‘आशिकी’ चित्रपटापासून आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या दीपक तिजोरीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये अनेक चित्रपट हिट झाले आहेत. मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेसह दीपक तिजोरीने अनेक चित्रपटांत सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या आहेत, ज्यामध्ये त्याची हिरोपेक्षा सुद्धा जास्त चर्चा होत होती. इतकंच नाही तर आपल्या काळात दीपक तिजोरीने मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना टक्कर दिली आहे, परंतु आता वेळ अशी आली आहे कि त्याला ओळखणं सुद्धा मुश्किल झालं आहे. तर जाणून घेऊया आजच्या लेखात काय खास आहे ते. अभिनेता दीपक तिजोरीने चित्रपटांत मुख्य अभिनेता म्हणून भलेही कमी काम केले असेल, परंतु त्याने सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका निभावून लोकांच्या मनावर खूप राज्य केले. त्याकाळी दीपक तिजोरी ज्या चित्रपटात सुद्धा सहाय्यक अभिनेत्याची भूमिका निभवायचा, त्यामध्ये त्याची हिरोपेक्षा सुद्धा जास्त चर्चा व्हायची. मग तो ‘जो जिता वही सिकंदर’ चित्रपट असो किंवा मग ‘कभी हा, कभी ना’ सारखा चित्रपट असो. त्याने ज्या चित्रपटांत सहाय्यक अभिनेत्याची भूमिका निभावली, त्यात त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले.
जेव्हा दीपक तिजोरीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती, तेव्हा तो शाहरुख आणि आमिर खानला सुद्धा टक्कर देत होता. ज्या चित्रपटात दीपक तिजोरी त्यांच्या सोबत काम करायचा, लोकं त्याचीच चर्चा करायचे. इतकंच नाही तर ‘जो जिता वही सिकंदर’ आणि ‘कभी हा, कभी ना’ ह्या चित्रपटांत शाहरुख आणि आमिरपेक्षा जास्त दीपक तिजोरीच्या चर्चा झाल्या होत्या, परंतु आज तोच दीपक तिजोरी निनावी आयुष्य जगण्यास मजबूर झाला आहे. वेळेसोबत दीपक तिजोरीचे करिअर खूप फ्लॉप होत गेले. ज्यानंतर त्याने चित्रपट दिग्दर्शनक्षेत्रात नशीब आजमावले. नशीब आजमावल्यानंतर त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनसुद्धा केले, परंतु हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल दाखवू शकले नाहीत. आणि त्याचे यशस्वी दिग्दर्शक व्हायचे स्वप्न सुद्धा भंगले.
जेव्हा एकानंतर एक चित्रपट बॉक्स ऑफिस वर फ्लॉप होऊ लागले तेव्हा त्याने बॉलिवूडपासून दूर जायला सुरुवात केले आणि अनेक वर्षानंतर तो मीडियासमोर आला, परंतु त्याला लोकं ओळखू शकले नाहीत. जो कधी शाहरुख आणि आमिर खान ला टक्कर देत होता आणि लोकांच्या मनावर राज्य करत होता, तो आज निनावी आयुष्य जगत आहे. साल २००७ मध्ये जेव्हा तो खूप काळानंतर मीडियासमोर आला, तेव्हा त्याचा लूक संपूर्णपणे बदलला होता. आणि त्याला लोकं ओळखू शकले नाहीत. दीपक तिजोरीचे फक्त वयच वाढले नाही, तर त्याने आपल्या लूक मध्ये सुद्धा पूर्णपणे बदल केला. ज्यामुळे त्याचे फॅन्स सुद्धा त्याला ओळखू शकले नाहीत. इतकंच नाही, साल २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘साहेब बीवी आणि गँगस्टर ३’ चित्रपटामध्ये दीपक तिजोरी दिसला होता, परंतु अनेकांनी त्याला ओळखले नाही.