Breaking News
Home / मराठी तडका / एकेकाळी गरिबीमुळे तुटलेल्या बॅटने करायचा सराव, आता आहे भारताचा स्टार फलंदाज…पत्नी आहे खूपच सुंदर

एकेकाळी गरिबीमुळे तुटलेल्या बॅटने करायचा सराव, आता आहे भारताचा स्टार फलंदाज…पत्नी आहे खूपच सुंदर

यंदाच्या आयपीएल संघाचे विजेतेपद मिळवले ते मुंबई इंडियन्स ह्या संघाने. आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे तो म्हणजे रोहित शर्मा. चला तर आज मुंबईच्या ह्या स्टार खेळाडूबद्दल जाणून घेऊया. रोहित-हिट मॅन-शर्मा म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत. त्याची आक्रमक फटकेबाज शैली त्याला मिळालेलं ‘हिट मॅन’ हे बिरूद सार्थ ठरवते. असा हा हिट मॅन फलंदाज आपल्या महाराष्ट्रात वाढला. सुरुवातीची काही वर्षे तो आई वडिलांसमवेत राहिला. पुढे उत्तम शिक्षणासाठी त्याला आजोळी धाडण्यात आलं. अशा पद्धतीने तो मुंबईत दाखल झाला आणि इथलाच झाला. इथली मराठी भाषाही त्याला येते. मराठी भाषेसोबत त्याच्यावर संस्कार होत होते ते क्रिकेटचे. म्हणजे आजुबाजूचं माहोल पूर्णपणे क्रिकेटमय. त्यात त्याचे सगळे काका आणि त्यांच्या घरचे क्रिकेटचे चाहते. त्यांमुळे घरात आणि घराबाहेर क्रिकेट विषयीचं प्रेम त्याने अनुभवलं. ते त्याच्यातही भिनलं. एवढं, कि पुढे जेव्हा क्रिकेटच्या नेट प्रॅक्टिससाठी चर्चगेटला बोरिवलीहून जावं लागे. पण तेही तो करत असे. त्याचा हा काळ होता तो शाळेतला.

तो राहत असे त्या वस्तीत क्रिकेट खेळत असे पण आपल्याला यापुढेही जायचं आहे असं त्याच्या लक्षात यायला लागलं. त्याने तसं त्याच्या काकांना सांगितलंहि. स्वतः क्रिकेटचे निस्सीम चाहते असणाऱ्या काकांनी त्याला एका उन्हाळी शिबिरात प्रवेश मिळवून दिला. त्यावेळी तो ऑफस्पिन फिरकीपटू होता. त्याच्या काकांना हे आर्थिकदृष्ट्या जड जात होतं. पण त्यांचा रोहितच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी त्याला जो पाठींबा दिला तो त्याने सार्थही करून दाखविला. पण या काळात एक गोलंदाज म्हणून तो पुढे येत असला तरीही त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड सर यांनी त्याच्यातली फलंदाज म्हणून गुणवत्ता ओळखली. तो ज्या शाळेत शिकत असे त्याऐवजी त्याला दुसऱ्या एका शाळेतर्फे खेळण्याचा सल्ला दिला. हि आंतरराष्ट्रीय शाळा होती. आर्थिक परिस्थितीती बेताची. पण लाड सरांच्या मदतीमुळे त्याला स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे त्याला या शाळेत प्रवेश घेता आला. त्यामुळे त्याची फलंदाजीची कला सगळ्यांसमोर येण्यास मदतच झाली. त्याने त्यांचा विश्वासहि सार्थ करून दाखवला. फलंदाज म्हणून उभारी घेत असताना त्याने स्वतःचं तंत्र विकसित केलं. सुरुवातीला तो तुटक्या बॅटनिशी खेळत असे. पण लवकरच त्याच्या काकांनी त्याला नवीन बॅट घेऊन दिली. तिचाही तो अगदी लक्षपूर्वक सांभाळ करत असे.

शाळेतर्फे क्रिकेट खेळत असताना त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. पुढे मुंबईच्या रणजी संघाचं त्याने नेतृत्वहि केलं. पण दरम्यानच्या काळात त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याचं पूर्ण लक्ष केवळ फलंदाजीवर केंद्रित झालं होतं. आत्ता पर्यंत आयुष्यात आलेले अडथळे त्याने दुर केले होते. भारतीय संघात त्याचा प्रवेश निश्चित झाला होता. पण दुखापत झाली आणि पुढे काही काळ त्याला थांबावं लागलं. पण या काळात त्याने खचून न जाता, आपल्या फलंदाजीने क्रिकेटचं मैदान दणाणून सोडलं. यथावकाश क्रिकेटच्या मैदानात त्याने भारतीय संघातर्फे खेळण्यास सुरुवात केली. पुढे जो घडत गेला तो इतिहास आपल्याला माहिती आहेच. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक म्हणजे २६४ धावा जमवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तसेच एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक तीन द्विशतके झळकवणारा फलंदाज म्हणूनही त्याची नोंद क्रिकेट इतिहासात झाली आहे. यातील दोन द्विशतके हि श्रीलंके विरुद्ध त्याने झळकावली असून २६४ धावांचाही त्यात समावेश आहे. तसेच असा हा धडाकेबाज फलंदाज अनेक वेळेस भारतीय क्रिकेट संघाचा तारणहार म्हणून पुढे आला आहे. तसेच आय.पी.एल. या लोकप्रिय जागतिक स्पर्धेत तो मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो. तिथेही त्याने अतिशय उत्तम अशी कामगिरी बजावली आहे. त्याच्या नावावर एक हॅटट्रिक हि नोंदवली गेलेली आहे.

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या सहकाऱ्यांची आणि संघाची काळजी घेणारा हा गुणी फलंदाज वैयक्तिक आयुष्यातही पाय जमिनीवर असलेला आहे. क्रिकेटच्या माध्यमांतून त्याने अमाप पैसा कमावला असला तरीही त्याचा संघर्षमय प्रवास तो विसरलेला नाही. या त्याच्या प्रवासात त्याच्या पत्नीनेही त्याला उत्तम साथ दिली आहे. रितिका सजदेह असं तिचं नाव. भारतीय क्रिकेट संघाचा स्टायलिश फलंदाज युवराज सिंघ याची ती मानलेली बहिण. ती स्पोर्ट्स एवेंट्स मॅनेजर म्हणून काम करत असे. रितिका आणि रोहित यांची पहिली भेट हा एक किस्साचं आहे. एका जाहिरातीचं शुटींग करण्यासाठी युवराज सिंघ आणि रोहित शर्मा एकत्र आले होते. तिथे रितिकाहि होती. पण तिच्या प्रती काळजी वाहणारा भाऊ अशी मानसिकता युवराज याची होती आणि आहे. त्यामुळे त्याने रोहित आल्या आल्या त्याला तिच्यापासून दूर राहायला सांगितलं. आल्या आल्या अचानक आलेल्या या वाक्याने रोहित काहीसा नाराज झाला. त्यात तो रितिकाला ओळखतहि नव्हता. त्यामुळे त्याला कळेना काय झालं. पण रितिका ने अगदी सामंजस्याने काम करत ते शूट पार पाडलं. यथावकाश रोहितच्या मनातला राग तर गेलाच उलट दोघांची घनिष्ठ मैत्री झाली. मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि रोहितने रितिकाला प्रपोज केलं. तिनेही हो म्हंटलं आणि काही काळाने त्यांचं लग्न संपन्न झालं. आज त्या दोघांना एक गोंडस मुलगी आहे आणि त्यांचा संसार उत्तम चालतो आहे.

आजवरच्या तेहतीस वर्षांच्या आयुष्यात रोहितने अनेक स्थित्यंतरं पहिली आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यापासून ते आजतागायत. या प्रवासात त्याने एक मात्र केलं, कि कधीही आपल्या खेळावरची श्रद्धा ढळू दिली नाही. यश असो वा अपयश. त्याने त्यातून धडे घेऊन स्वतःत योग्य ते बदल केले. प्रशिक्षकांनी सांगितल्यानुसार स्वतःच्या खेळात बदल केले. ओपनर म्हणून असो वा मधल्या फळीतील फलंदाज. त्याने नेहमीच धावा करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्या तर्हेने स्वतःचा खेळ साकारला. या सगळ्या त्याच्या गुणांमुळे मुंबईचा हा फलंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकला आणि आपल्या भारताचं नाव दिमाखात झळकवू शकला. येत्या काळात भारताचा क्रिकेट सीजन करोनाच्या आगमनानंतर पुन्हा सुरु होईल. पहिली मालिका असेल ती ऑस्ट्रेलियासोबत. त्याच्या फिटनेसमुळे त्याला एकदिवसीय आणि T२० सामन्यांसाठी विश्रांती देण्याचं ठरलं आहे. पण बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी चारही सामन्यांमध्ये त्याचा सहभाग असेल. त्याच्या या येत्या सामन्यांत तो उत्तम कामगिरी करेल हे नक्की. त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून रोहितला खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *