Breaking News
Home / बॉलीवुड / एका चित्रपटाने ह्या कलाकाराला केले होते अजरामर

एका चित्रपटाने ह्या कलाकाराला केले होते अजरामर

कोणता कलाकार एका चित्रपटामुळे अजरामर होऊ शकतो, हिंदी चित्रपटसृष्टीत ह्याचे सर्वात मोठे उदाहरण स्वर्गीय अभिनेता अमजद खान आहेत. तसे तर अमजद खान ह्यांनी अनेक चित्रपटात खलनायक, सहाय्यक अभिनेता, चरित्र अभिनेत्यांच्या एकाहून सरस भूमिका साकारल्या. पण आताही त्यांना ‘शोले’ चित्रपटातल्या गब्बर सिंगच्या भूमिकेसाठीच सर्वात जास्त आठवले जाते. बॉलिवूडच्या प्रेक्षकांनी कोणत्याही डाकूचे इतके रौद्र, भयानक आणि हिंसक रूप कधीच पाहिलं नव्हतं आणि त्याच्यानंतर सुद्धा कधी पाहायला मिळालं नाही. एक असं पात्र ज्याची एक एक हालचाल त्या काळचा जणू नियमच बनून गेला. एक अशी संवादशैली जी पाहणाऱ्या-ऐकणाऱ्यांचे श्वास थांबवेल. एक असे हास्य जे पाहून अंगावर काटाच उभा राहेल. एक अशी चाल ज्याच्यासोबत काळीजच चिरून जाईल.

गब्बरची हि भूमिका कदाचित त्या काळच्या स्टार खलनायक डॅनी ह्यांच्यासाठी लिहिली होती, परंतु डॅनी ह्यांनी हि भूमिका करण्यास नकार दिला होता. आणि योगायोगाने हि भूमिका त्याकाळी नवीन असलेल्या अमजद खान ह्यांना मिळाली. जरी गब्बर ची भूमिका अमजद खान ह्यांच्यासाठी लिहिली गेली नव्हती, परंतु अमजद खान कदाचित गब्बर बनण्यासाठीच जन्मले होते. ‘शोले’ चित्रपटाची प्रचंड लोकप्रियता आणि प्रचंड यश ह्याचे सर्वात मोठे कारण होते अमजद खान. हि भूमिका अमजद खान ह्यांच्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीमधील असे शिखर होते जे त्यांना नंतर पुन्हा तिथे पोहोचता आले नाही.

ते खलनायक-अभिनेते प्राण ह्यांच्यानंतर असे दुसरे खलनायक होते ज्यापासून लोकं त्यांना घाबरत सुद्धा खूप होते आणि त्यांच्यावर प्रेम सुद्धा खूप करत होते. गब्बरच्या ह्या अजरामर भूमिकेमुळे अमजद खान खलनायकीचा असा कीर्तिमान बनून गेले आहेत कि पन्नास पन्नास वर्षानंतर सुद्धा जेव्हा कोणी खलनायक सिनेमाच्या पडद्यावर मोठ्या मोठ्या बाता मारेल तेव्हा लोकं म्हणतील, “चूप हो जा बेटे, वरना गब्बर आ जाएगा.” १९९२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण जाण्याअगोदर ते नाव करून गेले. अमजद चा अर्थ होतो यश. आणि ते त्यांना खूप मिळाले. त्यांची उंची होती ६ फूट १ इंच, वजन १४७ किलो. इतक्यामध्ये अडीच शाहरुख, सव्वा दोन आमिर आणि दोन सलमान खान आरामात येतील. त्यांची अंतिम यात्रा बघा जरा. किती चेहरे तुम्ही ओळखू शकतील ह्यातले. बघा व्हिडीओ

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *