Breaking News
Home / जरा हटके / पायाने अ’पं’ग असणाऱ्या ह्या मुलाचा अ’फलातून डान्स पाहून तुम्हीसुद्धा थ’क्क व्हाल, बघा व्हिडीओ

पायाने अ’पं’ग असणाऱ्या ह्या मुलाचा अ’फलातून डान्स पाहून तुम्हीसुद्धा थ’क्क व्हाल, बघा व्हिडीओ

आपल्या आयुष्यात कोणतीही कला ही जशी मनोरंजनाचं एक साधन आहे, तशीच ती सादर करणाऱ्या कलाकारांसाठी स्वतःला व्यक्त करण्याचं माध्यम सुदधा. कलेमार्फत स्वतःला व्यक्त करता येणं आणि त्यासाठी इतरांची वाहवा मिळणं, हे कोणत्याही कलाकारासाठी प्रेरणादायीच. या कलांमधील दिसायला सोप्पी पण साकार करताना तेवढीच कठीण असणारी कला म्हणजे नृत्य ही होय. आपल्या पैकी अनेकांनी या कलेत नैपुण्य मिळवलेलं असतं. पण ज्यांना असं निपुणतेने नाचता येत नाही, ते सुदधा स्वतःची हौस भागवून घेत असतात. मग एखादी वरात असो वा एखादा समारंभ. अर्थात त्यावर दुसरा एक लेख लवकरच आपल्या भेटीस येईल. तत्पूर्वी या लेखातून आपण एका अशा व्हिडियो विषयी बोलणार आहोत ज्याने आमची टीम एकदम आ’श्चर्यचकित झाली. खरं तर आमची टीम ही नेहमीच वायरल व्हिडियोज च्या पाठी असते. पण यंदा वायरल न झालेल्या पण तेवढ्याच तोडीच्या एका व्हिडियो संबंधित माहिती आमच्या वाचकांना द्यावी असं आमच्या टीमने ठरवलं.

हा व्हिडियो आहे ५-६ वर्षांपूर्वीचा. या व्हिडियोत काही परदेशी नागरिक एकत्र गोळा झालेले दिसतात. हळू हळू आपल्या लक्षात येतं कि हा एखादा डान्स स्टुडियो असावा आणि हे सगळे तिथे नृत्य शिकण्यास येत असावेत. कारण तिथे विविध वयोगटातील कलाकार दिसून येतात. तेवढ्यात आपल्या समोर एक दि’व्यां’ग मुलगा येतो. तो नृत्य करणार हे आपल्याला कळतं आणि आपली उत्सुकता शिगेला पोहोचते. कारण अनेक दि’व्यां’ग व्यक्ती अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा अतिशय सहजतेने वाटेल, अशा पद्ध्तीने साकार करताना आपण पाहिलं आहेच. हा मिनीटभराचा व्हिडियो पाहिल्यानंतर याची प्रचिती येते. कारण या व्हिडियोतील मुलगा डान्स फ्लोअर वर दाखल झाल्यापासून ज्या पद्धतीने अफलातून नृत्य साकार करतो ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यात सुरुवातीला तो हातातील स्टिक्स चा आधार घेतो. त्यात त्याचे चापल्य दिसून येते. पण तो केवळ अर्धाच भाग असतो. जेव्हा हातातील या स्टिक्स फेकून देतो तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आपली प्रतिक्रियाही त्यांच्याहून वेगळी नसते.

आपणही अ’वाक् होऊन का नृत्याविष्कार पहात असतो. त्याने हातावर उभं राहून सादर केलेल्या स्टेप्स आपली वाहवा मिळवून जातात. खासकरून त्या नृत्याविष्काराच्या शेवटी जेव्हा तो एका हातावर स्टेप्स सादर करत असतो तेव्हा तर ‘हॅट्स ऑफ’ असं नकळतपणे आपल्या तोंडातून निघून जातं. आपल्याला अक्षरशः अवाक् करून हा व्हिडियो संपतो आणि आपण त्या निनावी मुलाला त्याच्या कलेसाठी शाबासकी देत असतो. यातून इच्छा तिथे मार्ग ही उक्ती प्रत्यक्षात साकार होताना दिसते.

आपल्याला आमच्या टीमने लिहिलेला हा लेख आवडला असल्यास तो शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना मराठी गप्पाचे दर्जेदार लेख वाचण्याचा आनंद घेऊ द्या. तसेच आमच्या टीमने अफलातून नृत्याविष्कार साकार करणाऱ्या कलाकारांविषयी लेख लिहिले आहेत. आपल्याला ते लेखही वाचायला नक्कीच आवडतील. त्या लेखांना वाचण्यासाठी वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शन मध्ये जाऊन ‘नृत्य डान्स’ असं लिहून सर्च करा. आपल्याला ते लेख वाचण्यास उपलब्ध होतील. धन्यवाद.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *