Breaking News
Home / मराठी तडका / एक गाव तेरा भानगडी वेबसिरीजमधील झुल्या खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा झुल्याची खरी जीवनकहाणी

एक गाव तेरा भानगडी वेबसिरीजमधील झुल्या खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा झुल्याची खरी जीवनकहाणी

इंटरनेट आणि सोबत आलेल्या इतर सुविधा यांमुळे आपलं जीवन विविध अंगांनी बदलतं आहे. यात मनोरंजन क्षेत्राचा समावेश होणं अर्थातच अपरिहार्यच. वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स यांची जनमानसांत वाढत असलेली लोकप्रियता ह्याचं द्योतक. या नवंमाध्यमांनी अनेक नवोदित कलाकारांना आपल्या समोर आणलं आहेच. या माध्यमांतून अभिनय केलेली अनेक कलाकार मंडळी मालिका, सिनेमे यांतूनही झळकताना दिसतात. मराठी गप्पाच्या नियमिय वाचकांना नवोदित कालाकारांविषयी लेख वाचत असताना ही बाब नक्कीच लक्षात आली असेल. या वेब सिरीज मध्ये एक वेब सिरीज गेला काही काळ प्रचंड गाजते आहे. या वेब सिरीजचं नाव आहे, ‘एक गाव तेरा भानगडी’. या वेब सिरीजच्या प्रत्येक भागाला १-३ दशलक्षांहुन अधिक प्रेक्षकवर्ग नियमितपणे लाभत आलेला आहे. प्रत्येक कलाकृतीत काही व्यक्तिरेखा अशा असतात, ज्या प्रेक्षाकांना प्रत्येक भागात पहायच्या असतात.

एक गाव तेरा भानगडी ही वेब सिरीजही यांस अपवाद नाही. या वेब सिरीज मधील झुल्या हे पात्र पहिल्या भागापासून अतिशय लोकप्रिय होत आलेलं आहे. चतुर भावड्या किंवा शेठ अशी ओळख असणाऱ्या व्यक्तिरेखेसोबत झुल्या ही व्यक्तिरेखा असते. दोघांच्या गंमतीजमतींनी पूर्ण वेब सिरीज मध्ये वातावरण सतत हसतं खेळतं राहतं. तर या जोडगोळीतील झुल्या म्हणजे सोहेल मनेर. तो मुळचा सांगलीचा. अजून त्याचं महाविद्यालयीन शिक्षण चालू आहे. बारावीत असताना त्याची या वेब सिरीजमधील काही कलाकारांशी ओळख झाली. त्याचा हरहुन्नरी स्वभाव पाहून, त्याला वेब सिरीजमध्ये काम करणार का असं विचारण्यात आलं. सोहेलचं शिक्षण चालू होतं. अभिनयात काम करू असा विचार त्याने कधी केला नव्हता. तसेच अभिनयाचा पूर्वानुभव नसल्याने तो सुरुवातीला साशंक होता. पण मग तो तयार झाला आणि आज या वेब सिरीजचा तो एक अविभाज्य भाग आहे. अभिनय, शूटिंग यांचा पूर्वानुभव नसतानाही त्याने केलेलं काम हे उत्तम वाटतं. नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरतं.

त्याने दिलेल्या मुलाखतीतून त्याला आता झुल्या म्हणून ओळख मिळते आहे, हे कळून येतं. तोही त्याबद्दल उत्सुक दिसून येतो. वेब सिरीज नंतरही कलाक्षेत्रात कार्यरत राहण्याची त्याची मनीषा आहे. त्याची ही मनीषा पूर्ण होवो आणि त्याला यश मिळत राहो, या मराठी गप्पाच्या टीमकडून त्याला शुभेच्छा ! आपण हा लेख वाचलात या बद्दल धन्यवाद. वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक कलाकार हे वेब सिरीजमधून आपल्या समोर येत असतात. तुम्हाला त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. सर्च ऑप्शनमध्ये जाऊन वेब सिरीज असं टाईप केल्यास आपल्याला विविध लेख सापडतील. त्यातील आपल्या आवडत्या कलाकारांविषयीचे लेख आपण वाचू शकता. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *