कबड्डी हा खेळ मूळ भारतातील सांघिक खेळ मानला जातो. हा खेळ महाराष्ट्रातील आहे, असे तुम्हाला वाटलं असेल पण हा खेळाचा उगम हा मूळचा तामिळनाडूचा. आता या पठ्ठाचा व्हीडिओ पहा ना रेडर ज्या प्रकारे मंदामाईच्या गाण्यावर डान्स करतोयं त्यावरुन समोरची टीम किती लेचीपेची असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल. आता जास्त मोठेपणा हाकत नायं पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या पुढं असं कुणी रेड मारताना नाचून दाखवत असेल ना तर आपण सरळ त्याच्या पायाला कैची मारतो आणि जागेवर खाली बसवतो. आता इथं दाखवायचं साधन नाय म्हणून आपण लिहून दाखवतोयं पण भिडू आपल्या पुढं असली थेरं खपवून घेतली जाणार नाहीत. बिलकुल नाही म्हणजे नाहीच. आता याच सगळ्या प्रकारात एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर पहा. कसा लकबी देऊन समोरचा पठ्ठ्या नाचून दाखवतोयं तुम्हाला असली रेड मारणं जमेल का विचार करा. सोपं नसतंयं समोरचा एकदम कधी तुमचा घात करेल, हे सांगता येण्यासारखं नसतं. एक गोष्ट लक्षात येईल की तुम्हाला या माणसाला कसं टॅकल करायचं जे गाण्यावरती नाचून रेड मारू लागतायंत.
भाऊने रेड मारण्याचं काम सुरूच ठेवलंय पण चकवा देण्याचं कामही तितक्याच जोशात करतोयं. त्यामुळं त्यानं सगळ्यांना कसं आपल्या तालावर नाचवलंयं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या या सगळ्या करमतीमुळं एक गोष्ट पक्की कळाली आसलं की या भाऊला दोन डोकी आहेत. एक डोकं डान्स करायला लावतंयं. तर दुसरं डोकं ते इतरांना मग्न ठेवण्यात लावयंतंय. त्यामुळं असलं बेनं ज्याच्या टीममध्ये आसलं ना त्याला हरायची आणि दुसऱ्या टीमला जिंकायची काहीच बिशाद नाय. त्यामुळं मी कितीबी म्हणालो ना की जरी मी उचलून आपटंल किंवा बचक्यात धरीन तर तसं सोपं नाहीये. आपण सुद्धा थोीडी बहोत कब्बडी जाणत असलो ना तरी बी काय गणित डोक्यात ठेवून रेड मारायला लागतेयं ना तेवढं आपल्याला म्हायतीयं. त्यामुळं आपल्याला एक गोष्ट् लभात येईल की त्याला पुरस्कार देण्याची मागणी आपल्या मंडळानं उगीचच केली नसावी. कारण एवढं नाचून समोरच्याचं कॉन्सन्ट्रेशन लुज करायचं आणि आपला डाव कसा साधायचा ना हे पक्क त्याला कळून चुकलेलं असावं.
समोरच्याला कसं चितपट करायचं आपल्या टप्प्यात आला ना की कसं काम कराचयं हे त्यानं पुरतं ओळखून दाखवलंयं. त्याच्या याच पराक्रमामुळं टीमनं सर्वात महागडी बोली लावून विकत घेतलं या भावाला. त्यामुळं भावाचा काय ईशयचं नाय. जरी रेड मध्या काय गावलं नाय ना तरी नाचून नाचून समोरच्याचा टाईम कसा खोटी करायचा ना ते भावानं पुरेपुर ओळखलंयं. कबड्डी आता भारतातून आशियातही लोकप्रिय झाला तरीही वीसाव्या शतकापासून प्रसिद्ध असलेल्या या खेळात त्याला महत्व प्रप्त झालं ते याच गोष्टींसाठी का, असा प्रश्न आता पडतोयं. या भावानं डान्स काय केला आणि त्यानं जे काही अदा दाखवल्यात त्यावरुन एक गोष्ट तर नक्की आहे की भाऊ कबड्डी पण मस्त डोक्यालिटी वापरून खेळतो. एकदम जास्त लोड पण घ्यायचा नाही आणि समोरच्याला बुचकळ्यात पाडायचं. काही लोकं असेच असतात ज्यांना कशाचा कशाला मेळ नसतोयं फक्त आयुष्य खुलेपणानं जगायचं असतं तुमचं कसं चाललंय लोड घेतलायं की या भावासारखं एकदम लाईट. तुम्ही आता खाली दिलेला व्हिडीओ बघून घ्या आणि कसा वाटलं ते कमेंट करायला विसरू नका.
बघा व्हिडीओ :