९० च्या दशकांत रिलीज झालेल्या चित्रपटांना आज सुद्धा खूप आठवलं जाते. त्या वेळच्या चित्रपटांमध्ये एक वेगळीच गोष्ट होती. चित्रपटातील भूमिका सुद्धा खूप लक्षात राहत. ९० च्या दशकाने चित्रपट इंडस्ट्रीला खूप काही दिले. ह्याच दरम्यान काही हिट चित्रपटांनी लोकांचे मन जिंकले होते. ज्यामध्ये अजय देवगणचा ‘फुल और कांटे’ आणि शाहरुखचा ‘दिवाना’ चित्रपटाने लोकांमध्ये एक वेगळीच ओळख बनवली होती. ह्याच दरम्यान एक चित्रपट असा सुद्धा आला जो महिलांवर केंद्रित होता. ह्या चित्रपटाचे नाव होते ‘दामिनी’. ह्या चित्रपटात एका सुंदर अभिनेत्रीने मुख्य भूमिका निभावली होती. त्या अभिनेत्रीचे नाव होते ‘मीनाक्षी शेषाद्री’. बॉलिवूड एक असा उद्योग आहे, जिथे कुणी फार काळ टिकत नाही. एकदा तुम्ही प्रसिद्ध कलाकार आहेत तोपर्यंत यश मिळतं. परंतु काही वर्षानंतर इंडस्ट्रीत काम थांबतं आणि आपण विस्मृतीच्या अंधारामध्ये कुठेतरी हरवून जातो. बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांचे आयुष्यही असेच होते. ८० आणि ९० च्या दशकात अनेक हिट फिल्म्स देणारी मीनाक्षी आज अज्ञात जीवन जगत आहे. मीनाक्षी तिच्या काळातील एक उत्कृष्ट अभिनेत्री होती. तिने अनेक चित्रपटांत काम केले आणि आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर आपल्या चाहत्यांची माने जिंकली. परंतु तुम्हांला माहिती आहे का कि ती आता कुठे आहे. आज आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यासंबंधित काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ह्याच सोबत तिचे बदललेले लूक सुद्धा तुम्हांला फोटोज मधून दिसेल.
मीनाक्षीचा जन्म झारखंड येथील सिन्दरी नावाच्या शहरात १३ नोव्हेंबर १९६३ मध्ये झाला. मीनाक्षी मुळतः तामिळनाडूची आहे परंतु तिचे वडील मेसोर हे सिन्दरी च्या उर्वरक कारखान्यात कमला असल्यामुळे तिचे कुटुंब त्याच शहरात स्थायिक झाले होते. मीनाक्षीची कारकीर्द वयाच्या १७ व्या वर्षी सुरू झाली. वास्तविक, ती जेव्हा १७ वर्षांची होती, तेव्हा १९८१ मध्ये ती मिस इंडिया बनली. ही पदके जिंकल्यानंतर तीन वर्षांतच बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स तिला येऊ लागल्या. बॉलिवूडमध्ये मीनाक्षीने ‘पेंटर बाबू’ नावाच्या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. मात्र, तिला खरी ओळख ‘हीरो’ या चित्रपटावरून मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. या सिनेमात तिच्या विरुद्ध जॅकी श्रॉफ देखील होता. १९९३ मध्ये रिलीज झालेल्या ‘दामिनी’ चित्रपटामुळे ती त्याकाळी बॉलिवूडमध्ये टॉपची हिरोईन बनली होती. तिला ‘दामिनी’ चित्रपटासाठी फिल्मफेअरच्या पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळाले होते. यानंतर मीनाक्षीने ‘मेरी जंग’, ‘घायल’, ‘घातक’, ‘शहेनशाह’, ‘घर हो तो ऐसा’ आणि ‘तुफान’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. १९९६ मध्ये ती सानी देओल सोबत ‘घातक’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट तिच्या करिअरचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर तिने बॉलीवूडला रामराम ठोकला. मीनाक्षीचे सौंदर्य अप्रतिम होते. त्यावेळी प्रेक्षक तिला चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत असत.
तथापि, काळ बदलला आहे आणि आता तिचा लूक खूप बदलला आहे. आजच्या या नव्या लूकमध्ये बरेच लोक कदाचित तिला ओळखतही नसावेत. चित्रपटसृष्टीत प्रत्येक अभिनेत्याचे आणि अभिनेत्रींचे नाव कोणा ना कोणासोबत जोडले जाते. असेच काहीसे मीनाक्षी सोबत सुद्धा झाले. तिचे नाव सुद्धा चित्रपटसृष्टीतील काही लोकांसोबत जोडले जाऊ लागले होते. परंतु तिने १९९५ साली अमेरिकेतील इन्व्हेस्टर बँकर हरीश मैसूर सोबत लग्न करून सर्वांची बोलती बंद केली. लग्नानंतर ती अमेरिकेतील टेक्सस शहरात वास्तव्यास होती. दोघांनीही न्यूयॉर्कमध्ये विवाह केला होता. परंतु त्यानंतर तिचे पती हरीश ह्यांची पोस्टिंग वॉशिंग्टन येथे झाली होती. त्यानंतर ते आता तिथेच राहत आहेत. त्यांना दोन मुले असून मुलाचे नाव जोश तर मुलीचे नाव केंद्रा आहे. मीनाक्षीचे लक्ष सध्या कुटुंब संभाळण्यावर आहे. ह्या गोष्टीचा उल्लेख तिने अनेक मुलाखतीत केलेला आहे. एका मुलाखतीत तिला विचारले गेले कि, काय चित्रपटसृष्टीत करियर करण्यासाठी तू मुंबईमध्ये परतणार का? तेव्हा ह्या प्रश्नावर उत्तर देताना मीनाक्षीने सांगितले होते कि तिची मुले मोठी झाल्यावर ती ह्या गोष्टीवर विचार करू शकते. मीनाक्षी सोशिअल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.
तिचे सहकलाकार ऋषी कपूर ह्यांनी चार वर्षाअगोदर तिच्यासोबाबत एक फोटो शेअर केला होता. ह्या फोटोत त्यांनी मीनाक्षीला ओळखण्याचा टास्क सुद्धा दिला होता. ह्या फोटोत ती खूप वेगळी दिसत होती आणि तिला ओळखणे सुद्धा खूप कठीण झाले होते. मीनाक्षीला नृत्याबरोबरच अभिनयातही खूप रस आहे. अशा परिस्थितीत ती स्वत: ला नृत्याच्या जवळ ठेवत आहे, स्वत: ला चित्रपटांपासून दूर करते आहे. खरं तर, टेक्सासमध्ये मीनाक्षी तिची स्वतःच ‘चेरीश डान्स स्कूल’ नावाची नृत्य शाळा चालवते. मीनाक्षीने वर्ष २००८ मध्ये ही नृत्य शाळा सुरू केली. हि शाळा उघडल्यानंतर काही वर्षातच हि नृत्य शाळा प्रसिद्ध झाली. या नृत्य शाळेची खास गोष्ट अशी आहे कि, सर्व वयोगटातील लोक नृत्य शिकण्यासाठी मुलापासून वडीलधार्यांपर्यंत येतात. येथे मीनाक्षी स्वत: त्यांना भरतनाट्यम, कथक, कुचीपुडी आणि ओडिसीसारखे नृत्य शिकवते.