Breaking News
Home / मनोरंजन / एखाद्याच्या दिसण्यावरून त्याची पात्रता ठरवू नका, बघा हा व्हिडीओ

एखाद्याच्या दिसण्यावरून त्याची पात्रता ठरवू नका, बघा हा व्हिडीओ

मराठी गप्पाच्या माध्यमातून आमची टीम वाचकांसाठी सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवर लेख लिहीत असते. यांतील काही विषय आम्हाला स्वतःला खूप आनंद देऊन जातात. आता वायरल विडोयोजचच बघा ना. हा विषय आमच्या टीमने हाती घेतला आणि पाहता पाहता किती तरी विविध लेख आमच्या टीमने लिहिले. आज अशाच एका वायरल व्हिडियो संदर्भात आमच्या टीमने लेख लिहिण्याचा निर्णय घेतला. या व्हिडियोला पाहून आमच्या टीमला मनस्वी खूप आनंद झाला. या आनंदाचं कारण म्हणजे या व्हिडियोतील आजोबा. या आजोबांचं नाव अर्जुन दशरथ कोळी. मूळचे कोल्हापूरचे. त्यांच्या वागण्या बोलण्यात तांबड्या पांढऱ्या रश्या प्रमाणे विविध छटा दिसून येतात. पूर्वी भारतीय सैनिक म्हणून त्यांनी कारकीर्द घडवली.

या कारकिर्दीत त्यांनी जे अनुभव घेतले तसेच वाढत्या वयासोबत जे अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाले ते अनुभव आत्ताच्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं होतं. आमच्या टीमला या आजोबांविषयी माहिती एका वायरल व्हिडियोमार्फत मिळाली आणि हा व्हिडियो काही काळापूर्वीचा असल्याने त्यांच्याविषयी अजून काही माहिती सांगता येत नाही. पण या वायरल व्हिडियोतून असं कळतं की ते एके ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून गेले होते. ज्या मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या मुलांना हे आजोबा आधीच भेटले. आजोबांच्या पेहरावावरून एखाद्या गावातले असावेत असं वाटून गेलं असणार. पण आजोबांनी मराठी सोबतच इंग्रजी आणि हिंदीतून संवाद साधायला सुरुवात केली, तेव्हा मात्र या मुलांची उत्सुकता वाढीस लागली. यांच्यापैकी एकाने हा व्हिडियो बनवला आहे. यात हे तरुण त्या आजोबांची माहिती विचारताना दिसून येतात. यावरून त्या आजोबांची वर उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय सैन्यातली पार्श्वभूमी कळून येते. या कारकिर्दीनंतर आजोबा आता डिझास्टर मॅनेजमेंट, याद करो कुर्बानी (स्वातंत्र्य लढ्यातील वीरांविषयीची माहिती), महिला सबलीकरण आणि भारतीय युवा पिढीशी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संवाद अशा विविध विषयांवर बोलतात.

या संपूर्ण बोलण्यात त्यांची विविध वाक्य त्यांचं अवलोकन, अनुभव आणि सत्यपरिस्थिती यांची अनुभूती करून देतात. तसेच त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास हा वाखाणण्याजोगा. काही तरुणांना लाजवेल असा. या दरम्यान हा व्हिडियो संपत येतो. आजोबांच्या भाषाशैलीचं गारुड तुमच्या मनावर झालेलं असतं. त्यांचा कणखर बाणा बोलताना जाणवतो, आपल्यातही तो कोणत्याही आपल्या आविर्भावाविना यावा, असं नकळत वाटून जातं. तेवढ्यात आजोबा आपल्या जवळचं एक पुस्तक काढतात. त्यात प्रथमतः त्यांच्या आईंचा फोटो असतो. या क्षणाला आपल्या आईचा फोटो ते दाखवतात. इतर वेळ सतत बोलणारे आजोबा आता बोलत नाहीत, बोलतात ते त्यांचे मौन. आईच्या आठवणीने त्यांना गदगदून आलंय, हे पाहून कळून येतं. आपणही नकळतपणे त्यांच्या या भावनेशी एकरूप होतो. तेवढ्यात हे आजोबा आपला तरुणपणीचा फोटो सगळ्या मुलांना आणि पर्यायाने आपल्याला दाखवतात. त्यात पुन्हा रुबाबात मी त्या काळचा सिंघम होतो म्हणतात. आपल्या चेहऱ्यावर नकळत स्मित रेषा उमटते आणि व्हिडियो संपतो.

हा व्हिडियो संपल्यावर एक गोष्ट अधोरेखित होते. ती म्हणजे माणसाच्या दिसण्यावर प्रत्येक वेळी जाऊ नये. तसेच इतर भाषा अवगत करणं, हे अवघड नाही, पण हे करत असताना मातृभाषेकडे दुर्लक्ष नको, ही बाबही अधोरेखित होतेच. आजोबांनीही इंग्रजीचा वापर लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला असला तरीही बहुतांश संभाषण मराठीतून झालेले दिसते. आमच्या टीमला हे ठळक मुद्दे दिसून येतात. इतर अनेक मुद्देही आहेतच. आपल्याला यातून अजून काय काय शिकायला मिळालं, हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. तसेच आमचे वायरल व्हिडियोज विषयीचे लेख आवडत असल्यास शेअर ही करत जा. ज्यांना हे लेख वाचायचे असतील त्यांनी वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च करा. आपल्याला आमच्या टीमने केलेले सगळे लेख वाचायला मिळतील. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *