बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये लोकं येत जात राहतात. माहिती नाही, किती लोकं मुंबईसारख्या मायानगरीत आपल्या डोळ्यांतील स्वप्न घेऊन येतात. परंतु बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत कधी कोणाचे नशीब चमकेल आणि कधी कोणता सितारा खाली कोसळेल, काहीच सांगता येत नाही. नशीब कधी कोणाचे साथ देईल आणि कधी कोणापासून तोंड फिरवेल ह्याबद्दल कोणालाच सांगता येत नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये किती अशी लोकं आहेत, जे एके काळी ह्या इंडस्ट्रीवर राज्य करत होते, परंतु आज त्यांना कोणीही विचारत सुद्धा नाही आहे. काही दिवसांपूर्वीच एक बातमी आली होती कि अनुपम खेर ज्यांनी एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य केले आहे, आज त्यांच्याजवळ काम नाही आहे. ह्या गोष्टीचा खुलासा स्वतः अनुपमखेर ह्यांनी एका मुलाखतीत केला होता.
आजच्या काळात बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, जे अनोळखी आयुष्य जगत आहेत. आज आम्ही आपल्या ह्या लेखात अश्याच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी अनोळखी आयुष्य जगत आहे. महेश भट्ट ह्यांचा ‘आशिकी’ हा चित्रपट तर तुम्हांला लक्षातच असेल, ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून दिली होती. ह्या चित्रपटात मुख्य अभिनेत्रींच्या रूपात दिसून आलेली अभिनेत्री अनु अग्रवाल रातोरात स्टार बनली होती. परंतु आज ती हिरोईन कुठे आहे, ह्याबद्दल खूपच कमी लोकांनाच माहिती आहे. महेश भट्टच्या चित्रपटाने रातोरात स्टार बनलेली अनु अग्रवाल सध्याच्या घडीला अनोळखी आयुष्य जगत आहे. आज हि अभिनेत्री बिहारच्या मुंगेर मध्ये आपले आयुष्य घालवत आहे. इतकंच काय तर इंडस्ट्रीतील कोणताच असा व्यक्ती नाही आहे, जो तिची विचारपूस करू शकेल. भलेहि अनुचा पहिला चित्रपट खूपच हिट झाला, परंतु त्यानंतर तिला ह्या इंडस्ट्रीमध्ये काम भेटण्यासाठी जवळजवळ ९ वर्षे संघर्ष करावा लागला होता. परंतु त्यानंतर सुद्धा तिला चित्रपटांत यश मिळाले नाही.
ह्यानंतर सुद्धा तिच्या आयुष्यात एक वाईट घटना घडली. तिचा १९९९ मध्ये अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता कि, ह्या अपघातानंतर अनुची स्मरणशक्तीच गेली आणि ती जवळजवळ २९ दिवस कोमा मध्ये होती. अनुच्या स्मरणशक्तीवर ह्या घटनेने खूप वाईट परिणाम केलाहोता . परंतु इतकं होऊनही अनु ह्या घटनेतून बाहेर आली आणि आपली आत्मकथा लिहून तिने संपूर्ण जगाला सांगितले. जेव्हा अनुचे पुस्तक लाँच झाले होते, तेव्हा महेश भट्ट ह्यांनी तिची स्तुती केली होती आणि सांगितले होते कि, हि मुलगी मृत्यूच्या दारातून निघून बाहेर आली आहे. परंतु माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हि कि, कश्याप्रकारे इतक्या कठीण काळानंतर सुद्धा तिने आपल्या आयुष्याला एका चांगल्या मार्गावर आणले. अनु अग्रवालने आजपर्यंत लग्न नाही केले आहे, आज सुद्धा ती एकटे जीवन व्यतीत करत आहे आणि ती तेथील लोकांना योगा शिकवत आहे.