Breaking News
Home / मराठी तडका / एकेकाळी मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या ह्या अभिनेत्री आता काय करतात, नंबर ५ तर नक्की पहा

एकेकाळी मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या ह्या अभिनेत्री आता काय करतात, नंबर ५ तर नक्की पहा

मराठी गप्पा आणि मराठी कलाकार यांच्या वरील लेख हे एक अतूट नातं आहे. कलाकारांची कारकीर्द, त्यांच्या आयुष्यातील गोष्टी जसे की साखरपुडा, लग्न या विषयी आमच्या टीमने वेळोवेळी विपुल लेखन केलेले आहे. हे लेखन करत असताना काही मराठी नायिकांविषयी आमच्या टीमला माहिती मिळाली ज्या काही काळापूर्वी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत होत्या पण सध्या त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा इतर कामांमध्ये व्यस्त आहेत. ज्यांनी मालिकांमधून खूप लोकप्रियता मिळवली, परंतु वैयक्तिक तसेच काही काळापुरती त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहणं पसंत केले. भविष्यात त्या कदाचित पुनरागमन सुद्धा करतील. कोण आहेत ह्या अभिनेत्री, ह्याची उत्सुकता तुम्हांला लागली असेलच ना. चला तर आजच्या लेखामध्ये जाणून घेऊयात मग.

कादंबरी कदम :
मालिका, नाटक यातून स्वतःची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे कादंबरी कदम. तिचं सौंदर्य जसं प्रेक्षकांना भुरळ पाडतं तसाच तिचा उत्तम अभिनय ही भुरळ पाडणारा आहे. ती अनेक गाजलेल्या कलाकृतींचा महत्वपूर्ण भाग राहिलेली आहे. क्षणभर विश्रांती, अजिंक्य, ही पोरगी कोणाची, मंगलाष्टकं वन्स मोर हे तिचे गाजलेले चित्रपट. तसेच तुजविण सख्या रे, अवघाची संसार, कभी सौतन कभी सहेली, दीप स्तंभ या लोकप्रिय मालिकांमध्ये तिने मध्यवर्ती भूमिका साकार केली होती. सध्या कादंबरी स्वतःच्या कुटुंबात रमली आहे. तिने अविनाश अरुण यांच्या सोबत लग्न केलं असून, ते स्वतः एक दिग्दर्शक आहेत. या दोघांना एक मुलगा असून हे कुटुंब सुखाने नांदत आहे. मराठी गप्पाच्या टिमकडून या संपूर्ण कुटुंबास उत्तम आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

केतकी थत्ते :
भरत जाधव यांनी गलगले ही व्यक्तिरेखा अजरामर केलेली आहे. जेव्हा ही व्यक्तिरेखा ‘गलगले निघाले’ या चित्रपटात झळकणार तेव्हा त्यांच्या सोबत नायिका कोण असणारा असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्यावर उत्तर मिळालं, केतकी थत्ते आणि प्रेक्षकांना उत्तम अभिनयाची खात्री पटली किंबहुना ती द्विगुणित झाली. केतकी ह्या उत्तम अभिनेत्री आहेतच आणि सोबत उत्तम नृत्यांगना आहेत. त्यांनी अनेक नाटकं आणि मालिका, सिनेमातून अभिनय केलेला आहे. काटकोन त्रिकोण हे त्यांचं गाजलेलं नाटक. हे गंभीर स्वरूपाचे नाटक असले तरीही केतकी ह्या अष्टपैलू अभिनेत्री आहेत. त्या विविध भूमिकांतून स्वतःची छाप त्या त्या व्यक्तिरेखेवर सोडतात. त्यामुळे वर उल्लेख केलेली भरत जाधव यांच्या नायिकेची भूमिका जी विनोदी होती, ती ही त्यांनी समर्थपणे सांभाळली. पुढे काही काळाने त्यांनी कलाक्षेत्रातला वावर कमी केला असला तरीही आता त्या स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करून आहेत. नेल पेंटिंगच्या व्यवसाय त्यांनी सूरु केला असून, त्याचे नाव त्यांनी ‘केटो नेल्स’ असे ठेवलेले आहे. केतकी ह्यांच्या इन्स्टाग्राम पेज वरून त्यांच्या व्यवसायाच्या पेजवरही जाता येतं. केतकी यांना कालाक्षेत्र आणि त्यांच्या व्यवसाय यातील भरघोस यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

