटं वाटल्यामुळे प्रेयसीने तडक त्याच्या घरी बायकोसमोरच त्याची मागणी केली. ५७ वर्षाच्या एका सरकारी महिला ऑफिसरला आपल्याहुन जुनिअर ४५ वर्षीय सहकर्मचारी व्यक्तीशी इतके प्रेम झाले कि एक दिवस ती त्याच्या घरी आली आणि त्याच्या पत्नीला म्हणाली कि माझी सर्व संपत्ती घेऊन टाक आणि तुझा नवरा मला देऊन टाक. हि हैराण करून सोडणारी घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील आहे. हि तक्रार भोपाळच्या फॅमिली कोर्ट मध्ये तक्रार पाहणाऱ्या काऊन्सलर जवळ १७ एप्रिलला आली.

ह्या घटनेची काऊन्सलिंग करणाऱ्या काऊन्सलर सरिता राजानी ह्यांनी ह्या घटनेबद्दल माहिती दिली. राजानीने सांगितले कि मध्य प्रदेशच्या सरकारी विभागात विशेष पदावर काम करणाऱ्या सरकारी महिला ऑफिसरच्या पतीचे १० वर्षाअगोदर नि धन झाले आहे. त्यानंतर मुलगा-सुन सुद्धा तिच्यासोबत तिरस्काराने वागत होत्या. अश्यामध्ये त्या महिलेसोबत काम करणाऱ्या ४५ वर्षीय सहकर्मचारी सोबत तिची जवळीकता वाढली. कोरोनामुळे देशभर चालू असलेल्या लोकडाऊन मुळे २५ मार्चपासून एकटं राहत असल्याच्या दरम्यान महिलेला आपल्या प्रियकराची कमी जाणवू लागली, अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर ती १७ एप्रिलला आपल्या प्रेमीच्या घरी पोहोचली.

किचन मध्ये काम करत असणारी प्रियकराची पत्नी जेव्हा किचनमध्ये खोलीत आली तेव्हा हैराण झाली. त्या सरकारी महिला ऑफिसरने तिथेच आपल्या प्रियकराच्या पत्नीला सांगितले कि तू माझी सर्व प्रॉपर्टी घेऊन टाक आणि तुझा नवरा मला देऊन टाक. हे ऐकताच घरामध्ये एकच गोंधळ उडाला आणि मग त्या सरकारी महिलेचे मुलगा आणि सून सुद्धा तिथे आले. त्यांनतर दोन्हीकडून जोरदार भांडण झाले. त्यानंतर हे भांडण काउन्सिलिंग साठी सरिता राजानी ह्यांच्याजावळ आले. धक्का तर तेव्हा बसला जेव्हा प्रियकराने त्याच्या पत्नीला सांगितले कि तो त्या महिलेला (प्रेयसी) एकटं सोडू शकत नाही. ह्यावर त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे कि १४ वर्षानंतर पतीने तिला फसवलं आहे, ती त्याला कधीच क्षमा करू शकत नाही. ह्यानंतर दोन्ही कडच्या लोकांना समजावलं जात आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.