मुंबई- अश्या परिस्थिती जेव्हा बॉलीवूड मधील बड्या हस्ती आपले अफेयर लपवत आहेत, अशीही एक बॉलीवूड जोडी आहे जे आपल्या नात्याबद्दल दुनियेसमोर स्पष्टपणे बोलतात. आम्ही बॉलीवूड मध्ये खलनायकाच्या रोल साठी प्रसिद्ध राहुल देव आणि मुग्धा गोडसे यांच्याबद्दल गोष्ट करत आहोत. दोघांनी आपल्या नात्याला लपवण्यापेक्षा सर्वांसमोर कबुल केले आहे. आताच राहुल देव और मुग्धा गोडसे यांना युपी मधील वाराणसी येथील एका जिम उद्धघाटना दरम्यान सोबत पाहण्यात आले होते. जेव्हा, दोघांनी आपल्या आयुष्याबद्दल काही गुप्त गोष्टी मिडिया समोर सांगितले. तुम्हाला सांगू इच्छितो कि, राहुल देव बॉलीवुड पासून ते साउथ इंडस्ट्री पर्यंत आपल्या भव्य अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. राहुल बिग बॉसचा प्रतिस्पर्धी हि होता. काही दिवसांपूर्वीच मुग्धा आणि राहुल देव यांचे फोटो सोसीअल मेडिया वर चर्चेत आले होते. ज्या मध्ये दोघजण समुद्री किनार्याचा आनंद घेताना समोर आले होते. मुग्धा और राहुल खूप आधीपासूनच एकमेकान सोबत आहेत. एका न्यूज वेबसाइट ने मुग्धा बद्दल अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आणत सांगितले कि, मुग्धा चित्रपटात येण्यापूर्वी तेल विकून घर चालवायची.
बॉलीवूड मधील हॉट अभिनेत्रींन मध्ये गणना केली जाणारी अभिनेत्री मुग्धा गोडसे ने आपल्या एका मुलाखती दरम्यान सांगितले होते कि, ती कॉलेज जीवनात एक्स्ट्रा पॉकेट मनी साठी तेल विकायची. मुग्धा नुसार, त्यांना या कामासाठी दररोज १०० रुपये मिळायचे. मुग्धा गोडसे हि भारतीय मॉडल-अभिनेत्री आहे. मुग्धा ने आपल्या मॉडलिंग करियर मध्ये कित्येक सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. तुम्हाला सांगू इच्छितो कि, 2002 मध्ये मिस ग्लेड्रॅग्स मेगा मॉडेल हंटच्या शीर्षकाखाली, मुग्धाने यशप्राप्तीची नवी उंची गाठली. मुग्धा मिस इंडिया 2004 उपांत्य फेरीतील स्पर्धक हि होती.
कमी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुग्धा गोडसेने लहान वयात काम करायला सुरुवात केली होती. बॉलीवुड मध्ये विशेष ओळख नसल्याने, मुग्धा ला भरपूर स्ट्रगलनंतर काम मिळाले होते. तुम्हाला सांगू इच्छितो कि, बॉलीवुडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मुग्धाने हिंदी अल्बम ‘चुप चुप खड़े हो’, ‘लेकर हम दीवाना दिल’ मध्ये काम केले होते. मुग्धाने बॉलीवूड चित्रपट ‘फॅशन(2008)’ मध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी, मुग्धाला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट स्त्री पदार्पण करिता नामांकन मिळाले होते. लहानपणी कठोर परिश्रम करणारी मुग्धा आज १०० करोड रुपयांची मालकीण आहे.