नीलम शिर्के :
मराठीत विनोदाचं टायमिंग असणारे कलाकार कमी नाहीत. या मांदियाळीत स्त्री कलाकार या नेहमीच आघाडीवर असतात. या आघाडीच्या स्त्री कलाकारांमधील एक अभिनेत्री म्हणजे नीलम शिर्के. नीलम जी यांना आपण त्यांच्या अनेक भूमिकांसाठी आणि मालिकांसाठी ओळखतो. त्यांनी अनेक सिनेमांतूनही अभिनय केलेला आहे. राजा शिवछत्रपती, वादळवाट, असंभव, साहेब बीबी आणि मी, हसा चकटफु, चारचौघी या त्यांच्या गाजलेल्या मालिकांपैकी काही मालिका. तसेच गडबड गोंधळ, चिंगी, क्षण, पछाडलेला हे सिनेमेही गाजले. त्या वैविध्यपूर्ण भूमिका अगदी उत्तम रीतीने वठवतात. पण सगळ्यात जास्त लक्षात राहतात त्या त्यांनी साकार केलेल्या विनोदी भूमिका. विनोद करणं आणि त्यावर प्रेक्षकांनी हसून प्रतिक्रिया देणं हे काही सोप्प नाही. विनोदाचं टायमिंग चुकलं तर त्यास अर्थ राहत नाही. त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक सादर करायचा हा कलाप्रकार. त्यात अतिशय कमी कलाकारांना हे जमतं. निलमजी या मोजक्या कालाकारांपैकी एक आहेत. सध्या त्या कोकणात वास्तव्यास असून आपल्या कुटूंबासोबत उत्तम आणि आनंदी आयुष्य व्यतीत करत आहेत. नीलम जी आणि त्यांच्या परिवारास उत्तम आणि आनंदी आयुष्यासाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

सारा श्रवण :
सारा श्रवण म्हणजे मालिकांमधली आघाडीची अभिनेत्री. उत्तम अभिनेत्री असण्यासोबत ती उत्तम नृत्यांगना ही आहे. महेश टिळेकर यांच्या मराठी तारका या कार्यक्रमातुन ती आपली नृत्यकला सादर करत असते. खासकरून हा कार्यक्रम जेव्हा सीमेवरील भारतीय जवानांसाठी असतो, तिथे सारा अगदी आवर्जून जाते. पण गेले काही काळ तिचा कलाक्षेत्रातील सहभाग कमी झालेला आहे. या काळात तिने स्वतःच्या लहान मुलाला वेळ देणं पसंत केलेलं आहे. तरीही तिची मागील वर्षी ‘मंकी हाईस्ट’ ही एक गंमतीदार वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. सारा आणि तिच्या कुटुंबास पुढील आनंदी आयुष्यासाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

नेहा गद्रे :
मराठी मालिका, सिनेमा यातील एक देखणं व्यक्तिमत्व म्हणजे नेहा गद्रे. तिने नायिका म्हणून मालिकांमध्ये आणि सिनेमात काम केलेलं आहे. अजुनी चांद रात आहे, मन उधाण वाऱ्याचे या तिच्या गाजलेल्या मालिका. तसेच ‘एका पेक्षा एक’ या प्रसिद्ध डान्स कार्यक्रमातही तिने सहभाग नोंदवला होता. काही काळापूर्वी तिने ईशान बापट यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आणि मग ऑस्ट्रेलिया इथे ही दोघं सध्या वास्तव्यास आहे. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती जर्मन भाषेतील पदवीधर आहे. काही काळापूर्वी तिने स्वतःचा वाढदिवस ईशान आणि मित्र मैत्रिणींसोबत साजरा केला. मराठी गप्पाच्या टिमकडून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि येणारं वर्ष तिला उत्तम जाओ ही सदिच्छा !

पल्लवी सुभाष :
मालिका आणि सिनेमा मधील एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणजे पल्लवी सुभाष. पल्लवी सुभाष यांना आपण या कलाकृतीतुन पाहिलं आहे. त्या एक उत्तम अभिनेत्री असून त्यांनी मॉडेलिंग ही केलेलं आहे. गेल्या काही काळात त्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वेळ देणं पसंत केलं आहे. येत्या काळात त्यांच्या अजून अनेक उत्तमोत्तम कलाकृती आपल्या भेटीस येतील हे नक्की. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *