Breaking News
Home / मनोरंजन / एकदा लग्न लावून दिलं कि देवही वरुन खाली पाहत नाही… ह्या ताईंनी बनवलेली हि भन्नाट कविता ऐकून हसू आवरणार नाही

एकदा लग्न लावून दिलं कि देवही वरुन खाली पाहत नाही… ह्या ताईंनी बनवलेली हि भन्नाट कविता ऐकून हसू आवरणार नाही

तर लग्नाचा विषय खोल असतोय भावांनो… आता गेल्या लग्नसराईत तुमच्या अनेक मित्रांचे, मैत्रिणींचे, भावांचे, बहिणींचे लग्न झाले असेल. आता कट्ट्यावर तुमच्यासोबत कायम बसायला येणारा दोस्त लग्न झाल्यावर कट्ट्यावर यायचा कमी झाला असेल. रोज रात्री उशिरापर्यंत सहजतेने भेटणारा भाऊ किंवा मित्र डायरेक्ट भेटायचा बंदच झाला असेल. एवढंच नाही तर समज… तुमच लग्न झालेले आहे आणि एखाद्या ठिकाणी तुम्ही विनाकारण बसलेले आहात. आणि तुम्हाला तिथून उठुन जायचं आहे. बायकोचं कारण सांगून तुम्ही तिथून सहज सटकू शकता. कारण बाकीच्यांना पण बायकोची दहशत काय असते, याचा अंदाज असतो. घरोघरी बायकांची विविध रुपं तुम्हाला दिसतील. तशीच नवऱ्याचीही दिसतील. घरात मांजर असणारा नवरा बाहेर कसा रुबाब गाजवतो, अशीही काही उदाहरणे तुम्ही बघितली असतील. शेवटी जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती… आता तुम्ही म्हणाल ही अक्कल आम्हाला का शिकवताय? आमचं तर लग्न झालं नाही… किंवा काहींच झालेलं असेलही… तर आजचा विषय आहे लग्नाचा… एका ताईने एकदमच जबरदस्त आणि मजेशीर अशी कविता सादर केली आहे.

ही कविता पाहून न लग्न झालेले तर हसतीलच पण न लग्न झालेले सुद्धा हसतील. ही कविता लग्नाआधी आणि लग्नानंतर असलेल्या गोष्टी मजेतून सांगते. विशेष म्हणजे ‘लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधतो’ असे जे म्हटले आहे… त्यासाठी तर हा व्हिडीओ बघायलाच हवा. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात बायकोवरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा नवरा गाणं म्हणताना तुम्ही बघितला असेल. नवीन नवीन लग्न झाल्यावर एखाद्याने बायकोवर गोड गोड कविताही केलेली तुम्ही बघितली असेल. पण आता चक्क एका बायकोने थेट नवऱ्यासमोर लग्नाची कविता रचली आहे. आणि हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी, आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो.

बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले – मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात. हे सगळं खरं असलं तरी लग्नानंतर जो पचका व्हायचा तो होतोच. तो पचका नेमका काय असतो, हे तुम्हाला व्हिडीओतुन तेही मजेदार पद्धतीने कळेलच. पण लग्न म्हणजे नेमकं काय ते पुढच्या काही वाक्यात सहजतेने समजून घ्या… जेणेकरून आपल्या उरल्या सुरल्या आयुष्याचा तरी पचका होणार नाही.

लग्न कशासाठी, याची समज येण्यासाठी आणि त्याचं अवलंबन करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. विचारस्वातंत्र्य हवं आणि तरी विश्वास हवा. या दोन गोष्टींमधून प्रेम जन्म घेतं. संसारात अडचणी असणारच आणि त्याचे क्लेश होतात तेव्हा साथीदार लागतो. तसा साथीदार जोडीदाराच्या अडचणीच्या वेळी हजर असला तर लग्न कशासाठी ते नीट कळतं. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *