Breaking News
Home / बॉलीवुड / एकाच चित्रपटातून बनली होती रातोरात स्टार, आता जगत आहे असे आयुष्य

एकाच चित्रपटातून बनली होती रातोरात स्टार, आता जगत आहे असे आयुष्य

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये लोकं येत जात राहतात. माहिती नाही, किती लोकं मुंबईसारख्या मायानगरीत आपल्या डोळ्यांतील स्वप्न घेऊन येतात. परंतु बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत कधी कोणाचे नशीब चमकेल आणि कधी कोणता सितारा खाली कोसळेल, काहीच सांगता येत नाही. नशीब कधी कोणाचे साथ देईल आणि कधी कोणापासून तोंड फिरवेल ह्याबद्दल कोणीच सांगता येत नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये किती अशी लोकं आहेत, जे एके काळी ह्या इंडस्ट्रीवर राज्य करत होते, तर आज त्यांना कोणीही विचारत सुद्धा नाही आहे. काही दिवसांपूर्वीच एक बातमी आली होती कि अनुपमखेर ज्यांनी एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य केले आहे, आज त्यांच्याजवळ काम नाही आहे. ह्या गोष्टीचा खुलासा स्वतः अनुपमखेर ह्यांनी एका मुलाखतीत केला होता. आजच्या काळात बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, जे अनोळखी आयुष्य जगत आहेत. आज आम्ही आपल्या ह्या लेखात अश्याच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी अनोळखी आयुष्य जगत आहे.

‘मैं दुनिया भूला दूंगा तेरी चाहत में’ हे गाणे ऐकताच साधी सरळ आणि प्रेमळ मुलगी अनु अग्रवाल आणि राहुल रॉय ह्या दोघांचाही चेहरा आपल्या समोर येतो. मध्यंतरी राहुल रॉय चित्रपटसृष्टीतून गायब झाला होता. परंतु ‘बिग बॉस’ सारख्या रिऍलिटी शो आणि त्यानंतर अनेक पार्टीज मध्ये तो दिसून आला. परंतु अनु मात्र चित्रपटसृष्टीतून गायबच झालेली आहे. ११ जानेवारी १९६९ ला दिल्लीला जन्मलेल्या अनु अग्रवाल त्या वेळी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून समाजशास्त्रचे शिक्षण घेत असताना तिला महेश भट्टने आपल्या ‘आशिकी’ ह्या रोमँटिक चित्रपटात पहिला ब्रेक दिला होता. महेश भट्ट ह्यांचा ‘आशिकी’ हा चित्रपट तर तुम्हांला लक्षातच असेल, ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून दिली होती. ह्या चित्रपटात मुख्य अभिनेत्रींच्या रूपात दिसून आलेली अनु अग्रवाल रातोरात स्टार बनली होती. फक्त २१ व्या वर्षीच इंडस्ट्री मध्ये पॉल ठेवणाऱ्या अनुने ह्या चित्रपटाद्वारे आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. ह्या चित्रपटाची गाणी आज सुद्धा लोकप्रिय आहेत. ह्यानंतर तिचे ‘गजब तमाशा’, ‘खलनायिका’, ‘कन्यादान’ आणि ‘किंग अंकल’ ह्यासारखे अनेक चित्रपट आले आणि गेले कळले सुद्धा नाही. परंतु आज ती हिरोईन कुठे आहे, ह्याबद्दल खूपच कमी लोकांनाच माहिती आहे.

महेश भट्टच्या चित्रपटाने रातोरात स्टार बनलेली अनु अग्रवाल सध्याच्या घडीला अनोळखी आयुष्य जगत आहे. आज हि अभिनेत्री बिहारच्या मुंगेर मध्ये आपले आयुष्य घालवत आहे. इतकंच काय तर इंडस्ट्रीतिला कोणताच असा व्यक्ती नाही आहे जो तिची विचारपूस करू शकेल. भले हि अनुचा पहिला चित्रपट खूपच हिट झाला, परंतु त्यानंतर तिला ह्या इंडस्ट्रीमध्ये काम भेटण्यासाठी जवळजवळ ९ वर्षे संघर्ष करावा लागला होता. परंतु त्यानंतर सुद्धा तिला चित्रपटांत यश मिळाले नाही. ह्यानंतर सुद्धा तिच्या आयुष्यात एक वाईट घटना घडली. तिचा १९९९ मध्ये अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता कि, ह्या अपघातानंतर अनुची स्मरणशक्तीचा गेली आणि ती जवळजवळ २९ दिवस कोमा मध्ये होती. २९ दिवसानंतर जेव्हा ती कोमामधून बाहेर आली तेव्हा ती स्वतःला पूर्णपणे विसरली होती. स्मरणशक्ती विसरलेल्या अनुसाठी हा पुनर्जन्म होता. ते वर्ष तिच्या आयुष्यातील सर्वात त्रासदायक दिवसांपैकी एक होते. कोणी तिला शोधायचा प्रयत्न केला नाही कि तिची विचारपूस केली नाही. परंतु अनुने हार मानली नाही.

जवळजवळ ३ वर्षे उपचार केल्यानंतर ती आपल्या धुरकट आठवणींना ओळखण्यास यशस्वी झाली. अनुच्या स्मरणशक्तीवर ह्या घटनेने खूप वाईट परिणाम केले होते. परंतु इतकं होऊनही अनु ह्या घटनेतून बाहेर आली आणि आपली आत्मकथा लिहून तिने संपूर्ण जगाला सांगितले. तिने तिच्या आत्मकथेमध्ये आपल्या अनुभवांना शेअर केले आहे. अनेक वर्षांपासून ह्या बद्दल कोणालाच माहिती नव्हते कि ती कुठे आहे, कोणत्या परिस्थितीत आहे. परंतु एके दिवशी माहिती पडले कि अनु स्टारडम आणि चित्रपटसृष्टीपासून दूर बिहार येथील मुंगेर जिल्यात आपले आयुष्य व्यतीत करत आहे. ती तिथे एका शाळेत मुलांना योगा शिकवते. जेव्हा अनुचे पुस्तक लाँच झाले होते, तेव्हा महेश भट्ट ह्यांनी तिची स्तुती केली होती आणि सांगितले होते कि हि मुलगी मृत्यूच्या दारातून निघून बाहेर आली आहे. परंतु माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हि कि, कश्याप्रकारे इतक्या कठीण काळानंतर सुद्धा तिने आपल्या आयुष्याला एका चांगल्या मार्गावर आणले. अनु अग्रवालने आजपर्यंत लग्न नाही केले आहे, आज सुद्धा ती एकटे जीवन व्यतीत करत आहे आणि ती तेथील लोकांना योग शिकवत आहे. अनु अग्रवालचा लूक पूर्णपणे बदलला असून ती आता एक सरळ सोपे आयुष्य जगत आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *